Jaykumar Gore on Supriya Sule: आगामी विधान परिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election 2026) शेवटच्या क्षणाला महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) अनेक उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे सत्ताधारी महायुतीला (Mahayuti) मोठा फायदा झाला होता. यावरून शरद पवार गटाच्या (Sharad Pawar Faction) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी या निवडणुकीत प्रचंड घोडेबाजार झाल्याचा आरोप केला होता. या आरोपांना आता सत्ताधाऱ्यांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले असून, राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे.

Continues below advertisement

Jaykumar Gore on Supriya Sule: पुण्यात कितीचा घोडेबाजार झाला? गोरेंचा सुळेंना सवाल

"विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने मोठा घोडेबाजार झालाय मला तोंड उघडायला लावू नका, असे म्हणणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांचे तोंड बंद कधी होते? पुण्यातील उमेदवार त्यांनी का आणि कोणाच्या परवानगीने मागे घेतला? पुण्यात कितीचा घोडेबाजार केला?" असा उलट सवाल राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सुप्रिया सुळे यांना केला आहे. 

Supriya Sule: नेमकं काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे? 

सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या की, "भारतीय जनता पक्षाने मला तोंड उघडायला लावू नये. मी सुसंस्कृतपणे काही बोलत नाहीये. माझा तो स्वभाव देखील नाही. मात्र, विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही भाजपाच्या विरोधात ताकदीने लढू. आता विधानपरिषदेच्या निवडणुकीत जो काही घोडेबाजार झाला आहे, तो घोडेबाजार कसा झाला? याबाबत बऱ्याच गोष्टी तुम्हालाही माहिती आहेत आणि मलाही माहिती आहेत. कोणत्याही निवडणुकीत होणारे घोडेबाजार बंद झाले पाहिजेत, त्यामुळे मी आता लवकरच संसदेत एक विधेयक मांडणार आहे. कोणतीही निवडणूक फक्त पैशांच्या जीवावर कोणीही लढू नये. तसेच कोणीही सीबीआय, ईडी, इनकम टॅक्सची भिती देखील दाखवू नये."

Continues below advertisement

Jaykumar Gore on Rohit Pawar: रोहित पवारांच्या 'अन्नत्याग आंदोलना'वर टीका

दुसरीकडे, शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी (Farmers Loan Waiver) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हे 12 जूनपासून पंढरपुरात 'अन्नत्याग आंदोलन' करणार आहेत. अन्नदात्यासाठी हे आंदोलन केले जात असून पंढरपूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात विठ्ठलाचे दर्शन घेऊन रोहित पवार आंदोलन सुरू करतील. यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या स्थानिक नेत्यांकडून नियोजन सुरू आहे. या आंदोलनावरून जयकुमार गोरे यांनी रोहित पवारांची खिल्ली उडवली आहे. गोरे म्हणाले की, "राज्यात कर्जमाफी झाली हे रोहित पवारांना माहिती नाही. ते सध्या विमानाने दिल्ली वारी करत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची माहिती नसल्याने ते पंढरपुरात येऊन अन्नत्याग आंदोलन करण्याची घोषणा करत आहेत," असे त्यांनी म्हटले. 

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Pune Crime News: पुण्यात मध्यरात्री पोलिसांची मोठी कारवाई, 'प्रोजेक्ट एक्स' हाऊस पार्टीवर क्राईम ब्रँचची रेड, तरुण-तरुणी पोलिसांच्या ताब्यात