रूपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, करुणा शर्मा यांची मागणी
Karuna Sharma on Rupali Chakankar : रूपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, करुणा शर्मा यांची मागणी

Karuna Sharma on Rupali Chakankar : "रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) म्हणतात 35971 महिलांच्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. मात्र, त्यातील किती महिलांना तुम्ही न्याय मिळवून दिलाय? मी देखील 6-6 तक्रारी दिल्या होत्या. त्या तक्रारी तुम्ही पोलिसांकडे ढकलतात. तुम्ही त्याबद्दल विचारपूस करत नाही की हे प्रकरण तडीस गेलं का? किती महिलांना न्याय मिळाला? त्याच्यामुळे महिलांवरील अत्याचार वाढत चालले आहेत", असं म्हणत करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकरणकर (Rupali Chakankar) यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली आहे.
रुपाली चाकणकर तुम्ही राजीनामा द्या, करुणा शर्मा यांची मागणी
करुणा मुंडे म्हणाल्या, महिलांच्या आत्महत्या वाढत आहेत. विवाहित मुलगी घरात असताना तिचा नवरा तीन-तीन लग्न करत आहे. जर महिला आयोग काम करत असता तर एकही मुलगी अशी बसली नसती. तुम्ही काहीच काम करत नाहीत. रुपाली चाकणकर तुम्ही राजीनामा द्या. चांगलं सामाजिक काम करणारी महिला त्याठिकाणी बसवा. राजकीय महिला ...महिला आयोगात नको आहे. ज्यांचं काम सभा घेणे नाही, तर महिलांना न्याय देणे ही आहे. महिलांसाठी भरपूर कायदे आहेत. मात्र, त्यांना न्याय मिळत नाही, असंही करुणा शर्मा म्हणाल्या.
महिला आयोग यावर काय स्पष्टीकरण देणार का? वैष्णवीचा जीव वाचला नसता का?
अंजली दमानिया म्हणाल्या, महिला आयोग यावर काय स्पष्टीकरण देणार का? वैष्णवीचा जीव वाचला नसता का? वैष्णवीची जाऊ, मयूरी, हिने महिला आयोगाला email करून तिला मारहाण केली, तिच्या सासऱ्यांनी छाती जवळ हात लावून कपडे फाडले. शिवीगाळ केली, ह्याचे पुरावे, FIR, फोटो व तिच्या आईने लिहिलेली चिठ्ठी पाठवली . ती चिठ्ठी सुद्धा मी जोडत आहे. आमचा मेहुणा मोठा पोलिस अधिकारी आहे, आमच्या मागे मोठा राजकीय पाठिंबा आहे असा त्या चिट्ठी मधे उल्लेख आहे. महिला आयोगाने ह्यावर कारवाई का नाही केली ? ह्याचे उत्तर हवे आहे. वेळच्यावेळी ही कारवाई झाली असती तर आज वैष्णवी सुद्धा जिवंत असती.
इतर महत्त्वाच्या बातम्या
























