एक्स्प्लोर

Rohit Pawar: जय पवार म्हणाले, 2029 मध्ये सुनेत्रा वहिनी मुख्यमंत्री; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, आधी भाजपला...

Rohit Pawar: आमची ही इच्छा होती आणि दादांचीही इच्छा होती की 2029 मध्ये मुख्यमंत्री पदासाठी प्रयत्न करावे. आमची इच्छा कुणासाठी होती तर ती अजितदादांसाठी होती.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आगामी 2029 च्या विधानसभा निवडणुकीत बारामतीमधून कोण, याची स्पर्धाच लागली आहे. बारामती पोटनिवडणुकीदिवशीच जय पवार (Jay Pawar) यांनी बारामती विधानसभेसाठी 2029 मध्ये कोण याची चर्चा केल्यानंतर रोहित पवार (Rohit Pawar) आणि युगेंद्र पवार यांनीही भाष्य केलं होतं. त्यामुळे, एका जागेसाठी तीन पवार मैदानात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. त्यानंतर, जय पवार यांनी आज पुन्हा 2029 साठी बारामतीमधून सुनेत्रा पवारच उमेदवार असतील असे म्हटले. त्यासोबत, त्या मुख्यमंत्रीपदाच्या (Chief minister) उमेदवार असतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. आता, त्यांच्या या वक्तव्यावर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपचा विरोध केल्याशिवाय 

आमची ही इच्छा होती आणि दादांचीही इच्छा होती की 2029 मध्ये मुख्यमंत्री पदासाठी प्रयत्न करावे. आमची इच्छा कुणासाठी होती तर ती अजितदादांसाठी होती. अजित दादा कार्यकर्त्यांमध्ये मिसळून दोन्ही पक्ष एकत्रित आल्यानंतर कार्यकर्त्यांना बळ मिळेल आणि रस्त्यावरची लढाई लढून 2029 मध्ये आपण मुख्यमंत्री होऊ शकतो, अशी दादांची इच्छा होती. मला असं वाटतं की, या राज्यात भाजप सोडून दुसरा कोणताही मुख्यमंत्री होऊ शकत नाही आणि दुसऱ्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हायचा असेल तर भाजपला विरोध करावाच लागेल, असे म्हणत रोहित पवार यांनी जय पवार यांच्या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिली. 

जर दादांच्या शेवटच्या चार महिन्यांचे वक्तव्य बघितले तर दादा भाजपचा विरोधच करत होते. जर आपण कुणी मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न बघत असाल तर भाजपचा विरोधच करावा लागेल, अशा शब्दात राष्ट्रवादी आणि जय पवार यांना भाजपला विरोध केल्याशिवाय मुख्यमंत्री होता येणार नाही, असे रोहित पवार यांनी सूचवले आहे. तसेच, देवेंद्र फडणवीस हे मोठे नेते आहेत व हुशार आहेत व त्यांच्यानंतर जर कोणी भाजपचा मुख्यमंत्री होणार असेल तर तो सांग काम्या असेल. विरोधी पक्षाचा आणि इतर पक्षाचा मुख्यमंत्री तिथे होणार नाही, असेही रोहित पवार यांनी परखडपणे सांगितले.

काय म्हणाले जय पवार

बारामतीत 2029 च्या विधानसभेच्या निवडणुकांच्या अनुषंगानेही राष्ट्रवादीचे युवा नेते तथा अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. काही दिवसांपूर्वी आमची सहकाऱ्यांसोबत चर्चा झाली, सर्वच बारामतीकरांची इच्छा होती की, दादांना एकदा मुख्यमंत्री पाहायचं आहे. आता, वहिनी देखील खूप कष्ट घेत आहेत, मला वाटतं 2029 ला बारामतीतून विधानसभेला वहिनीच उभा राहतील आणि आमची सर्वांची आशा आहे की, सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून ती जागा घ्यायला पाहिजे, असे वक्तव्य जय पवार यांनी केले आहे.

हेही वाचा

विधानसभेतील पराभवानंतर अखिलेश यादव CM ममता बॅनर्जींना भेटले; म्हणाले, तुम्ही हरलेल्या नाहीत

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satara Shivsena : साताऱ्यातील वादावर पडदा, शिवसेनेचे प्रत्येक मत महायुतीच्या उमेदवारालाच द्या; एकनाथ शिंदेंचा शंभूराज देसाईंना आदेश
साताऱ्यातील वादावर पडदा, शिवसेनेचे प्रत्येक मत महायुतीच्या उमेदवारालाच द्या; एकनाथ शिंदेंचा शंभूराज देसाईंना आदेश
संविधानकर्ते अन् नेहरुंचीही हिंमत झाली नाही, ते मोदींनी करुन दाखवलं; आर्टिकल 370 वरुन आमदार प्रमोद जठारांचं वक्तव्य
संविधानकर्ते अन् नेहरुंचीही हिंमत झाली नाही, ते मोदींनी करुन दाखवलं; आर्टिकल 370 वरुन आमदार प्रमोद जठारांचं वक्तव्य
Dharashiv : भाजपने पैशांच्या बळावर उमेदवार फोडले आता मतदार फोडतेय, काँग्रेसच्या उमेदवाराचा आरोप
Dharashiv : भाजपने पैशांच्या बळावर उमेदवार फोडले आता मतदार फोडतेय, काँग्रेसच्या उमेदवाराचा आरोप
Manda Mhatre on Ganesh Naik : गणेश नाईक विरुद्ध मंदा म्हात्रे वाद आता 'सागर' बंगल्यावर, म्हात्रेंनी घेतली फडणवीसांची भेट, राष्ट्रवादीपासून ते भाजपपर्यंत दिलेल्या त्रासाचा पाढाच वाचला
गणेश नाईक विरुद्ध मंदा म्हात्रे वाद आता 'सागर' बंगल्यावर, म्हात्रेंनी घेतली फडणवीसांची भेट, राष्ट्रवादीपासून ते भाजपपर्यंत दिलेल्या त्रासाचा पाढाच वाचला
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Goras Bhandar FDA Action Wardha: तुकाराम मुंढेंच्या कारवाईला गोरस भंडारचे हायकोर्टात आव्हान
Sudhir Mungantiwar on Opration Tiger : ठाकरेंचे खासदार देशहितासाठी सोबत येत असतील तर स्वागतच - सुधीर मुनगंटीवार
Shahajibapu Patil Solapur: गणेश नाईकांनी शरद पवारांच्या मदतीने सरकार पाडायचा केला होता प्रयत्न
Sanjay Raut Delhi: आई,साईबाबा तर कोणी मुलाची शपथ घेतली; खासदारांनी ठाकरेंना शब्द दिल्याचा दावा
TMC MP Merged With Small Party : आता छोटा पक्ष, नंतर मोठं लक्ष्य | ABP Majha Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच चटई अंथरुन रुग्णांवर उपचार; सलाईन नाही अब्रू टांगली, रोहित पवारांकडून फोटो शेअर
आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच चटई अंथरुन रुग्णांवर उपचार; सलाईन नाही अब्रू टांगली, रोहित पवारांकडून फोटो शेअर
संविधानकर्ते अन् नेहरुंचीही हिंमत झाली नाही, ते मोदींनी करुन दाखवलं; आर्टिकल 370 वरुन आमदार प्रमोद जठारांचं वक्तव्य
संविधानकर्ते अन् नेहरुंचीही हिंमत झाली नाही, ते मोदींनी करुन दाखवलं; आर्टिकल 370 वरुन आमदार प्रमोद जठारांचं वक्तव्य
Vidhan Parishad Election : आमचा निर्णय मतदानाच्या आधी होईल; शंभुराज देसाईंचं मोठं वक्तव्य, सांगली-सातारा निवडणुकीत महायुतीचा तिढा कायम?
आमचा निर्णय मतदानाच्या आधी होईल; शंभुराज देसाईंचं मोठं वक्तव्य, सांगली-सातारा निवडणुकीत महायुतीचा तिढा कायम?
Nagpur Crime News: प्लॉट खरेदीचा बहाणा, अश्लील व्हिडिओ, धर्मांतराचा दबाव; भेटायला बोलावून नको ते केलं अन्..., वायुसेना अधिकाऱ्याच्या पत्नीसोबतच्या 'त्या' घटनेने नागपूर हादरलं
प्लॉट खरेदीचा बहाणा, अश्लील व्हिडिओ, धर्मांतराचा दबाव; भेटायला बोलावून नको ते केलं अन्..., वायुसेना अधिकाऱ्याच्या पत्नीसोबतच्या 'त्या' घटनेने नागपूर हादरलं
शिर्डी साईचरणी वर्षभरात भरभरुन दान; पण गतवर्षीच्या तुलनेत कमी, देवस्थानच्या एकूण ठेवी, सोनं-चांदी किती?
शिर्डी साईचरणी वर्षभरात भरभरुन दान; पण गतवर्षीच्या तुलनेत कमी, देवस्थानच्या एकूण ठेवी, सोनं-चांदी किती?
Pratap Sarnaik: 'ऑपरेशन टायगर सुरूच असतं, कोणाला त्यांच्या पक्षात आवडत नसेल तर आमचे दरवाजे कायम खुले'; मंत्री प्रताप सरनाईकांच सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
'ऑपरेशन टायगर सुरूच असतं, कोणाला त्यांच्या पक्षात आवडत नसेल तर आमचे दरवाजे कायम खुले'; मंत्री प्रताप सरनाईकांच सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
धक्कादायक! खराब रस्त्यामुळे गावात रुग्णवाहिका पोहोचलीच नाही; प्रसुतींतर महिलेचा मृत्यू, ग्रामस्थांचा संताप
धक्कादायक! खराब रस्त्यामुळे गावात रुग्णवाहिका पोहोचलीच नाही; प्रसुतींतर महिलेचा मृत्यू, ग्रामस्थांचा संताप
Chandrapur Congress: धानोरकर गटातील सर्व 16 नगरसेवकांना अपात्र घोषित करा; काँग्रेस गटनेते राजेश अडुर यांची आयुक्तांकडे मागणी, चंद्रपूर महापालिकेतील गटनेते पदाचा वादाचा नवा अंक!
धानोरकर गटातील सर्व 16 नगरसेवकांना अपात्र घोषित करा; काँग्रेस गटनेते राजेश अडुर यांची आयुक्तांकडे मागणी, चंद्रपूर महापालिकेतील गटनेते पदाचा वादाचा नवा अंक!
Embed widget