Jalgaon Vidhan Parishad Election 2026 : जळगाव विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून नंदकिशोर महाजन (Nandkishor Mahajan) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तब्बल 20 वर्षांच्या पक्षनिष्ठेची पावती म्हणून पक्षाने ही उमेदवारी दिल्याची भावना नंदकिशोर महाजन यांनी व्यक्त केली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे, जिल्ह्यातील नेते, आमदार खासदारांचे आभार मानले. (Jalgaon Election 2026)
20 वर्षांच्यापक्षनिष्ठेची पावती, विजयनिश्चित (Jalgaon Vidhan Parishad Election 2026)
पक्षश्रेष्ठीनेमाझा सारख्यासामान्य माणसावरविश्वासदर्शवलात्यासाठीमीआभारीआहे. महायुतीतीलसर्वनेत्यांचेहीआभार. जळगावमध्ये भाजपनेदणदणीतविजयमिळवलाआहे. त्यामुळेनागसेवकांच्याजोरावरविजयनिश्चितआहे. मात्रपक्षाशीएकनिष्ठराहिलंकिपक्षदखलघेऊनसर्वसामान्यकार्यकर्त्यालाहीसंधीदेतन्यायदेतो. हेयावरूनस्पष्टआहे. असेही नंदकिशोर महाजन म्हणाले. (Nandkishor Mahajan Jalgaon Vidhan Parishad)
भाजपाने नाव जाहीर करताच, कार्यकर्त्यांची फटाक्याची आतिशबाजी करत जल्लोष (Jalgaon Vidhan Parishad Election 2026)
विधान परिषद महायुतीचा उमेदवारांच्या यादीत जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील शेतकरी नंदकिशोर महाजन यांचे नाव भाजपाने जाहीर करताच, नंदकिशोर महाजन यांच्या तांदल वाडी येथील राहत्या घराच्या समोर कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिश बाजी करत जल्लोष केल्याचं पाहायला मिळाले आहे.
Nandkishor Mahajan : नंदकिशोर महाजन यांचा परिचय
पत्ता : मु. पो. तांदलवाडी ता रावेर जि. जळगांव
जन्म तारीख : 01/06/1976
मोबाईल नंबर : 9890618777
पक्ष : भारतीय जनता पार्टी
शिक्षण : Graduate
व्यवसाय : शेती
मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय म्हणून जिल्ह्यात ओळख
भुषवलेली पदे
1. मार्च 2007 ते मार्च 2012 पं.स. सदस्य, रावेर
2. 2009 ते 2012 सभापती पं.स. रावेर
3. 2012 ते 2017 पं. स. सदस्य, रावेर
4. 2015 जळगांव जिल्हा मध्यवर्ती सह. बँक. लि. जळगांव संचालक
5. 2015 मधुकर सहकारी साखर कारखाना फैजपुर ता. यावल जि. जळगांव संचालक
6. 2017 ते 2021 जि.प. सदस्य जळगांव
7. 2017 ते 2019 जि.प. उपाध्यक्ष तथा कृषी व पशु संवर्धन सभापती जि.प. जळगांव
पक्षीय जबाबदारी
1. सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीची रावेर लोकसभा संयोजन म्हणुन जबाबदारी
2. भा.ज.पा. जिल्हा उपाध्यक्ष, जळगांव म्हणुन जबाबदारी
3. लोकसभा 2024 साठी भा.ज.पा. रावेर लोकसभा निवडणुक प्रमुख म्हणुन जबाबदारी
4. जळगांव पुर्व भा.ज.पा. जिल्हा कोषाध्यक्ष म्हणुन जबाबदारी
महायुतीत भाजप 11 जागा लढवणार (Vidhan Parishad Election 2026)
विधानपरिषदेच्या 17 जागांपैकी 11 जागा भाजप लढवणार आहे. एकनाथ शिंदेंची शिवसेना 4 ठिकाणी तर सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार आहे. या पैकी नागरपूरच्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे.
भाजपनं कोणाला उमेदवारी दिली? (Vidhan Parishad Election 2026)
वर्धा चंद्रपूर गडचिरोली - अरुण लखाणी
अमरावती - प्रवीण पोटे
सोलापूर - राजेंद्र राऊत
अहिल्यानगर - प्राजक्त तनपुरे
संभाजीनगर जालना - सुहास शिरसाट
नांदेड - अमर राजूरकर
धाराशिव बीड लातूर - बसवराज पाटील
जळगाव - नंदकिशोर महाजन
नागपूर - राजीव पोतदार
Vidhan Parishad Election 2026: निवडणूक कार्यक्रम जाहीर
अधिसूचना जारी : 25 मे
अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 1 जून
अर्जाची छाननी : 2 जून
अर्ज माघारीची शेवटची तारीख : 4 जून
मतदान : 18 जून - स. 8 ते दु. 4.
मतमोजणी : 22 जून
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
इतरमहत्वाच्याबातम्या
