Jay Pawar: दररोज रात्री आमचे दौरे संपायचे तेव्हा दादांचा मला फोन यायचा, "काय रे जय, कसा दौरा झाला", असे म्हणणारा आवाज आता नाही. आजही मला तोच आवाज ऐकू येतोय, दादा एकदम ठामपणाने बोलायचे, 'जयड्या रडायचं नाही, लढायचं', असे भावनिक भाषण अजित पवार (Ajit Pawar) यांचे सुपुत्र जय पवार (Jay Pawar) यांनी केले. बारामती पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या प्रचारासाठीची सांगता सभा पार पडली. या सभेतून जय पवार बोलत होते.  

Continues below advertisement

जय पवार म्हणाले की, शेवटची सांगता सभा झाली तेव्हा अजितदादांच्या समोर भाषण केले होते. सांगता सभेत पहिले भाषण केले. ते त्यांच्यासमोरील शेवटच ठरलं. आता ही निवडणूक आम्ही हातात घेतली आहे. हा प्रचार नाही तर मी माझ्या बारामतीच्या कुटुंबाला भेटत आहे. त्यांच्या अडचणी ऐकून घेत आहे. अजित दादांच्या वेळी प्रचार करायला मला आवडायचं. पाच वर्षांनी प्रचार असायचा. रॅली काढायचो. पण यावेळी मला दादांचा आवाज आठवतोय. दररोज रात्री आमचे दौरे संपायचे तेव्हा दादांचा मला फोन यायचा, "काय रे जय, कसा दौरा झाला", असे म्हणणारा आवाज आता नाही. 

Jay Pawar: अजितदादांनी जातीपातीचे राजकारण कधीही केले नाही

आजही मला तोच आवाज ऐकू येतोय, दादा एकदम ठामपणाने बोलायचे, 'जयड्या रडायचं नाही, लढायचं". दादा बारामतीचं सर्वात मोठं कुटुंब सोडून गेलेत. पण, दादा जाता-जाता इतिहास घडवून गेले. पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार राज्याला लाभल्या, असे देखील जय पवार म्हणाले. अजितदादांनी जातीपातीचे राजकारण कधीही केले नाही. अजितदादांचे महाराष्ट्रभर मोठे योगदान होते. दादांनी सर्वांना एकत्रित घेऊन काम केले. ही निवडणूक बिनविरोध झाली असती तर अजितदादांना खरी श्रद्धांजली लाभली असती. पण नियतीमुळे तसं झालं नाही, अशी खंत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. 

Continues below advertisement

Jay Pawar: बारामतीकर I Love You Too

जय पवार पुढे म्हणाल्या की, अजितदादांचं अपूर्ण स्वप्न करण्यासाठी जिंकण्याचा निर्धार केलाय. 23 तारखेला सुनेत्रा वहिनींना प्रचंड मतांनी निवडून द्यायचं आहे. जसे दादांवर तुम्ही अनेक वर्ष प्रेम केलं, जसं दादांनी तुमच्यावर अनेक वर्ष प्रेम केलं, तसंच प्रेम तुमची सुनेत्रा वहिनींना द्या. आज मी दादांचा उल्लेख बारामतीकरांसाठी करत आहे. बारामतीकर I Love You Too..., असे त्यांनी म्हटले.

आणखी वाचा 

Chhagan Bhujbal : बारामतीतील सांगता सभेत छगन भुजबळ बोलताना सुप्रिया सुळेंची एंन्ट्री; दादांच्या नावानं घोषणा, पवार कुटुंबीयांसाठी भावूक क्षण