एक्स्प्लोर

Hemlata Patil : दीड महिन्यातच हेमलता पाटलांनी शिंदेंची शिवसेना सोडली; काँग्रेसनं तिकीट नाकारल्यानं केला होता पक्षप्रवेश

Hemlata Patil : दीड महिन्यांपूर्वी काँग्रेसचा राजीनामा देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश करणाऱ्या हेमलता पाटील यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केलंय.

Hemlata Patil : दीड महिन्यांपूर्वी काँग्रेस (Congress) प्रदेश प्रवक्ते पदाचा राजीनामा देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत (Shiv Sena) पक्ष प्रवेश करणाऱ्या नाशिकच्या हेमलता पाटील (Hemlata Patil) यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केलंय. यामुळे नाशिकच्या राजकारणात एकच खळबळ उडाली असून सध्यातरी कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचा खुलासा हेमलता पाटील यांनी दिला आहे. 

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास काँग्रेसकडून हेमलता पाटील या इच्छुक होत्या. मात्र या मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला गेली. ठाकरेंच्या शिवसेनेने माजी आमदार वसंत गीते यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. यानंतर हेमलता पाटील या नाराज असल्याचे पाहायला मिळाले होते. अनेक वर्ष पक्षाचे प्रामाणिक काम करून देखील पक्षाकडून अन्याय झाला. पक्ष नेतृत्वाने पूर्णतः दुर्लक्ष केलं. एकमेकांच्या कापाकापीतच पक्षाचे नेते मशगूल आहेत, अशा म्हणत हेमलता पाटील यांनी काँग्रेस नेत्यांवर गंभीर आरोप केले होते.

हेमलता पाटील यांचा शिंदेच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र

यानंतर काँग्रेस प्रदेश प्रवक्ते पदाचा राजीनामा देऊन हेमलता पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, हेमलता पाटील यांनी शिंदेच्या शिवसेनेला दीड महिन्यातच जय महाराष्ट्र केला आहे. शिवसेनेत कामाला न्याय देऊ शकत नसल्याने राजीनामा देत असल्याचे हेमलता पाटील यांनी जाहीर केले आहे. सध्यातरी कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. मात्र, नाशिकमध्ये शिवसेनेच्या नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून गटबाजी वाढली आहे. संघटनात्मक कामे होत नसल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहेत. त्यातूनच हेमलता पाटील यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

नेमकं काय म्हणाल्या हेमलता पाटील? 

हेमलता पाटील यांनी एक व्हिडिओ जारी करत म्हटले आहे की, मी गेल्या 35 वर्षांपासून काँग्रेस पक्षामध्ये काम करत होते.  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी इच्छुक असताना मला उमेदवारी मिळाली नाही. म्हणून मी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता. त्यानंतर मी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. परंतु, शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर गेल्या दीड महिन्यात मी या पक्षाला आणि पक्षामध्ये काम करताना योग्य तो न्याय देऊ शकत नाही. मी योग्य ते काम करू शकत नाही, अशी माझी स्वतःची प्रामाणिक भावना झाली. त्या भावनेला साक्षी ठेवून मी यानंतर या पक्षात काम करायचे नाही, असे ठरवले आहे. कारण एखाद्या पक्षात आपण काम करताना प्रामाणिकपणे काम केले पाहिजे. त्या पक्षाला योग्य तो न्याय दिला पाहिजे. परंतु, तसा न्याय मी देऊ शकत नाही. त्यामुळे सध्या मी कुठल्याही पक्षात काम न करण्याचे ठरवले आहे, असे त्यांनी म्हटले. 

आणखी वाचा 

शरद पवारांना मोठा धक्का, माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी घेतलं कमळ हाती, शहापूरमध्ये भाजपची ताकद वाढणार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Baramati : बारामती बिनविरोध करा, उमेदवारी मागे घ्या; सुनेत्रा पवारांचा हर्षवर्धन सपकाळांना पुन्हा फोन, शेवटच्या दिवशी काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष
बारामती बिनविरोध करा, उमेदवारी मागे घ्या; सुनेत्रा पवारांचा हर्षवर्धन सपकाळांना पुन्हा फोन, शेवटच्या दिवशी काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष
Baramati Election : बारामती पोटनिवडणूक रंगतदार! काँग्रेस ठाम, तर ठाकरे अन् शरद पवार ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत
बारामती पोटनिवडणूक रंगतदार! काँग्रेस ठाम, तर ठाकरे अन् शरद पवार ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी संतोष देशमुखांच्या पत्नी उद्या अर्ज भरणार; निवडणूक होणार की बिनविरोध?
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी संतोष देशमुखांच्या पत्नी उद्या अर्ज भरणार; निवडणूक होणार की बिनविरोध?
बारामतीत 6 उमेदवारांचे अर्ज मागे, राहुरीतही चौघांची माघार; पोटनिवडणुकीत शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी?
बारामतीत 6 उमेदवारांचे अर्ज मागे, राहुरीतही चौघांची माघार; पोटनिवडणुकीत शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी?

व्हिडीओ

Iran vs America : अमेरिका इराण युद्धात स्वल्पविराम, पडद्यामागे काय-काय घडलं? Special Report
Iran vs America : अमेरिका इराण युद्धात कोण धुरंदर कोण सरेंडर? Special Report
Cockroach Found In Vande Bharat Meal : झुरळ खिचडीत रेल्वे अडचणीत Special Report
Pune Cyber Scam : 54 कोटींच्या आमिषाला भुलले अन् 12 कोटी गमावले Special Report
Eknath Shinde : पक्षाचं काम केलं नाही तर पदावरून हटवणार, एकनाथ शिंदेंचा इशारा, बैठकीतील Inside Story

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
युद्धातून मैत्रीकडे? इराणसोबत काम करण्याची तयारी, निर्बंध सैल होण्याचे संकेत, ट्रम्प यांचा मोठा दावा
युद्धातून मैत्रीकडे? इराणसोबत काम करण्याची तयारी, निर्बंध सैल होण्याचे संकेत, ट्रम्प यांचा मोठा दावा
इस्त्रायलचा लेबनॉनवर हल्ला, 89 जणांचा मृत्यू, आखाती देशांमध्ये तणाव वाढला, इराणचा अमेरिकेला थेट इशारा
इस्त्रायलचा लेबनॉनवर हल्ला, 89 जणांचा मृत्यू, आखाती देशांमध्ये तणाव वाढला, इराणचा अमेरिकेला थेट इशारा
GT vs DC IPL 2026 : डेव्हिड मिलरनं दिल्लीला विजयाजवळ पोहोचवलं पण एका निर्णयानं पराभवाचा झटका, गुजरातचा पहिला विजय
केएल राहुलचं अर्धशतक वाया, डेव्हिड मिलरचा एक निर्णय अन् दिल्लीचा पराभव, गुजरातचा रोमांचक लढतीत विजय
Iran : शस्त्रसंधीचा भंग होताच इराण भडकला, होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली, थेट जहाजं उडवण्याची धमकी, ट्रम्प काय करणार?
शस्त्रसंधीचा भंग होताच इराण भडकला, होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली, थेट जहाजं उडवण्याची धमकी, ट्रम्प काय करणार?
Pune Cyber Fraud : शेअर बाजारातून 11 दिवसांत 54 कोटी मिळवून देतो; हडपसरमध्ये 75 वर्षांच्या आजोबांना 12.31 कोटींचा गंडा
शेअर बाजारातून 11 दिवसांत 54 कोटी मिळवून देतो; हडपसरमध्ये 75 वर्षांच्या आजोबांना 12.31 कोटींचा गंडा
बारामतीत 6 उमेदवारांचे अर्ज मागे, राहुरीतही चौघांची माघार; पोटनिवडणुकीत शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी?
बारामतीत 6 उमेदवारांचे अर्ज मागे, राहुरीतही चौघांची माघार; पोटनिवडणुकीत शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी?
परभणीत दोन लाचखोरांना एकाच दिवशी अटक; वैद्यकीय अधिकाऱ्यास 40 हजार घेताना रंगेहात अटक
परभणीत दोन लाचखोरांना एकाच दिवशी अटक; वैद्यकीय अधिकाऱ्यास 40 हजार घेताना रंगेहात अटक
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 एप्रिल 2026 | बुधवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 एप्रिल 2026 | बुधवार
Embed widget