एक्स्प्लोर

Manoj Jarange Protest: मनोज जरांगे मुंबईकडे रवाना होताच पत्नीसह मुली संतापल्या; म्हणाल्या, 'वडिलांना काही झाल्यास डोळे पुसायला रुमाल...'

Manoj Jarange Protest: मुंबईत गेल्यावर सरकार जबाबदार. त्यांच्या जीवाला जर काही झालं ना, माझ्या लेकरांसहित आमच्या अख्ख्या मराठा कुटुंबाचा त्यांना तळतळाट लागणार असंही जरांगेंच्या पत्नीने म्हटलं आहे.

जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत. गेल्या अठरा दिवसांपासून मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू आहे, आज ते मुंबईला निघाले आहेत त्यामुळे यांच्या कुटुंबाची घालमेल वाढली आहे. दोन्ही वेळेस सरकारने ऐकले नाही यावेळी तरी सरकारने मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी मनोज जरांगे (Manoj Jarange)  यांच्या पत्नी सौमित्रा जरांगे यांनी केली आहे. यावेळी आम्ही सरकारची चूक पदरात घेणार नसल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. दरम्यान आपल्या वडिलांना काही झाल्यास सरकार जबाबदार राहील असा इशारा देखील मनोज जरांगे यांच्या कन्या पल्लवी जरांगे यांनी दिला आहे.(Manoj Jarange) 

सरकारकडून असलेल्या अपेक्षांबद्दल मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या पत्नी सौमित्रा जरांगे म्हणाल्या की,  यावेळेस तर सरकारने निर्णय घेतलाच पाहिजे, कारण दोन वेळेस आले दोन्ही वेळेस परत त्यांना पाठवलंय, पण यावेळेस तरी त्यांनी कमीत कमी परत नाही पाठवायला पाहिजे. सरकारने काय दिलेलं आहे, मग त्यांनी ते स्पष्ट सांगायला पाहिजे ना. ते सांगत नाहीत, काय दिलंय म्हणून. फक्त दिलं, दिलं हे तर आम्ही रोजच ऐकतो टीव्हीवर, पण ते सांगत नाहीत काय दिलंय म्हणून. त्यांनी ते सांगायला पाहिजे, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.(Manoj Jarange) 

Manoj Jarange Protest: मुंबईत गेल्यावर सरकार जबाबदार.....

तर मनोज जरांगे पाटील मुंबईत गेल्यावर काही अघटित घडल्यास काय? यावरती सौमित्रा जरांगे म्हणाल्या, मुंबईत गेल्यावर सरकार जबाबदार. त्यांच्या जीवाला जर काही झालं ना, माझ्या लेकरांसहित आमच्या अख्ख्या मराठा कुटुंबाचा त्यांना तळतळाट लागणार. उपोषणादरम्यान त्यांच्या तब्येतीची चिंता वाटते, कारण १८-१८ दिवस ते १८ तास सुद्धा बिना अन्न-पाण्याचं राहू शकत नाहीत. पण आज १८ दिवस झाले की बिना अन्न-पाण्याची, मग हे सरकारला दिसत नाही का? एकदा दोनदा माणूस चूक थोडीशी समजून घेतात, चूक पदरात घेतं, पण यावेळेस सरकारची चूक आम्ही पदरात घेणार नाही, असंही पुढे सौमित्रा जरांगे म्हणाल्या आहेत.

 Manoj Jarange Protest: त्यांच्या जीवाला जर काही झालं ना, तर....

तर मनोज जरांगे पाटील यांच्या मुलींनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, सरकारने काळजी घ्यावी त्यांची, अन्यथा परिणाम भोगायला तयार रहा. त्यांनी तीन वर्षात काय केलंय म्हणते, सरकार काय करतंय? आज १८ दिवस झाले उपाशी आहेत ते. तर त्यांना काही झालं ना, तर एक आव्हान वगैरे मी काय करणार नाही, पण एक सांगते, त्यांच्या जीवाला जर काही झालं ना, तर बस लपवायला जागा आणि डोळे पुसायला रुमाल सुद्धा तुम्हाला भेटणार नाही, इतके मराठी तापणार आहेत. त्यामुळे काळजी घ्या त्यांची. बस, असंही जरांगेंच्या मुलीने म्हटलंय.

Manoj Jarange Protest: मराठ्यांना एकदा सांगून टाका की आम्ही देणार नाही.....

त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारला तुमचे काय आवाहन आहे? यावरती बोलताना जरांगेंची मुलगी म्हणाली, ह्यावेळेस मराठी तापलेले आहेत आणि पप्पा सुद्धा तापलेले आहेत. त्यामुळे फडणवीस साहेबांनी जरा विचार करून निर्णय घ्यावा. जसं तुम्ही तिकीट देताना एखाद्याला सांगता तुला देणार नाही, तसं मराठ्यांना एकदा सांगून टाका की आम्ही देणार नाही. मग आम्ही आमच्या पद्धतीने तसं पाहिजे तसं घेऊ. तुमचे पप्पांशी (मनोज जरांगे पाटील) शेवटचे बोलणे कधी झाले होते? यावरती ती म्हणाली, एक महिना झाला बोललोच नाही कसंलंच, असंही तिने म्हटलं आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : 2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो मार्गिकांच्या कामासाठी नवं टार्गेट समोर ठेवलं.. 
2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मेट्रो मार्गिकांच्या कामांना गती देण्याच्या सूचना  
Video: मी तुमच्या रागात सामिल व्हायला आलोय; राज ठाकरेंचा पुण्यातील MPSC आंदोलनात सहभाग, सांगितली 'मन की बात'
Video: मी तुमच्या रागात सामिल व्हायला आलोय; राज ठाकरेंचा पुण्यातील MPSC आंदोलनात सहभाग, सांगितली 'मन की बात'
Ravindra Chavan : नागपूर पदवीधरमध्ये बंडखोरी करत अनिल सोलेंकडून अर्ज दाखल, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सोले यांच्या घरी पोहोचले पण...
नागपूर पदवीधरमध्ये बंडखोरी करत अनिल सोलेंकडून अर्ज दाखल, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण थेट सोले यांच्या घरी पोहोचले पण...
BJP Yuva Morcha Team : भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
Advertisement

व्हिडीओ

CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MPSC Protest : आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
Devendra Fadnavis : 2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो मार्गिकांच्या कामासाठी नवं टार्गेट समोर ठेवलं.. 
2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मेट्रो मार्गिकांच्या कामांना गती देण्याच्या सूचना  
BJP Yuva Morcha Team : भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
Repo Rate : रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणविषयक समितीची बैठक आजपासून सुरु, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
आरबीआय 7 ऑक्टोबरला रेपो रेट जाहीर करणार, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं

Embed widget