Jalgaon Vidhan Parishad Election 2026:  विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावमधील (Jalgaon Vidhan Parishad Election 2026) राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. जळगावमध्ये महायुतीचे (Mahayuti) उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या उमेदवारीवरून चक्क भारतीय जनता पक्षाच्याच (BJP) दोन बड्या मंत्र्यांमध्ये मतभेद असल्याचे समोर आले आहे. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे (Raksha Khadse) आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यातील हा वाद आता राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चेचा विषय बनला आहे.

Continues below advertisement

नंदकिशोर महाजन यांना शेवटच्या क्षणी महायुतीकडून उमेदवारी जाहीर झाली होती. ही उमेदवारी रक्षा खडसे यांच्या प्रयत्नातून मिळाल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात रंगली होती. याच चर्चेबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना दोन्ही नेत्यांमधील अंतर्गत वाद आणि मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.

Raksha Khadse on Girish Mahajan: केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांचा दावा काय?

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे म्हणाल्या की, उत्तर महाराष्ट्र व जळगाव जिल्ह्याचा कोणताही निर्णय नेहमी गिरीश महाजन यांनी घेतला आहे. विधान परिषदेचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या उमेदवारीबाबतचा निर्णय हा ही मंत्री गिरीश महाजन यांचा आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. रक्षा खडसे यांच्या या वक्तव्यामुळे नंदकिशोर महाजन यांच्या उमेदवारीची संपूर्ण जबाबदारी गिरीश महाजन यांच्यावर ढकलली गेल्याचे बोलले जात होते.

Continues below advertisement

Girish Mahajan on Raksha Khadse: मंत्री गिरीश महाजनांचा पलटवार

रक्षा खडसे यांच्या या दाव्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर दिले आहे. "नंदकिशोर महाजन माझा उमेदवार आहे, असा त्यावर शिक्का आहे का?, असा थेट प्रश्न गिरीश महाजन यांनी उपस्थित केला. पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, "उमेदवार हा मी नव्हे तर पक्ष ठरवतो, त्यामुळे नंदकिशोर महाजन हे आपण ठरवलेले उमेदवार आहेत, असे म्हणणे चुकीचे असल्याचं सांगत मंत्री गिरीश महाजन यांनी मंत्री रक्षा खडसे यांच्यावर पलटवार केला आहे. 

Girish Mahajan vs Raksha Khadse: महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

जळगाव आणि उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणावर गिरीश महाजन यांची मजबूत पकड आहे. मात्र, नंदकिशोर महाजन यांच्या उमेदवारीवरून भाजपच्या या दोन बड्या मंत्र्यांमध्ये निर्माण झालेले मतभेद आता लपून राहिलेले नाहीत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर महायुतीच्या अधिकृत उमेदवाराच्या नावावरून भाजपमधील दोन मंत्र्यांमध्ये रंगलेला कलगीतुरा आगामी काळात काय वळण घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Amravati Vidhan Parishad Election 2026: अर्ज अवैध ठरवताना अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना 'मिरगी' आली होती का? बाजोरिया पिता-पुत्रांनी पुरावे समोर ठेवून केले गंभीर आरोप; म्हणाले...