Harshawardhan Sapkal: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीस आर्थिक स्थितीचे कारण देत नकार दिल्यानंतर हे बोलताना ना यांची जीभ थरथरते ना यांना लाज वाटते. जनतेनं राक्षसी बहुमत देऊन यांना सत्तेवर बसवलेले लोक आता राक्षसाप्रमाणे बोलू लागलेत अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवारांवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रसच्या हर्षवर्धन सपकाळांनी केलीय. X  माध्यमावर त्यांनी याबाबत पोस्ट केली आहे. शेतकऱ्यांसह कर्जदारांनी 31 मार्चपूर्वी बँकांमध्ये कर्जाचे परतफेड करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) दिल्या होत्या. 

काय म्हणाले हर्षवर्धन सपकाळ?

हे बोलताना ना यांची जीभ थरथरते ना यांना लाज शरम वाटते. जनतेने राक्षसी बहुमत देऊन सत्तेवर बसवलेले लोक आता राक्षसाप्रमाणे बोलू वागू लागले आहेत. विधानसभा निवडणुकीत कर्जमाफी देऊ असे आश्वासन देऊन महायुतीने राज्यातील शेतक-यांची मते घेतली आणि सत्तेवर येताच 31 मार्च पूर्वी पीक कर्ज भरा, कर्जमाफी मिळणार नाही असे मुजोरपणे सांगत आहेत. लाडक्या बहिणींची फसवणूक अगोदरच केली आहे. 2100 चे आश्वासन देऊन त्यांच्या हातावर 1500 रुपये टेकवले जात आहेत. विविध कारणे देऊन 10 लाखांहून  अधिक महिलांना अपात्र करून योजनेचा लाभ बंद केला आहे आणि 2100 रुपये मिळण्यासाठी 5 वर्ष वाट पहावी लागेल असे उद्दामपणे सांगत आहेत. अशी टीका हर्षवर्धन सपकाळांनी अजित पवारांवर केलीय.

 

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीस आर्थिक स्थितीचे कारण देत नकार दिल्यानंतर हे बोलताना ना यांची जीभ थरथरते ना यांना लाज वाटते. जनतेनं राक्षसी बहुमत देऊन यांना सत्तेवर बसवलेले लोक आता राक्षसाप्रमाणे बोलू लागलेत अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवारांवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रसच्या हर्षवर्धन सपकाळांनी केलीय. X  माध्यमावर त्यांनी याबाबत पोस्ट केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना यापूर्वी वीजमाफी, पीक कर्जाच्या व्याजात सवलत, दुधाचे अनुदान देण्यात आले आहे. लाडकी बहीण योजनेवर तर सुमारे 45 हजार कोटींचा बोजा सरकारवर असल्याने कर्जमाफीसारखी सध्या तरी राज्याची आर्थिक परिस्थिती नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांसह कर्जदारांनी 31 मार्चपूर्वी बँकांमध्ये कर्जाचे परतफेड करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिल्यानंतर हर्षवर्धन सपकाळांनी ट्विट केले आहे.

 

हेही वाचा:

बचपन का प्यार, तिचं लग्न ठरलं, हा अस्वस्थ झाला, ती शेवटचं भेटायचं म्हणून आली; दोघांनी कोल्ड्रिक्सही घेतलं, वादाला सुरुवात होताच..