नवी दिल्ली: दिल्लीतील जंतर-मंतरवर २३ जुलै रोजी झालेल्या आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अपशब्द वापरल्याचा आरोप असलेल्या विद्यार्थिनीचा माफी मागतानाचा एक व्हिडिओ (jantar mantar viral girl) सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती स्वतःचे वय १५ वर्षे असल्याचे सांगत असून हात जोडून देशाची माफी मागताना दिसत आहे.(jantar mantar viral girl)

Continues below advertisement

jantar mantar viral girl apologized : 'मित्रांसोबत गेले होते, लोकांच्या चिथावणीला बळी पडले'

व्हायरल व्हिडिओमध्ये ती मुलगी म्हणत आहे की, ती कनॉट प्लेस येथे फिरण्यासाठी गेली होती आणि त्यानंतर मित्रांसोबत आंदोलनात सहभागी झाली. तेथे उपस्थित लोकांच्या प्रभावाखाली आणि चिथावणीला बळी पडल्यामुळे तिच्याकडून असे वक्तव्य घडले. ती पुढे म्हणाली, "मी जे काही बोलले आहे ते क्षमायोग्य नाही. ही माझी पहिली आणि शेवटची चूक आहे. मला स्वतःची खूप लाज वाटत आहे आणि मी संपूर्ण देशाची माफी मागते."(jantar mantar viral girl) या मुलीचा व्हिडीओ सोशल मिडीयावरती व्हायरल होत असून, काही वृत्तसंस्थांनी देखील याबाबतची माहिती दिली आहे. 

jantar mantar viral girl apologized : पंतप्रधान मोदींचे वक्तव्य अन् माफीनामा

शुक्रवारी पंतप्रधानांनी इंस्टाग्रामवर एक वक्तव्य जारी केले होते, ज्यामध्ये त्यांनी आंदोलनादरम्यान शिवीगाळ करणाऱ्या विद्यार्थ्यांना माफ केल्याचे म्हटले होते. पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, "माझ्या आणि माझ्या दिवंगत आईबद्दल वापरलेले अपशब्द नक्कीच वेदनादायी होते, परंतु तरुणांना त्यांच्या चुकांमधून शिकण्याची संधी मिळायला हवी." पंतप्रधानांच्या या विधानानंतर काही तासांतच या मुलीचा माफीनाम्याचा व्हिडिओ समोर आला. तर मोदींची पोस्ट आणि त्याच वेळी दुसरीकडे मुलीची आलेली माफी यावरून विरोधकांनी हल्लाबोल केला आहे, आंदोलनकर्त्या GenZ ला जबरन कॅमेऱ्यासमोर माफी मागायला लावून स्वयंघोषित विश्वगुरू 'मला त्यांना माफ करायचंय' म्हणतायत. वाह रे वाह! अशा पोस्ट देखील सोशल मिडीयावरती दिसून येत आहेत.

Continues below advertisement

jantar mantar viral girl apologized : झिरो एफआयआर दाखल 

याप्रकरणी २९ जुलै रोजी नोएडा येथील एक्सप्रेसवे पोलिस ठाण्यात रुचिका सिंग हिच्याविरोधात ‘झिरो एफआयआर’ (Zero FIR) दाखल करण्यात आला होता. घटनास्थळ दिल्लीतील असल्याने हे प्रकरण नंतर दिल्लीतील पार्लियामेंट स्ट्रीट पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३५२, ३५३ (१) आणि ३५६ (१) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. सर्वोच्च न्यायालयातील एका महिला वकिलाच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. माहितीनुसार, ही मुलगी तिच्या आईसोबत नोएडातील एका सोसायटीत राहत होती. आंदोलनानंतर ती परत आलेली नाही आणि तिचे घर सध्या बंद आहे. ती आपल्या कुटुंबासह फरार असून पोलिस तिचा शोध घेत आहेत.

jantar mantar viral girl apologized : आंदोलनकर्त्या पक्षाचा आणि आईचा खुलासा

आंदोलन आयोजित करणाऱ्या 'कॉकरोच जनता पार्टी'चे प्रवक्ते सौरव दास यांनी एफआयआरवर आक्षेप घेतला. ते म्हणाले की, "आक्षेपार्ह भाषेचे समर्थन केले जाऊ शकत नाही, परंतु अशा गोष्टींवर गुन्हेगारी खटले चालवल्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर वाईट परिणाम होतो. पीडित पक्षाने फौजदारी कारवाई करण्याऐवजी मानहानीचा दावा ठोकला पाहिजे." यापूर्वी मुलीच्या आईचे वक्तव्यही समोर आले होते. त्यांनी सांगितले की, "आम्ही पोलिस अधिकाऱ्यांना आधीच माफीनामा दिला असून घडलेल्या प्रकाराबद्दल आम्हाला तीव्र पश्चात्ताप होत आहे." मुलीने जिथे काम शिकण्यास सुरुवात केली होती, त्या सॅलून मालकाने सांगितले की, ती मुलगी काही दिवस काम शिकायला आली होती, नंतर तिने येणे बंद केले. तिच्याकडे ओळखपत्र (Identity Proof) मागितले असता तिने तेसुद्धा जमा केले नव्हते.

jantar mantar viral girl apologized : अभिजीत दीपके यांनी केला होता बचाव

दुसरीकडे, CJP चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी या प्रकरणात मुलीचा बचाव केला होता. "शिवी देणे हे वाईट असू शकते, परंतु 'शिवी देणे हा काही गुन्हा नाही'. त्यामुळे थेट गुन्हा दाखल करण्याऐवजी अशी कृती करणाऱ्याला समज दिली पाहिजे," असा सवाल उपस्थित करत त्यांनी दाखल झालेल्या एफआयआरवर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते.