Jayant Patil, सांगली : "मी प्राध्यापक डॉ. एनडी पाटील साहेब यांचा प्रचंड आदर करतो. कारण या माणसाने कधीच विचारांशी प्रतारणा केली नाही. कधी विचार बदले नाहीत. कधी भूमिका बदलेले नाहीत. एनडी पाटलांनी सत्ता इकडून तिकडे गेली म्हणून कधी उडी मारलेली ऐकलंय का? नाही म्हणजे नाही.. या माणसाचं महात्म्य त्यातच आहे", असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील म्हणाले. प्रा एन डी पाटील महाविद्यालय - संशोधन केंद्र व बहुउद्देशीय सभागृहाचा उद्घाटन सोहळा सांगली येथे पार पडला. यावेळी जयंत पाटील बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, एनडी पाटील यांच्या पत्नी सरोज पाटील आणि आमदार रोहित पवार देखील उपस्थित होते.
जयंत पाटील म्हणाले, मी व्यासपीठावरील दोन्ही दादांना सांगतो, वाळवा हा खूप स्वाभिमानी लोकांचा तालुका आहे. या तालुक्याचे वैशिष्ट्य आहे, सहजा सहजी वाकत नाही, घाबरून जात नाही. कितीही फंदफितुरी झाली तरी इथली माणसं स्वाभिमानाने राहतात. प्रा. एन. डी. पाटील साहेबांनी हे शिकवलं आहे. कायदाच पालन होणं ही वेगळी गोष्ट आहे, पण न्याय मिळेल ही आता अवघड गोष्ट आहे. माणसं वर गेली तरी एक एक निकाल लागत नाहीत.
रोहित पवार म्हणाले, अजितदादा आता गावकीचा विचार करतात, भाविकाला मात्र विसरले. एकत्र असताना भाषणाचे कौतुक करायचे मला मार्गदर्शन करत होते. मंत्री पद गेले तरी काही जण बंगला सोडत नाहीत. एन डी पाटलांच्याकडून त्यांनी आदर्श घ्यावा. जयंत पाटील, स्वर्गीय आर आर पाटील, स्वर्गीय पतंगराव कदम यांनी सांगली जिल्ह्याच्या विकासाचा विचार केला. चंद्रकांतदादा तुम्ही भाजपचे असला तरी खरे सोने आहात. पण आताच्या काळात काही बेनटेक्सचे सोने खालच्या थराला जाऊन बोलत आहेत. भाजपच्या खऱ्या सोन्याची दखल घेण्याची गरज आहे
चंद्रकांत पाटील म्हणाले, माझा नंबर भाषणात शेवटी शेवटी लागतो. सरोजा ताई पाटील फक्त त्या शरद पवार यांच्या बहिणी किंवा एन डी पाटील यांच्या पत्नी आहेत म्हणून मी त्यांच्याकडे जात नाही. त्या स्वतः कर्तृत्ववान आहेत. मी एक गिरणी कामगाराचा मुलगा आहे. तुमच्यासारखा कुणासारखा सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या