एक्स्प्लोर

Pranjal Khewalkar & Girish Mahajan: आणखी किती मुली समोर येतील माहिती नाही; प्रांजल खेवलकरांबाबत गिरीश महाजनांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Pranjal Khewalkar & Girish Mahajan: अलीकडेच पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यात प्रांजल खेवलकर यांच्याविरोधात महिलेच्या संमतीशिवाय फोटो आणि व्हिडिओ काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pranjal Khewalkar & Girish Mahajan: पुणे पोलिसांनी 27 जुलै रोजी एका हॉटेलवर छापा टाकून सुरू असलेल्या रेव्ह पार्टीचा (Pune Rave Party) पर्दाफाश केला. या कारवाईत अटक झालेल्यांमध्ये माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे जावई प्रांजल खेवलकर (Pranjal Khewalkar) यांचाही समावेश आहे. या प्रकरणात दररोज नवे खुलासे होत आहेत. काही दिवसांपूर्वी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत प्रांजल खेवलकर यांच्या फोनमधील एका गुप्त फोल्डरमधून 252 व्हिडिओ आणि 1497 अश्लील फोटो सापडले आहेत, असा दावा केला होता. हे फोटो आणि व्हिडीओ पीडित महिलांना ब्लॅकमेल करण्यासाठी वापरण्यात आले असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाल्याचे देखील रुपाली चाकणकर यांनी म्हटले होते. तर अलीकडेच पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यात प्रांजल खेवलकर यांच्याविरोधात महिलेच्या संमतीशिवाय फोटो आणि व्हिडिओ काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता यावरून एकनाथ खडसे यांचे कट्टर विरोधक गिरीश महाजन यांनी केलेल्या वक्तव्यावरून चर्चांना उधाण आले आहे.  

नेमकं काय म्हणाले गिरीश महाजन? 

मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, प्रथमदर्शनी जे सर्व साहित्य जप्त करण्यात आले होते, ते पोलिसांनी न्यायालयासमोर ठेवले होते. त्यानंतर रूपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन म्हटले होते की, चौदाशे फोटो आणि ऑडिओ रेकॉर्डिंग त्यांच्याकडे सापडले आहे. अनेक तरुण मुलींना पिक्चर आणि गाण्यांचे आमिष दाखवून त्यांच्यावर अन्याय करण्यात आला. अत्याचार करण्यात आले. प्रांजल खेवलकरांविरोधात ज्या तक्रारी दाखल झालेल्या आहेत. त्याबाबत पोलीस चौकशी करत आहेत. या प्रकरणात आणखी किती मुली समोर येतील हे माहिती नाही. याबाबत एसआयटी चौकशीची मागणी केली जात आहे. या प्रकरणाची निःपक्ष चौकशी केली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.  

प्रांजल खेवलकर कोण आहेत?

प्रांजल खेवलकर हे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई असून, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे दुसरे पती आहेत. रोहिणी खडसे यांनी आपल्या पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर, बालपणीचे मित्र असलेल्या प्रांजल खेवलकर यांच्याशी विवाह केला. सध्या खेवलकर आणि खडसे कुटुंबीय मुक्ताईनगर येथे वास्तव्यास आहेत. प्रांजल खेवलकर यांचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय असून, ते राजकारणापासून दूर राहतात. त्यांच्या पत्नी रोहिणी खडसे या मात्र राजकारणात सक्रिय आहेत. प्रांजल खेवलकर हे रिअल इस्टेट आणि इव्हेंट मॅनेजमेंट व्यवसायाशी संबंधित असून, त्यांच्या नावावर साखर व ऊर्जा क्षेत्रातील कंपन्या आहेत. तसेच, त्यांच्या नावावर एक ट्रॅव्हल कंपनी देखील असल्याची माहिती समोर आली आहे. अलीकडे पुण्यातील एका रेव्ह पार्टीत ते आढळून आल्यामुळे प्रांजल खेवलकर हे चर्चेत आले आहेत.

आणखी वाचा 

BJP on Pranjal Khewalkar Case : प्रांजल खेवलकर एकनाथ खडसेंचाच वारसा चालवताय, भाजप नेत्याचा खळबळजनक आरोप, म्हणाले, अनेक वर्षांपासून...

महत्त्वाच्या बातम्या

Solapur : अदृश्य शक्तीनं आम्हाला साथ दिली, दुष्काळात 'वसंत' बहरेल, धैर्यशील मोहिते पाटलांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास
Solapur : अदृश्य शक्तीनं आम्हाला साथ दिली, दुष्काळात 'वसंत' बहरेल, धैर्यशील मोहिते पाटलांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास
Shivsena Crisis : संजय दिना पाटील यांचा शेवटपर्यंत खोटारडेपणा, विमान पकडून लगेच बैठकीला येतो म्हणाले अन् गायब झाले, ठाकरेंच्या बैठकीतील Inside Story 
संजय दिना पाटील यांचा शेवटपर्यंत खोटारडेपणा, विमान पकडून लगेच बैठकीला येतो म्हणाले अन् गायब झाले, ठाकरेंच्या बैठकीतील Inside Story 
खासदार गेले असतील तर तोंड का लपवतायेत? जनतेच्या दरबारात त्यांचे काय हाल होतील सांगता येणार नाही, दानवेंचा हल्लाबोल 
खासदार गेले असतील तर तोंड का लपवतायेत? जनतेच्या दरबारात त्यांचे काय हाल होतील सांगता येणार नाही, दानवेंचा हल्लाबोल 
लोटसशिवाय 'ऑपरेशन टायगर' शक्य नाही, मुंबई महापालिकेत 'ऑपरेशन लोटस' राबवलं जाणार, भाजपच्या नेत्याचं सूचक वक्तव्य
लोटसशिवाय 'ऑपरेशन टायगर' शक्य नाही, मुंबई महापालिकेत 'ऑपरेशन लोटस' राबवलं जाणार, भाजपच्या नेत्याचं सूचक वक्तव्य

व्हिडीओ

Sanjay Raut Arvind Sawant : फुटणाऱ्या आमदार-खासदारांना रस्त्यात तुडवा, ठाकरेंच्या शिवसेनेचा ॲक्शन प्लॅन ठरला
BJP Grand Plan Operation Tiger : शिदेंना ताकदीची गोळी, भाजपची कोणती खेळी? Special Report
Opration Tiger : खासदार वाढले तरी ऑपरेशन टायगर सुरूच; शिंदेंचं अंतिम लक्ष्य काय? | Special Report
Operation Tiger Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : ऑपरेशन फत्ते की ठाकरेंकडे पत्ते? | Special Report
Arvind Sawant on Operation Tiger : ऑपरेशन टायगर फेल, सगळे खासदार ठाकरेंसोबत, सावंतांचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडियात एन्टी होताच वैभव सूर्यवंशी पहिल्याच गंभीर वादात अडकला, कारवाईचा सुद्धा दणका; आता बीसीसीआय लक्ष घालणार की नाही? सचिवांनीच केला खुलासा
टीम इंडियात एन्टी होताच वैभव सूर्यवंशी पहिल्याच गंभीर वादात अडकला, कारवाईचा सुद्धा दणका; आता बीसीसीआय लक्ष घालणार की नाही? सचिवांनीच केला खुलासा!
Shivsena Crisis : संजय दिना पाटील यांचा शेवटपर्यंत खोटारडेपणा, विमान पकडून लगेच बैठकीला येतो म्हणाले अन् गायब झाले, ठाकरेंच्या बैठकीतील Inside Story 
संजय दिना पाटील यांचा शेवटपर्यंत खोटारडेपणा, विमान पकडून लगेच बैठकीला येतो म्हणाले अन् गायब झाले, ठाकरेंच्या बैठकीतील Inside Story 
Ambernath Crime : लग्नानंतर दीड महिन्यातच नवविवाहितेचा गळ्याला दोर; विकृत डॉक्टर पतीकडून हुंड्यासाठी छळ, पाळत ठेवण्यासाठी घरात CCTV
लग्नानंतर दीड महिन्यातच नवविवाहितेचा गळ्याला दोर; विकृत डॉक्टर पतीकडून हुंड्यासाठी छळ, पाळत ठेवण्यासाठी घरात CCTV
Russia-Ukraine War: युक्रेनचा रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; 1 हजारहून अधिक ड्रोन आणि क्रूझ क्षेपणास्त्रे डागली; तेल डेपो उद्ध्वस्त
युक्रेनचा रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; 1 हजारहून अधिक ड्रोन आणि क्रूझ क्षेपणास्त्रे डागली; तेल डेपो उद्ध्वस्त
Smriti Mandhana: स्मृती मंधानाने इतिहास रचला, असा पराक्रम करणारी पहिलीच क्रिकेटर; पुरुष क्रिकेटपटू सुद्धा आसपास नाहीत!
स्मृती मंधानाने इतिहास रचला, असा पराक्रम करणारी पहिलीच क्रिकेटर; पुरुष क्रिकेटपटू सुद्धा आसपास नाहीत!
NEET Exam:दोन दिवसांत चार NEET विद्यार्थ्यांकडून आयुष्याचा शेवट; गुजरातमध्ये एकाने सहाव्या मजल्यावरून उडी मारली; दुसऱ्या विद्यार्थ्यानं लिहिलं, 'पुन्हा परीक्षा देण्याची भीती वाटते'
दोन दिवसांत चार NEET विद्यार्थ्यांकडून आयुष्याचा शेवट; गुजरातमध्ये एकाने सहाव्या मजल्यावरून उडी मारली, दुसऱ्या विद्यार्थ्यानं लिहिलं, 'पुन्हा परीक्षा देण्याची भीती वाटते'
BCCI चा मास्टरप्लॅन, 2027 च्या हंगामात आयपीएलमध्ये होणार मोठा बदल, बीसीसीआयच्या सचिवांनी दिली मोठी अपडेट
BCCI चा मास्टरप्लॅन, 2027 च्या हंगामात आयपीएलमध्ये होणार मोठा बदल, बीसीसीआयच्या सचिवांनी दिली मोठी अपडेट
Shiv Sena UBT Crisis: ठाकरेंच्या सेनेकडून बाळासाहेबांच्या आदेशांची आठवण, फुटीर खासदारांना थेट Y+ सुरक्षा तैनात! राऊत म्हणाले, 'फक्त अर्धा तास मला ईडी, सीबीआय द्या, पहिला गिरीश महाजनला फोडतो..'
ठाकरेंच्या सेनेकडून बाळासाहेबांच्या आदेशांची आठवण, फुटीर खासदारांना थेट Y+ सुरक्षा तैनात! राऊत म्हणाले, 'फक्त अर्धा तास मला ईडी, सीबीआय द्या, पहिला गिरीश महाजनला फोडतो..'
Embed widget