सोलापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये भाजपला मोठं यश मिळालं असून सोलापूर (Solapur) जिल्ह्यातही भाजपने दैपिप्यमान विजय मिळवला. जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूरमध्ये विजय मिळवला असल तरी, त्यांच्या घरातील सदस्यांना साताऱ्यात पराभव पत्कारावा लागला आहे. त्याच पार्श्वभूमीवर जयकुमार गोरेंना विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिलं. तसेच, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसच्या निकालावर भाष्य करताना माजी आमदार राम सातपुते (Ram satpute) यांच्या हत्येचा कट रचला गेला होता, अशी धक्कादायक माहिती मंत्री गोरे यांनी दिली. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी जयकुमार गोरे यांच्यावर गुंड म्हणत टीका केली होती, त्यावरून गोरे यांनी प्रत्त्युत्तर दिलं आहे 

Continues below advertisement

जे मला गुंड म्हणत आहेत, ते सर्वात मोठे गुंड आहेत. माळशिरसमध्ये बघा कुठल्या पद्धतीचं वातावरण आहे. अनेक कार्यकर्त्यांना मारहाण झाली, ज्या पद्धतीची भाजपला मत मिळाली आहे, ते बघून भाजप कार्यकर्त्यांना मारहाण आणि दमबाजी झाली. त्याठिकाणी माजी आमदार राम सातपुते यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. त्यातून त्यांच्या खुनाचा कट होता अशी माहिती समोर येत आहे. पोलीस याचा तपास करत आहे, असा गौप्यस्फोटच जयकुमार गोरे यांनी केला आहे. तसेच, हा कट कोणी रचला होता ते भविष्यात पोलीस तापासात समोर येईल. याबाबत कोण गुंडा आहे? हे समोर येईलच, त्यानंतर आपण चर्चा करू असेही गोरेंनी म्हटले.

साताऱ्यातील पराभवावर भाष्य

पराभव झाल्यानंतर कारण सांगण्याची मला सवय नाही, पराभव का झाला याचं विश्लेषण मी करणार नाही. मात्र, झालेला पराभव स्वीकारतो. सोलापूरकडे लक्ष होतं, त्यामुळे साताऱ्याकडे दुर्लक्ष झालं हे खरं आहे. पण, केवळ दुर्लक्ष होणे हे एकमेव पराभवाचे कारण नाही, असे म्हणत साताऱ्यात जिल्हा परिषदेला भाऊ आणि वहिनींच्या झालेल्या पराभवावर जयकुमार गोरे यांनी भाष्य केलं. तसेच, असे अनेक पराभवाचे धक्के स्वीकारलेले आहेत. या धक्क्यातून मार्ग काढून पुढे जाण्याचा नेहमी प्रयत्न करतो. राजकारणात प्रत्येक जण असा पराभव घेऊन जातो. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितले आहे, पराभव हा अंतिम नसतो आणि विजय अंतिम नसतो. केवळ, आपल्या कामात सातत्य असले पाहिजे, असेही गोरेंनी म्हटले. 

Continues below advertisement

बारामती अपघाताची चौकशी झालीच पाहिजे

रोहित पवार यांनी अजितदादा संदर्भात चौकशी झाली पाहिजे हे मत मांडले. त्यावर, चौकशी झालीच पाहिजे असं आमचं मत आहे. बारामती विमान अपघाताची चौकशी सुरू आहे. विमानाचा ब्लॅक बॉक्स मिळालेला आहे, त्यामुळे त्याबाबतीत अधिकच बोलणं योग्य नाही. चौकशीसाठी कुठली एजन्सी असली पाहिजे, याचा निर्णय सुरक्षा एजन्सी घेतील. सुरक्षा यंत्रणा राज्य आणि केंद्र सरकार ठरवतील, अशी प्रतिक्रिया मंत्री गोरे यांनी दिली. 

पक्षापेक्षा आम्ही मोठे हे दाखवण्याचा काहींचा प्रयत्न

भाजपमध्ये पण अशी काही लोक आहेत ज्या पद्धतीने भाजप पुढे जातो आहे ते नको आहे. भाजपचं यश काही लोकांना पचत नव्हतं, काही लोक आजही आहेत. येथे व्यक्ती म्हणून कोणी नाही, भाजपचे केडर आहे. येथे संघटन आहे म्हणून आम्ही जिंकलो आहोत. जयकुमार गोरे किंवा इतर कोणी आहे म्हणून नाही, असे म्हणत सोलापूर जिल्ह्यातील भाजपा अंतर्गत राजकारणावर जयकुमार गोरेंनी भाष्य केलं. पालकमंत्री अपयशी झाल्यानंतर काय करायचं, याचाही प्लॅन आखला गेला होता. जर बहुमत नाही मिळालं तर कोणाला सोबत घ्यायचं, याचाही प्लॅन केला गेला होता. पक्ष आणि पक्ष नेतृत्वाला बदनाम करण्याचा प्लॅन होता. पक्षापेक्षा आम्ही कसे मोठे आहोत हे दाखवण्याचा काही जणांचा प्रयत्न होता. पण मी भाजपच्या कार्यकर्ते आणि जनतेचे आभार मानतो. कोणत्याही अमिषाला बळी न पडता आमच्यामागे उभे राहिले, अशी प्रतिक्रिया गोरेंनी दिली. 

हेही वाचा

मोठी बातमी! एकनाथ खडसेंना हायकोर्टाकडून मोठा दिलासा; पुण्यातील भोसरी जमीन घोटाळाप्रकरणातील खटला