एक्स्प्लोर

Girish Mahajan on Eknath Khadse : एकनाथ खडसे, तुमच्या या "गुलाबी गप्पा" कोणासोबत रंगल्यात? ये रिश्ता क्या कहलाता है? गिरीश महाजनांनी नाथाभाऊ अन् प्रफुल लोढाचा फोटोच बाहेर काढला

Girish Mahajan on Eknath Khadse : गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे आणि प्रफुल्ल लोढाचा फोटो एक्सवर पोस्ट करत एकनाथ खडसेंना डिवचले आहे.

Girish Mahajan on Eknath Khadse : हनी ट्रॅपसह (Honey Trap) इतरही काही गंभीर गुन्हे दाखल असलेल्या प्रफुल लोढामुळे (Praful Lodha) राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि भाजपचे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यात सध्या चांगलीच जुगलबंदी रंगली आहे. लोढाशी संबंध जोडून जुने व्हिडीओ तसेच छायाचित्रे बाहेर काढून एकमेकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्नही दोघांकडून केला जात आहे. एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन आणि प्रफुल लोढाचे पूर्वापार घनिष्ट संबंध असल्याचा सनसनाटी आरोप केला होता. आता मंत्री महाजन यांनी प्रफुल्ल लोढा हा खडसे यांना गुलाब पुष्प देतानाचे छायाचित्र समाज माध्यमावर प्रसारित करत जोरदार हल्लबोल केलाय.  

गिरीश महाजन यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, एकनाथ खडसे... तुमच्या या "गुलाबी गप्पा" कोणासोबत रंगल्या आहेत? ये रिश्ता क्या कहलाता है? तुमचे हे षडयंत्र जनतेसमोर उघड होतंय. हाच तो प्रफुल्ल लोढा ज्याला तुम्ही दारूडा बोलला होतात? हाच तोच प्रफुल्ल लोढा ज्याने तुमच्यावर स्वतःच्या मुलाच्या खुनाचा आरोप केलेला आहे. 2019 ते 2022 च्या दरम्यान अश्या खोट्या पुराव्यांचा आधारे सत्तेचा गैरवापर करून तुम्ही माझ्यावर असंख्य आरोप केले. त्या प्रत्येक आरोपाची चौकशी झाली, अगदी आर्थिक गुन्हे शाखेकडूनही माझी चौकशी झाली, पण त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. मी निर्दोष आहे हेच वारंवार सिद्ध झाले. याबद्दल सविस्तर बोलेलच... आता तुमच्याच म्हणण्यानुसार जो लोढा दारूडा आहे, त्याच प्रफुल्ल लोढाचा आधार घेऊन माझ्यावर बिनबुडाचे आरोप करताय? एकनाथ खडसे. काय तुझी ही व्यथा, असे म्हणत त्यांनी एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधलाय.

गिरीश महाजनांचा विरोधकांवर निशाणा

गिरीश महाजनांनी दुसऱ्या एक्समध्ये म्हटले आहे की, हनीट्रॅप प्रकरणानंतर काहीही संबंध नसताना केवळ एका फोटोच्या जोरावर प्रफुल्ल लोढासोबत माझे नाव जोडण्यात काही रिकामटेकडे लोक पुढे आहेत. त्यांच्याच पक्षाचे नेते असलेल्या शरद पवार, सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे, जयंत पाटील यांच्यासोबत प्रफुल्ल लोढाचे असंख्य फोटो आहेत. आता या लोकांचे प्रफुल्ल लोढा सोबत काय संबंध आहेत? त्यांचंच सरकार असताना मला नाहक खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाला होता. त्यासाठीच सर्वांनी या प्रफुल्ल लोढाला हाताशी धरलं होतं का? खुद्द 'मोठे साहेब'शरद पवारांसोबत प्रफुल्ल लोढाची गहन चर्चा. जिथे संजय राऊत उभा राहतो तिथे उद्धव ठाकरे यांच्या अगदी शेजारी उभा असलेला, कोणीही मास्क लावलेला नसताना (ओळख लपवण्यासाठी) एकटाच मास्क लावून असलेला प्रफुल्ल लोढा. सुप्रिया सुळे ताईंसोबत खडसेंचा लाडका लोढा. शरदचंद्र पवार गटाचे गटाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष/कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांच्याशी प्रफुल्ल लोढाची जवळीक, असे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय.  

आणखी वाचा 

... तर आम्ही नोटांमधे खेळलो असतो, हनी ट्रॅपप्रकरणातील प्रफुल लोढांचा मुलगा समोर; म्हणाला, खडसे अन् मोठ्या साहेबांचं षड्यंत्र

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election : मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी

व्हिडीओ

Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
Kolhapur ZP Election: कोल्हापूर झेडपी अन् 12 पंचायत समित्यांसाठी निवडणुकीचा धुरळा; अवघ्या 25 दिवसात गावगाड्यातून 'कारभारी' ठरणार! कोणत्या गटात कोणतं आरक्षण?
कोल्हापूर झेडपी अन् 12 पंचायत समित्यांसाठी निवडणुकीचा धुरळा; अवघ्या 25 दिवसात गावगाड्यातून 'कारभारी' ठरणार! कोणत्या गटात कोणतं आरक्षण?
प्रचाराची सांगात होताच रिक्षात आढळली बॅग; अपक्ष उमेदवाराने पकडली 50 लाखांची रोकड
प्रचाराची सांगात होताच रिक्षात आढळली बॅग; अपक्ष उमेदवाराने पकडली 50 लाखांची रोकड
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | मंगळवार
ब्लिंकिटने सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ‘10 मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा काढला; स्विगी, झेप्टोवरही दबाव वाढला
ब्लिंकिटने सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ‘10 मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा काढला; स्विगी, झेप्टोवरही दबाव वाढला
Embed widget