एक्स्प्लोर

Ajit Pawar: मुलांचा अभ्यास घेतानाचे अजितदादा, लेकरांवर जीवापाड प्रेम करणारा बाप; जय पवारांनी शेअर केला अजित पवारांचा डोळे पाणावणारा व्हिडीओ

Ajit Pawar: व्हिडीओमध्ये अजित पवारांचे आपल्या कुटूंबासोबत घातवलेले क्षण, बहिणी, आई, मुलं, पवार परिवार, शरद पवार, जय पवार, पार्थ पवार, सुनेत्रा पवार या सगळ्यांसोबतचे काढलेले फोटो आहेत.

Ajit Pawar Video: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अन् राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन होऊन जवळपास महिना होत आला आहे, पण ते या जगात नाहीत; यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. 28 जानेवारी 2026 रोजी मुंबईहून बारामतीच्या दिशेने प्रवास करत असताना त्यांच्या विमानाचा भीषण अपघात (Ajit Pawar Plane Crash) झाला. या दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. 29 जानेवारी 2029 रोजी त्यांच्या पार्थिवावर बारामतीतील विद्या प्रतिष्ठान कॉलेजच्या प्रांगणामध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून समर्थकांनी बारामतीत गर्दी केली होती. हजारो डोळ्यांत एकच प्रश्न होता की हे खरंच घडलं का?. सोशल मीडियावर अजित पवार यांचे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल (Video Viral) होते. नेटकरीही त्यांचे व्हिडीओ शेअर करून श्रद्धांजली वाहत आहेत. अशातच अजित पवारांचे धाकटे सुपूत्र जय पवार यांनी अजित पवारांचे जुने फोटो एकत्र केलेला एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अजित पवारांचे आपल्या कुटूंबासोबत घातवलेले क्षण, बहिणी, आई, मुलं, पवार परिवार, शरद पवार, जय पवार, पार्थ पवार, सुनेत्रा पवार या सगळ्यांसोबतचे ते काढलेले फोटो आहेत. हा व्हिडीओ सर्वानांच भावनिक करणारा आहे.(Ajit Pawar Video)

अजित पवारांचा हा व्हिडीओ पाहताना पाणावतील

अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी हा एक अतिशय भावुक व्हिडीओ शेअर केला आहे. अजित पवार यांच्या अंत्यविधीच्या दिवसाचे क्षण या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. जय पवार यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ पाहताना डोळे नकळत पाणावतात. या व्हिडीओमध्ये एक भयाण शांतता, हजारो चेहऱ्यांवर दिसणारी वेदना-दुःख, कार्यकर्त्यांचे ओले डोळे आणि मनात दाटून आलेली पोकळी जाणवतेय. कारण अजित पवारांचा शेवट अशा पद्धतीने होईल, याची कोणीही कधीही कल्पना केलेली नसावी. त्याचबरोबर अजित पवारांनी आपल्या परिवारासोबत घालवलेले आनंदाचे, प्रेमाचे क्षण देखील या व्हिडीओमध्ये दिसतात, दादांचे तरूणपणातील फोटो, लग्नातील, परिवारासोबतचे काढलेले फोटो यांचा हा एक मिळून व्हिडीओ बनवण्यात आला आहे.

व्हीएसआर कंपनीवर अखेर बडगा; डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेऊन जाणारे लीअरजेट ४५ (व्हीटी-एसएसके) हे खासगी विमान गेल्या महिन्यात बारामती जवळ कोसळले होते. त्यानंतर 'डीजीसीए'ने केलेल्या विशेष सुरक्षा लेखापरीक्षणात विमानाची उड्डाण तांत्रिक क्षमता, हवाई सुरक्षा आणि उड्डाण कार्यप्रणाली मंजूर प्रक्रियांमध्ये अनेक गंभीर त्रुटी आढळल्या आहेत.

४ विमानांच्या उड्डाणांवर तात्पुरती बंदी

डीजीसीएने मेसर्स व्हीएसआर वेंचर्स प्राय. लिमिटेड या विमान कंपनीच्या व्हीटी-व्हीआरए, व्हीटी-व्हीआरएस, व्हीटी-व्हीआरव्ही आणि व्हीटी-टीआरआय या चार विमानांच्या उड्डाणांवर तात्पुरती बंदी घातली आहे. ही बंदी लीअरजेट ४०/४५ जातीची विमाने उड्डाण योग्यतेचे निकष पूर्ण होईपर्यंत राहणार आहे. डीजीसीएने संबंधित त्रुटींवर मूळ कारणे सादर करण्यास सांगितले आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
पुलाखालून अजून बरच पाणी जायचंय, साताऱ्यात भाजपचा अध्यक्ष होण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणार, मंत्री गोरेंची क्रीडा महोत्सवात जोरदार फटकेबाजी 
पुलाखालून अजून बरच पाणी जायचंय, साताऱ्यात भाजपचा अध्यक्ष होण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणार, मंत्री गोरेंची क्रीडा महोत्सवात जोरदार फटकेबाजी 
मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका
मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
Embed widget