Kalyan Court Summons To Uddhav Thackeray And Eknath Shinde: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांना कल्याण कोर्टात हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. 5 ऑगस्टला कल्याण कोर्टात हजर राहण्याबाबत उद्धव ठाकरेंना तर 6 ऑगस्टला हजर राहण्याबाबत एकनाथ शिंदेंना आदेश देण्यात आले आहेत. 2009 लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभा मतदारसंघातील प्रकरणी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंना कल्याण कोर्टाने समन्स बजावले आहे.
2009 लोकसभा निवडणुकीत वसंत डावखरे विरुद्ध आनंद परांजपे यांच्यात निवडणुक झाली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी परांजपे यांच्यासाठी 22 एप्रिल 2009 साली घेतलेल्या प्रचार सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत डावखरे यांचा एक व्हिडीओ दाखवला. या व्हिडीओमध्ये वसंत डावखरे कार्यकर्त्यांना निवडणूक जिंकण्यासाठी पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांची भीती न बाळगता प्रयत्न करण्याचे आवाहन करत असल्याचे दाखवण्यात आले. या प्रकरणी उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, आनंद पराजंपे आणि रमाकांत देवळेकर यांच्यावर वसंत डावखरे यांनी खटला दाखल केला होता. तत्कालीन शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी डोंबिवलीतील सभेत हा व्हिडीओ सार्वजनिकरित्या दाखवला. मात्र वसंत डावखरेंनी व्हिडिओतील वक्तव्य नाकारले. व्हिडीओतील मजकूर निवडकपणे एडिट करून बदनामी करण्यासाठी वापरल्याचा वसंत डावखरेंचा आरोप होता. शिवसेनेने हा व्हिडिओ डावखरेंचाच असल्याचा दावा करत निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याची भूमिका घेतली. (Kalyan Court Summons To Uddhav Thackeray And Eknath Shinde)
नेमकं प्रकरण काय?, ऍड. हर्षल प्रधान यांनी सगळं सांगितलं- (Kalyan Court Summons To Uddhav Thackeray And Eknath Shinde)
राजकीय सभेत ला हा विषय होता आनंद परांजपे निवडणुकीसाठी उभे होते. या निवडणुकीमध्ये वसंत डावखरे यांनी पोलिसांना घाबरू नका तुम्ही बिंदास मतदान करा, त्यांची व्हिडिओ क्लिप सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी दाखवली होती. निवडणुकीमध्ये अशा क्लिप सबंधामध्ये दाखवल्या जातात त्यात विशेष काही नाही. राजकारण म्हणून त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झाले. एकनाथ शिंदेंनासुद्धा यामध्ये गुन्हेगार त्यांनी ठरवलं होतं. एकनाथ शिंदे यांनी व्हायरल केलं, वगैरे त्यावेळी ते म्हणाले होते. हे समज फक्त उद्धव ठाकरेंना नाही. तर एकनाथ शिंदेंनासुद्धा आहे...त्यांना सुद्धा 6 ऑगस्टला हजर राहण्याबाबत सांगितलं आहे. हे राजकीय केसेस असतात. सध्या आता वसंत डावखरे नाहीत. आनंद परांजपेसुद्धा शिंदेंच्या शिवसेनेत आहे. त्यामुळे अशा राजकीय केसेसला बघितलं, तर फार महत्त्व नाही. न्यायालयाचा आदर ठेवलाच पाहिजे. शिंदे गटाकडून ज्या प्रकारे या केसचे महत्व अधोरेखित केलं जात आहे की, उद्धव ठाकरे यांना समन्स बजावलं, मात्र समन्स एकनाथ शिंदेंनासुद्धा बजावण्यात आलं आहे राजकीय विषय आहे. त्यामुळे त्याला फार गांभीर्याने बघायची गरज नाही, असं शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते ऍड. हर्षल प्रधान यांनी सांगितलं.
