Gunaratna Sadavarte and Manoj Jarange Patil: मनोज जरांगे हे सातत्याने देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविषयी अवमानकारक भाषा वापरत आहेत. ही गोष्ट एकनाथ शिंदे यांना मान्य आहे का? ठाणे की रिक्षा हे गाणं ऐकल्यावर एकनाथ शिंदे यांच्या आग लागते. मग मनोज जरांगे पाटील चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचा उल्लेख 'बावनकुळ्या' असा करतो, यावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) काहीच कसे बोलत नाहीत, असा सवाल अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी उपस्थित केला. ते शुक्रवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange patil) यांनी कुणबी प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरुन देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर केलेल्या टीकेचा प्रतिवाद केला. (Maharashtra Politics news)

ज्या प्रकारे मनोज जरांगे बोलत आहेत, ते एकनाथ शिंदेंचे शिष्य आहेत का यात मला पडायचं नाही. पण ज्याप्रकारे व्यक्त होत आहेत, ते आक्षेपार्ह व्यक्त होणं आहे. या देशात संविधान अंमलात आणलं, त्यादिवशी कोणी पाटील म्हणून बोलण्यासाठी, राजा म्हणून बोलण्यासाठी कोणीही शिल्लक उरलेले नाहीत. त्यामुळे ज्याप्रकारे मनोज जरांगे पाटील इतर समाजाच्या नेत्यांबाबत अपमान करणारी, नीच भाषा वापरतात, तशाप्रकारे आम्ही भटक्या विमुक्त, ओबीसी, मागासवर्गीय, भिक्षुकी करणारे ब्राह्मण कोणाच्याही प्रतिष्ठेला धक्का लावू देणार नाही. मनोज जरांगेंनी तसं केलं कायदेशीर धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा गुणरत्न सदावर्ते यांनी दिला. मनोज जरांगे हा धंदेवाईक आहे. PWD नगरविकास विभागाची टेंडर वाचायची त्याला सवय आहे. मनोज जरांगे पाटीलचा संबंध रेती उपश्याशी आहे, असा गंभीर आरोपही गुणरत्न सदावर्ते यांनी केला.

मनोज जरांगे हे उदय सामंत यांच्याशी फोनवर बोलत असतानाचा लाईव्ह प्रक्षेपण केले जाते. उदय ब्राह्मण आहे की नाही माहिती, ती त्यांची लिबर्टी आहे. पण उदय सामंत यांना फोन केल्यानंतर मनोज जरांगे ज्या भाषेत बोलत होते, ती किती आक्षेपार्ह होती. एकनाथ शिंदे मराठ्यांचे पुढारी आहेत, असे जरांगे म्हणतो. आमचं त्याच्याशी काही देणंघेणं नाही, तुम्ही जन्मभर त्यांचं पुढारी राहावे. शिवसेनेतील बहुजन आणि ओबीसींनी तुम्हाला पुढे नेलं, पण आता त्यांच्या अंगात मराठेपण आलं असेल तर ते त्यांना लखलाभ असो. पण मला एकनाथ शिंदे आणि उदय सामंतांना विचारायचं आहे की, मनोज जरांगे बावनकुळ्या असा उल्लेख करतो. हे अपमानास्पद बोलणं तुम्हाला चालतं का? उदय सामंत हे कान मंत्री आहे. ते एकनाथ शिंदे सांगतील तेवढंच बोलतात. एरवी काही विचारल्यावर फिरवून फिरवून उत्तरं देतात, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. काल जेव्हा जरांगे एकेरी भाषेत बोलला तेव्हा उदय सामंत यांनी थांबवायला पाहिजे होते. एकनाथ यांच्या पिक्चरचा सेकंड पार्ट जरांगे आहे. एकनाथ शिंदे तुम्ही ब्र सुद्धा जरांगेबद्दल का बोलला नाहीत? मनोज जरांगे पाटील म्हणाला, तुमचा लाडोबा म्हणून जरांगे तुमची सेवा करतो. उदय मेरा दोस्त है तू, लेकीन आरक्षण के साथ खिलवाड करेगा, उसको संविधान जवाब देगा, असे जरांगे पाटील यांनी म्हटले.

आणखी वाचा

Manoj Jarange Patil and Pravin darekar: फडणवीसांवर टीका करताच प्रवीण दरेकरांनी मनोज जरांगेंची अक्कलच काढली, म्हणाले, 'नाक्यावर आंदोलन करणं आणि...'