Gunaratna Sadavarte: कुंभला जाऊन जाहीर माफी मागा, अन्यथा....; राज ठाकरेंच्या कुंभमेळ्यावरील वक्तव्यावरून अॅड . गुणरत्न सदावर्ते कडाडले
राज ठाकरे यांचं वक्तव्य बाळा नांदगावकर यांचा तर अपमान होताच, मात्र त्यांनी तमाम स्त्रिया आणि हिंदू भाविकांचाही अपमान केला असल्याची संतप्त प्रतिक्रिया अॅड . गुणरत्न सदावर्ते यांनी दिली आहे.

Gunaratna Sadavarte on Raj Thackeray : राज ठाकरे यांचं वक्तव्य बाळा नांदगावकर यांचा तर अपमान होताच, मात्र त्यांनी तमाम स्त्रिया आणि हिंदू भाविकांचाही अपमान केला आहे. या विधानाकरता राज ठाकरे यांनी कुंभला जाऊन जाहीर माफी मागितली पाहिजे. राज ठाकरे यांनी सातत्याने फेरीवाले आणि कष्टकरी जनतेला परप्रांतिय म्हणून टार्गेट करणं थांबवायला हवे. अन्यथा येत्या काळात त्यांना जशास तसं उत्तर दिलं जाईल. असा इशारा देत अॅड . गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांच्यावर टीका केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनसेच्या 19 व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात प्रयागराजमधील कुंभमेळ्याची (Mahakumbhmela 2025) खिल्ली उडवली. त्यावर प्रतिक्रिया देतांना सदावर्ते यांनी तोफ डागली आहे.
धमक्या आणि ट्रोलिंग याला आपण भीक घालत नाही- गुणरत्न सदावर्ते
देशातली एकही नदी स्वच्छ नाही. कोरोना आजारातून देश नुकताच बाहेर निघाला आहे. मात्र कुणालाही त्याचं देणंघेणं नाही आणि लोक कुंभमेळ्यात गर्दी करत अंघोळी करत आहेत. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक समजा. अंधश्रद्धेतून जरा बाहेर या, डोकी हलवा. असं म्हणत राज ठाकरे यांनी कुंभमेळ्यातील पवित्र स्नानावर भाष्य करत खिल्ली उडवली होती.मनसेच्या 19 व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
दरम्यान, याच मुद्यावरुन आता अॅड . गुणरत्न सदावर्ते आक्रमक झाले असून त्यांनी मनसेप्रमुखांवर तोफ डागली आहे. राज ठाकरे यांच ते विधान त्यांचेच जेष्ठ नेते बाळा नांदगावकर यांचा तर अपमान होताच, मात्र त्या विधानातून त्यांनी तमाम स्त्रिया, आणि हिंदू भाविकांचाही अपमान केलाय. या विधानाकरता राज ठाकरे यांनी कुंभला जाऊन जाहीर माफी मागितली पाहिजे. याशिवाय सातत्यानं फेरीवाले आणि कष्टकरी जनतेला परप्रांतिय म्हणून टार्गेट करणं थांबवायला हवं, अन्यथा येत्याकाळात त्यांना जशास तसं उत्तर दिलं जाईल. राज ठाकरेंवरील टीकेनंतर येणाऱ्या धमक्या आणि ट्रोलिंग याला आपण भीक घालत नसल्याचंही सदावर्ते यांनी एबीपी माझाकडे स्पष्ट केलंय.
राज ठाकरे यांना फक्त हिंदू धर्म दिसतोय- नितेश राणे
राज ठाकरे यांना फक्त हिंदू धर्म दिसतोय. रमजानमध्ये आता मोहम्मद अली रोडलाजा किंवा बकरीदमध्ये रस्त्याने वाहणारे लाल पाणी पहा. त्यावेळी राज ठाकरे का बोलत नाही. त्यांनी मागे गुजरात दौरा केला होता. आता त्यांनी एकदा प्रयागराजचा दौरा करावा. मी आणि माझ्या आईने स्नान केलं, आम्हाला कसलाच त्रास जाणवला नाही. आमच्या आस्थेबाबत त्यांनी बोलू नये. अशी प्रतिक्रिया भाजपनेते आणि मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे.
हे ही वाचा























