Jalgaon Vidhan Parishad Election 2026: विधान परिषद निवडणुकीच्या (Vidhan Parishad Election 2026) पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. नाशिकमधील महायुतीतील (Mahayuti) बंडखोरीचा तिढा सोडवण्यात संकटमोचक मानले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांना यश आले असले, तरी जळगावमधील बंडखोरीचा पेच अद्याप कायम असल्याचे चित्र आहे. नाशिकपाठोपाठ जळगावचाही तिढा सुटला असून केवळ औपचारिक घोषणा बाकी असल्याचे विधान मंत्री गिरीश महाजन यांनी केले होते. मात्र, त्यानंतर शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे अचानक 'नॉट रिचेबल' (Not Reachable) झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Continues below advertisement

विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरल्यानंतर शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी नाशिकमधील बंडखोरीवर आपले पत्ते ठेवले होते. नाशिकमधील बंडखोराने माघार घेतली, तर आपणही जळगावमधून माघार घेऊ, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी सुरुवातीला मांडली होती. नाशिकमधील गुंतागुंतीमुळेच आपल्याला जळगावातून उमेदवारी अर्ज भरावा लागल्याचेही त्यांनी जाहीर केले होते.

Jalgaon Vidhan Parishad Election 2026: कार्यकर्त्यांचा दबाव की राजकीय खेळी?

नाशिकमधील बंडखोरी शमवण्यात महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांना यश आल्यानंतर, जळगावातून रेश्मा काळे यांच्या माघारीची केवळ औपचारिकता बाकी असल्याचे बोलले जात होते. मात्र, काल माध्यमांशी बोलताना रेश्मा यांनी वेगळेच संकेत दिले. "आपल्याला मतदारसंघातून उत्तम प्रतिसाद मिळत असून, आपण ही निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. बाकी विषयावर वरिष्ठ नेते निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. या विधानामुळे त्या निवडणुकीच्या रिंगणात कायम राहणार की काय, अशी शंका उपस्थित केली जात होती.

Continues below advertisement

Jalgaon Vidhan Parishad Election 2026: 'नॉट रिचेबल'मुळे महायुतीची धाकधूक वाढली

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज प्रत्यक्षात रेश्मा काळे यांची नेमकी भूमिका काय आहे, हे जाणून घेण्यासाठी माध्यमांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या नॉट रिचेबल असल्याचे समोर आले आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन यांना रेश्मा काळे पाठिंबा जाहीर करणार की आपल्या उमेदवारीवर ठाम राहत महायुतीसमोर नवे आव्हान उभे करणार? यावर आता चर्चा रंगू लागल्या आहेत. जळगावमधील या राजकीय बंडाचा तिढा नेमका कधी आणि कसा सुटणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. 

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Nashik Vidhan Parishad Election 2026: मोठी बातमी : नरेंद्र दराडेंच्या बाजूला बसून माघारीची घोषणा, पण दराडेंना पाठिंबा देणार का? प्रश्न विचारताच गोकुळ गीते ताडकन उठून निघाले!