Amit Thackeray and Siddhesh Kadam: अमित ठाकरे बालिश, मोदींचं नेतृत्त्व मान्य नसेल तर पाकिस्तानात जा; कृष्णराज महाडिकांनंतर आता सिद्धेश कदमांनी दंड थोपटले
Amit Thackeray and Siddhesh Kadam: कालच कृष्णराज महाडिक यांच्या नेतृत्वाखाली भाजप युवा मोर्चाने राज ठाकरे यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता.

Amit Thackeray and Siddhesh Kadam: भाजप आणि मनसेमधील राजकीय वाद आता अधिकच पेटण्याची चिन्हे दिसत असताना या वादात शिंदे सेनेनेही उडी घेतली आहे. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि शिंदेसेनेचे नेते सिद्धेश कदम (Siddhesh Kadam) यांनी मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्यावर जोरदार टीका करत थेट आक्रमक भूमिका घेतली. मुंबईतील गोरेगाव पूर्वेकडील नेस्को संकुलात प्लास्टिक रिसायकलिंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन सिद्धेश कदम यांच्या हस्ते झाले. यावेळी सिद्धेश कदम कडून राहुल गांधीवर टीका करत त्यांनी 'जेन झी' च्या दिशाभूल करत आहे दुसरीकडे आम्ही भविष्यात प्लास्टिक रिसायकलिंग आणि खनिजाविषयी देखील शाळकरी मुलांना प्रोत्साहन आणि माहिती देत आहे. गोरेगाव नेस्को सेंटर मध्ये मुंबईच्या वेगवेगळ्या शाळकरी आणि कॉलेजच्या मुलांना प्लास्टिक रिसायकल शो दाखवून त्याच्याबद्दल माहिती देण्यात आली. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अमित ठाकरे यांच्या भूमिकेवर सडकून टीका केली. (Maharashtra Politics news)
अमित ठाकरे यांचे हे वर्तन म्हणजे बालिशपणा आहे. आजच्या युवा पिढीला काय पाहिजे, हे त्यांना कळत नाही. कुठेही आक्रमकता दाखवायची. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत, हे विसरायचे. जगाच्या नकाशावर मोदी साहेबांचे वर्चस्व आहे. तुम्हाला ते मान्य नसेल तर तुम्ही पाकिस्तानमध्ये जा. तुम्ही भारतात कशाला राहता, असा सवाल सिद्धेश कदम यांनी विचारला. कदम यांच्या या जहाल वक्तव्यामुळे भाजप-मनसे वादाला आता शिंदेसेनेच्या आक्रमक भूमिकेची फोडणी मिळाली आहे. अमित ठाकरे यांच्या वक्तव्यावरून सुरू झालेला राजकीय संघर्ष आता तीन पक्षांमध्ये रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सिद्धेश कदम यांच्या “पाकिस्तानात जा” या वक्तव्यावर मनसेकडून काय प्रतिक्रिया येते, तसेच अमित ठाकरे किंवा मनसेचे वरिष्ठ नेते यावर प्रत्युत्तर देतात का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आगामी काळात या वक्तव्यावरून भाजप, मनसे आणि शिंदेसेनेतील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा
Before You Go
OBC Vs Maratha : 2 सप्टेंबरचा GR रद्द करा, मनोज जरांगेंच्या अंतरवालीत ओबीसी आक्रमक





















