Kabutarkhana Jain Community Dharm Sabha: जैन समाज सर्वाधिक टॅक्स भरतो, आता आमचा नवा पक्ष, कबुतर आमचं पक्षचिन्ह, चादर-फादर सोडून सर्वांना एन्ट्री, जैन मुनींची घोषणा
Kabutarkhana Jain Community Dharm Sabha: 'कबुतरामुळं महायुतीचं सरकार जाईल', असं कबुतरांसाठीच्या धर्मसभेत जैन साधू निलेश मुनींनी इशारा दिला.

Kabutarkhana Jain Community Dharm Sabha मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईमध्ये कबूतर खाण्याचा प्रश्न गाजतोय. या आंदोलनादरम्यान काही कबुतरांचा मृत्यू झालाय आणि त्यांच्या आत्मशांतीसाठी आज (11 ऑक्टोबर) जैन धर्मियांकडून (Jain Community) मुंबईमध्ये धर्मसभा भरविण्यात आली होती. या धर्मसभेनंतर उपस्थित असणाऱ्या सर्व जैनमुनींनी एकत्र पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली.
सरकारला माझा नाही, सनातन धर्माचा इशारा आहे. महाराष्ट्राचा मराठी माणूस कबुतरांना (Kabutarkhana) विरोध करत नाहीय. त्यांना राजकारणासाठी कबूतर आणायचे आहे. आम्ही आमचा धर्म विसरणार नाही, असं जैनमुनी निलेशचंद्र विजय म्हणाले. तसेच जैन समाज सर्वाधिक टॅक्स भरतो, असंही निलेश मुनी यांनी सांगितले. आता आमची देखील संघटना असणार आहे. आम्ही महापालिकेत आमचे उमेदवार उभे करू...कबुतरांची पार्टी पाहिजे, शिवसेनेतही वाघ होता, असं म्हणत निलेश मुनींकडून जन कल्याण पार्टीची (Jan Kalyan Party) घोषणा करण्यात आली. आमच्या पार्टीचं चिन्ह कबूतर असेल, अशी घोषणा निलेशचंद्र विजय यांनी केली. ही फक्त जैनांची पार्टी नाही, ही गुजराती मारवाडीची पार्टी, असं निलेश मुनी यांनी सांगितले. तसेच आमच्या जन कल्याण पार्टीत चादर-फादर सोडून सर्वांना एन्ट्री असल्याचंही निलेशचंद्र विजय म्हणाले.
कबुतरामुळे महायुतीचं सरकार जाईल- निलेश मुनी (The Mahayuti government will fall because of pigeons - Nilesh Muni)
'कबुतरामुळं महायुतीचं सरकार जाईल', असा इशारा देखील निलेशचंद्र विजय यांनी दिला. कांद्यामुळे काँग्रेसचं सरकार गेलं, असंही निलेशचंद्र विजय म्हणाले. शिवसेना शिंदे गटाच्या मेत्या मनीषा कायंदेंनाही निलेश मुनी यांनी इशारा दिला. त्या ताई कोण त्यांना मी ओळखत नाही.मी एकनाथ शिंदेंना सांगतो, ज्या बिचाऱ्या पागल झाल्या आहेत, त्यांना आवरा... असं निलेशचंद्र विजय म्हणाले.
डॉक्टर मूर्ख, कबूतर शांतता प्रिय प्राणी- कैवल्य रत्न महाराज (Kaivalya Ratna Maharaj)
धर्मसभामध्ये जैनमूनी कैवल्य रत्न महाराज (Kaivalya Ratna Maharaj) बरळल्याचे दिसून आले. कबूतर शांतता प्रिय प्राणी आहे. आमचा धर्म सांगतो, दुसऱ्यासाठी मरायचं असेल तरी चालेल. रावणासमोर जटायू पक्षी समोर आला होता. त्यामुळे पक्षी किती महत्त्वाचा आहे, हे तेव्हापासूनच लोकांना माहिती आहे. एका पक्षासाठी श्रीराम यांनी एवढं केलं. तर या रामाच्या भूमीमध्ये असं व्हायला नको आहे. मी डॉक्टरांना पण मूर्ख मानतो. एक-दोन जण मेल्यानं काय होतं?, दररोज सामान्य माणूस मरतो, त्याचा सरकार विचार करत नाही, असं विधानही कैवल्य रत्न महाराज यांनी केलं. कबुतरखान्यावरुन राजकारण सुरु आहे. मंत्री मंगलप्रभात लोढा आज धर्मसभेत आले नाही, ही सरकारची मिलीभगत आहे, असा निशाणा देखील कैवल्य रत्न महाराज (Kaivalya Ratna Maharaj) यांनी साधला.


















