Jaykumar Gore सोलापूर : आमचा सुफडा साफ करणाऱ्यांच्या पेक्षा एमआयएमची लायकी जास्त आहे. सोलापूर महापालिकेत काँग्रेसला दोन जागा आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला खातेही उघडता आले नाही. तर एमआयएम (MIM) यांच्या पेक्षा मोठा पक्ष ठरलाय. एमआयएमची (MIM) लायकी यांच्यापेक्षा जास्त आहे. भाजपला संपवणारे अजून जन्माला यायचे आहे, अशी सडकून टीका ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी केली आहे. शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपचा सुखडा साफ करायचा आहे, असे भाषणात सांगितले होते. दरम्यान मंत्री जयकुमार गोरे यांनी याच वक्तव्याचा समाचार घेत याटीकेलाप्रत्युत्तरदिलंआहे. त्यामुळे आता जिल्हा परिषद निवडणुकी मधील प्रचार अधिक टोकेरी होऊ लागला आहे.
Jaykumar Gore on Dhairyasheel Mohite Patil: हत्ती चालतो कुत्री भुंकत असतात. पण हत्तींनी तोंड वळवल्यावर काय होईल?
नगरपालिका निवडणुकीत तुतारी अकलूजच्या बाहेर वाजलीच नाही. त्यामुळे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आता कोणाचा सुपडा साफ करणार? असा उलट सवालही गोरे यांनी केला आहे. तर हत्ती चालतो कुत्री भुंकत असतात. पण हत्तींनी तोंड वळवल्यावर काय होईल? असेम्हणत जयकुमार गोरे यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांना इशाराहीदिलाआहे.
Jaykumar Gore on Dhairyasheel Mohite Patil: मुख्यामंत्र्यानी छत काढले तर कारखान्याच्या गव्हाण बंद पडतील
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा संघर्ष आता टोकाला जाऊ लागला असून काल (रविवारी) रात्री पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे झालेल्या सभेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मोहिते पाटलांना थेट इशारा देत फडणवीस यांनी छत काढले तर कारखान्याच्या गव्हाण बंद पडतील, असा इशारा दिला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोहिते पाटील यांना अडचणीच्या काळात छत दिले. पश्चिम महाराष्ट्रातील संपलेल्या घराण्याला ताकत दिली आणि तुम्ही आज त्यांच्याच विरोधात बोलत आहात, नाचत आहात, असे म्हणत धैर्यशील मोहिते पाटील यांना टोला लगावला.
Jaykumar Gore : अनेकांचे संसार मोहिते पाटील यांनी देशोधडीला लावले, बँका बुडवल्या
दरम्यान, हत्ती बाजारातून जाताना कुत्री भुंकत असतात. हत्ती त्याकडे लक्ष देत नसतो. पण हत्तीने सोंड फिरवल्यावर काय होईल याचा विचार करा, असा थेट इशाराच जयकुमार गोरे यांनी दिला. अनेकांचे संसार मोहिते पाटील यांनी देशोधडीला लावले, बँका बुडवल्या. इतकी पाप केले आहेत. पण तुमच्यावर टीका करून आम्हाला निवडणूक जिंकायची नाही. आमच्याकडे विकास कामे आहेत. पण तुम्ही मर्यादेत रहा. अशा शब्दात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी थेट मोहिते पाटील यांना इशारा दिला आहे.
सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने मोहिते पाटील विरुद्ध भाजपअसा संघर्ष सुरू आहे. खासदार धैर्यशील मोहिते पाटील अनेक सभांमधून भाजपचा सुपडा साफ करायचा असल्याचे बोलतात. याच मोहिते पाटलांच्या वक्तव्याचा जयकुमार गोरे यांनी चांगला समाचार घेतला आहे.
