एक्स्प्लोर

Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला गोकुळ कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा; 'गेट मीटिंग' घेत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

Sonam Wangchuk: यावेळी कामगारांनी "संविधान जिंदाबाद...", "सोनम वांगचुक आगे बढो, हम तुम्हारे साथ है...", आणि "केंद्रीय शिक्षण मंत्री राजीनामा द्या..." अशा गगनभेदी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.

Sonam Wangchuk: NEET परीक्षा पेपरफुटी संदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत उपोषणाला बसलेले ज्येष्ठ समाजसुधारक, पर्यावरण कार्यकर्ते व पद्मश्री पुरस्कार विजेते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला कोल्हापूरच्या 'गोकुळ कामगार संघटने'च्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. या पार्श्वभूमीवर गोकुळ दूध संघाचे मुख्य कार्यालय (ताराबाई पार्क) आणि शिरोली येथील हेड ऑफिसच्या गेटवर कामगारांची जाहीर 'गेट मीटिंग' घेऊन केंद्र सरकारच्या उदासीन भूमिकेचा तीव्र निषेध करण्यात आला. सोनम वांगचुक गेल्या 19 दिवसांपासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे अनिश्चित कालीन उपोषणास बसले आहेत. देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या नीट परीक्षेतील गैरव्यवहाराची जबाबदारी स्वीकारून शिक्षण मंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी त्यांची मुख्य मागणी आहे. मात्र, केंद्र सरकार या आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप कामगार संघटनेने केला.

केंद्र सरकारची भूमिका लोकशाहीला मारक 

याप्रसंगी बोलताना संघटनेचे जनरल सेक्रेटरी शाहीर निकम म्हणाले, "संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार देशामध्ये विविध ज्वलंत प्रश्नांवर शांततापूर्ण मार्गाने आंदोलने सुरू आहेत. मात्र, केंद्रातील सरकार आंदोलनकर्त्यांची साधी विचारपूस देखील करत नाही, ही अत्यंत खेदजनक आणि लोकशाहीला मारक अशी गोष्ट आहे."

23 विद्यार्थ्यांच्या आत्महत्येनंतरही सरकार ढिम्म 

यावेळी बोलताना संघटनेचे पदाधिकारी शहाजी भोसले यांनी सरकारवर तोफ डागली. "नीट परीक्षेतील घोळामुळे मनस्ताप सहन करावा लागल्याने देशातील तब्बल 23 हून अधिक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. एवढी मोठी जिवितहानी होऊनही केंद्र सरकार हा विषय गांभीर्याने घेत नाही," असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेचा तीव्र निषेध केला.

गेटवर घोषणाबाजीतून उमटला तीव्र संताप

या गेट मीटिंग दरम्यान गोकुळच्या दोन्ही कार्यालयांच्या मुख्य प्रवेशद्वारावर सर्व कामगार मोठ्या संख्येने एकत्र आले होते. यावेळी कामगारांनी "संविधान जिंदाबाद...", "सोनम वांगचुक आगे बढो, हम तुम्हारे साथ है...", आणि "केंद्रीय शिक्षण मंत्री राजीनामा द्या..." अशा गगनभेदी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. या आंदोलनात व गेट मीटिंगमध्ये गोकुळ कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी शाहीर निकम, अध्यक्ष मल्हार पाटील, अशोक पुणेकर, निवास पाटील, व्ही. डी. पाटील, लक्ष्मण पाटील, दत्ता बच्चे, शहाजी राजे भोसले, योगेश चव्हाण, संभाजी शेलार यांच्यासह संघटनेचे सर्व प्रमुख कार्यकर्ते आणि गोकुळ दूध संघाचे कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इतर महत्वाच्या बातम्या

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये. गेल्या सहा वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.    
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar VIDEO : मोदींवर वार, मदतीला पवार! पवारांचे खासदार मोंदींच्या भेटीला, योगायोग की भविष्यातील रणनीतीचे संकेत?
मोदींवर वार, मदतीला पवार! पवारांचे खासदार मोंदींच्या भेटीला, योगायोग की भविष्यातील रणनीतीचे संकेत?
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Advertisement

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या

Embed widget