Gokul : गोकुळमध्ये पाच संचालक नेमण्याचा फडणवीस सरकारचा निर्णय, दिल्लीतून मोठी अपडेट आली, काँग्रेस सुप्रीम कोर्टात दाद मागणार, बड्या नेत्याची थेट घोषणा
Gokul Election : गोकुळमध्ये पाच संचालक नेमण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणार असल्याचं काँग्रेस नेते पवन खेरा यांनी म्हटलं आहे.

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर 500 कोटींपेक्षा अधिक उलाढाल असणाऱ्या संस्थेत पाच संचालक नामनिर्देशित करण्याचा निर्णय घेतला आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या पॅनलनं 13 तर महायुतीच्या पॅनलनं 12 जागांवर विजय मिळवला होता. मात्र, गोकुळच्या नियमानुसार 25 पैकी 14 सदस्य सभेस उपस्थित असेल तर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड होऊ शकते. मुंबई उच्च न्यायालयानं 10 नोव्हेंबरला अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यापूर्वी राज्य सरकारनं 5 संचालक नेमण्याचा निर्णय घेतल्यानं काँग्रेससह महाविकास आघाडीतून सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी फडणवीस सरकारच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याचं म्हटलं आहे.
पवन खेरा काय म्हणाले?
पवन खेरा यांनी महाराष्ट्र सरकार कायद्यात बदल करुन गोकुळमध्ये लोकशाही प्रक्रियेद्वारे मिळालेला कौल बदलण्याचा प्रयत्न करतंय. कायदेशीर बदल करत निवडून आलेल्या संचालक मंडळाची रचना बदलली जातेय. 19 ऑक्टोबरला जाहीर झालेल्या निकालात काँग्रेसचा पाठिंबा असलेल्या पॅनेलनं 25 पैकी 13 जागा जिंकल्या होत्या, तर महायुतीनं 12 जागा जिंकलेल्या. महायुतीच्या संचालकांकडून अध्यक्षपदाची निवडणूक थांबवली जातेय. मुंबई हायकोर्टानं पुन्हा 10 नोव्हेंबरला निवडणूक घेण्याचे आदेश दिलेत, असं पवन खेरा यांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं.
निवडणुकीच्या माध्यमातून निवडून आलेल्या संचालक मंडळाला काम करु देण्याऐवजी राज्याच्या कॅबिनेटनं चार शासकीय संचालक नेमून, त्यांना मतदानाचा अधिकार देऊन गोकुळच्या मतदारांनी दिलेला निवडणुकीचा निकाल बदलण्याचा प्रयत्न केला जातोय. राज्य सरकार निवडणूक झाल्यानंतर नियम बदलू शकते का हा सवाल आहे. आम्ही या निर्णयाला सप्रीम कोर्टात आव्हान देऊन सहकारी संस्थांची स्वायतत्ता जपण्याचाप्रयत्न करु असं पवन खेरा यांनी म्हटलं.
The Maharashtra government is brazenly attempting to subvert the democratic mandate of milk producers at the Gokul Milk Federation by using legislative changes to manipulate the composition of an elected board. In the 19 October elections, the Congress-led panel won 13 of 25 seats, securing a majority over the Mahayuti’s 12. After Mahayuti-backed directors stalled the chairman’s election by remaining absent, the Bombay High Court directed a fresh election on 10 November. Instead of allowing the elected board to function, the state Cabinet has approved a proposal to nominate four government directors with voting rights, potentially altering the electoral arithmetic and overturning the mandate of milk producers. The larger question is whether a government can change the rules after an election simply because it does not like the result. We are challenging this decision in the Supreme Court to defend the democratic mandate and the autonomy of cooperative institutions.
— Pawan Khera 🇮🇳 ಪವನ್ ಖೇರಾ (@Pawankhera) November 4, 2026
राज्य सरकारचा नेमका निर्णय काय?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहकार विभागाच्या अंतर्गत येणारा एक निर्णय घेतला गेला. हा निर्णय गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आल्याचं बोललं जातंय.राज्यातील ज्या सहकारी संघिक संस्थांची वार्षिक उलाढाल पाचशे कोटींहून अधिक आहे, अशा संस्थांच्या समित्यांवर शासन नामनिर्देशित पाच सदस्यांची नियुक्ती होणार. एक सहाय्यक निबंधकाच्या दर्जापेक्षा कमी नसलेला अधिकारी आणि संस्थेच्या कार्याचा अनुभव असलेल्या चार व्यक्तींची नियुक्ती होणार आहे. शासकीय अधिकाऱ्याला मताचा अधिकार नसेल. इतर चौघांना संचालक मंडळात मताचा अधिकार असेल पण ते संस्थेच्या पदाधिकारी पदाच्या निवडणुकीस पात्र राहणार नाहीत. ही सुधारणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना लागू राहणार नाही. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६०च्या कलम ७३ अअअ (२) च्या परंतुकामध्ये नवीन परंतुक समाविष्ट करण्यास मंजुरी राज्य सरकारनं दिली आहे.























