एक्स्प्लोर

Jayant Patil: खातं एकनाथ शिंदेंकडे, निर्णय मात्र मुख्यमंत्री फडणवीस घेताय; पर्यायी रस्ता असताना शक्तिपीठचा अट्टाहास का? कोल्हापुरातील जनआंदोलनातून जयंत पाटलांचा सरकारला सवाल

Shaktipeeth Express Way : जणू काही महाराष्ट्रातील सगळे प्रश्न संपले, आता फक्त शक्तिपीठ महामार्ग राहिला आहे, अशा अविर्भावात सरकार वागत असल्याचे सांगत आमदार जयंत पाटील यांनी सरकारवर तोफ डागली आहे.

Jayant Patil: न मागितलेल्या रस्त्याच्या विरोधात आज आपण आंदोलनं (Shaktipeeth Express Way Kolhapur) करतोय. आजपर्यंत गावचा रस्ता करा, पणांद रस्ता करा, म्हणून सरकारकडे हेलपाटे मारावे लागत होते. मात्र आज चित्र वेगळं आहे. या महामार्गाचे नाव शक्तीपीठ (Shaktipeeth Express Way)  आहे. शक्तिपीठ महामार्ग पंढरपूरपासून दूर नेला आहे. हा शक्तिपीठ महामार्ग नेमकं कशासाठी आहे? महाराष्ट्रातील बंदरांकडे रस्ता जाईना, पण गोव्याकडे महामार्ग जातोय. नागपूर (Nagpur) जिल्ह्यात शक्तीपीठ आहेत का? या प्रश्नावर सरकारकडे उत्तर नाही. सातारा, पुणे, कोल्हापूर हा रस्ता अनेक वर्ष होत नाही. या सरकारकडून हातात घेतलेल्या प्रकल्पाची पूर्तता होत नाही. जणू काही महाराष्ट्रातील सगळे प्रश्न संपले, आता फक्त शक्तिपीठ महामार्ग राहिला आहे, अशा अविर्भावात सरकार वागत असल्याचे सांगत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सरकारवर तोफ डागली आहे.

या संदर्भात खातं एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे आणि निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेत आहेत. या मोर्चातून बोध घेऊन सरकारने शक्तिपीठाचा आग्रह सोडावा. असेही जयंत पाटील म्हणाले. कोल्हापूर जिल्ह्याची ताकद राज्यातल्या अन्य कोणत्याही जिल्ह्यापेक्षा वेगळी आहे. असेही ते म्हणाले. शक्तिपीठ महामार्गविरोधात कोल्हापुरातील (Kolhapur) जनआंदोलनात ते बोलत होते.

Jayant Patil on PM Modi : देशाचे पंतप्रधान कोणाकडून तेल खरेदी करायचं हे ठरवू शकत नाही

दरम्यान, पर्यायी रस्ता असताना शक्तिपीठचां अट्टाहास धरला जात आहे. या रस्त्यासाठी एक लाख कोटी खर्च करायचा, हे सरकारचे पहिले टार्गेट आहे. आपला निर्णय आता भारत सरकार घेत नाही. व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षाला अमेरिका रात्रीत अटक करून घेऊन जाते. याची भीती आणखी कोणाला आहे का? आता आपल्या देशाचे पंतप्रधान कोणाकडून तेल खरेदी करायचं हे ठरवू शकत नाहीत. रुपयाच अवमूल्य मागच्या काही वर्षात जेवढे झालं तेवढं स्वातंत्र्यानंतरच्या काळात कधीच झालं नव्हतं. आशिया खंडातील सगळ्या करन्सी व्यवस्थित आहेत, आपलीच करन्सी खाली चालली आहे. देशावर कर्ज वाढलं आहे, ते फेडण्यासाठी सर्वसामान्यांना कंगाल करण्याचे काम सुरू आहे. मंत्र्याला वाटलं की त्याच्या गावाकडे हा शक्तीपीठ महामार्ग वळवला जात आहे. पंढरपूरमधून गेला नाही तरी चालेल, पण मंत्र्याच्या गावातून शक्तिपीठ महामार्ग गेला पाहिजे ही भूमिका आहे. कारण तिथे आधीच जमिनी घेऊन ठेवल्या आहेत, असा आरोप करत जयंत पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

Jayant Patil: कोल्हापूर जिल्ह्याची ताकद राज्यातल्या अन्य कोणत्याही जिल्ह्यापेक्षा वेगळी

लोकमताच्या विरोधात जाऊन असे रस्ते करणे योग्य नाही. सरकारी यंत्रणांना ही आवाहन आहे, या लढाईत कोणी राहीलं नाही तरी राजू शेट्टी शेवटपर्यंत टिकणार आहे. त्यांचा माझ्यावर नाही पण माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. सत्तेत असणाऱ्या आमदारांना माझी विनंती आहे, त्यांनी घाबरून जाऊ नये. तुम्ही ठामपणे तुमच्या विरोधाची भूमिका मांडा. या संदर्भात खातं एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे आणि निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेत आहेत. या मोर्चातून बोध घेऊन सरकारने शक्तिपीठाचा आग्रह सोडावा. असेही जयंत पाटील म्हणाले. कोल्हापूर जिल्ह्याची ताकद राज्यातल्या अन्य कोणत्याही जिल्ह्यापेक्षा वेगळी आहे. असेही ते म्हणाले.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
Nilesh Rane : 'ज्यांनी राणेंचा तिरस्कार केला, ते स्वतःच 'हिट विकेट' झाले', निलेश राणेंचा विनायक राऊतांना जोरदार टोला!
'ज्यांनी राणेंचा तिरस्कार केला, ते स्वतःच 'हिट विकेट' झाले', निलेश राणेंचा विनायक राऊतांना जोरदार टोला!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : होर्मुझमधून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, इराणकडून अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरुच
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, ट्रम्प यांची घोषणा  
Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
INDW vs ENGW: भारताच्या लेकींनी लॉर्डसवर इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, क्रांती गौड, यास्तिका भाटियाची दमदार कामगिरी
भारताच्या लेकींनी इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, लॉर्डसवरील पहिल्याच कसोटीत विजयाचा झेंडा रोवला
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मुंबईतील सिमेंट रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाची SIT चौकशी करा; अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका, काँग्रेसचा इशारा
मुंबईतील सिमेंट रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाची SIT चौकशी करा; अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका, काँग्रेसचा इशारा
Embed widget