Girish Mahajan and Vijay Chaudhari: भारतीय जनता पक्षाचे (BJP) उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी (Vijay Chaudhari) आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यातील संभाषणाची एक कथित ऑडिओ क्लिप (Viral Audio Clip) सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या कथित ऑडिओ क्लिपमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि त्यांच्या सून तथा केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे (Raksha Khadse) यांच्याबाबत अत्यंत आक्षेपार्ह व भाषेचा वापर करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. या धक्कादायक प्रकारामुळे भाजपमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले असून राज्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Continues below advertisement

Girish Mahajan and Vijay Chaudhari: कथित संभाषणातील संवाद जसाच्या तसा 

विजय चौधरी (उत्तर महाराष्ट्र संयोजक): हॅलो.

गिरीश महाजन (मंत्री): बोला.

Continues below advertisement

विजय चौधरी: या माXXXX खडसे नेहमीच तो असेल त्याची मुलगी असेल, तो असेल बोलत राहतो, आणि रक्षा खडसेला आपण मंत्री करून ठेवला आहे. मंत्री पदावरून काढला पाहिजे, उठल्या सुठल्या काही तरी घाणेरडे काहीही आरोप करतो, दरवेळेस त्याची.

गिरीश महाजन: हम्म हम्म...

विजय चौधरी: हे कसं सहन करायचा पण हा...

गिरीश महाजन: खरं आहे.

विजय चौधरी: तुम्ही सांगा, काय आदेश करणार, सांगा.

गिरीश महाजन: मी करतो बरोबर तुम्ही गंमत बघा...

विजय चौधरी: नाही भाऊ अति झाला ना. प्रत्येक वेळेस तुमच्यावर येतो, माXXXXX घेणं देणं नाही, काही तथ्य नसतं, काहीही खोट बोलतो माXXXXX

गिरीश महाजन: आणि फोटो दाखवतो, भXX 10 लोकांचे फोटो आहेत. सर्व नेत्यांचे फोटो आहेत ना.

विजय चौधरी: मग

गिरीश महाजन: हम्म हम्म....

विजय चौधरी: माXXXX इथे शिरपूरला एका डॉक्टरच्या बायकोसोबत लफडं आहे. दुनियाभरचे पाप त्याच्या मुलीची आहेत.

गिरीश महाजन: हम्म हम्म हो...

विजय चौधरी: माXXXXX हे भाऊ काही तरी आक्रमक भूमिका घेतली पाहिजे आणि पार्टीला सांगितलं पाहिजे चालणार नाही. दुहेरी भूमिका चालणार नाही, एकतर रक्षाचा राजीनामा घ्या, आम्हाला हे पुन्हा चालणार नाही.

गिरीश महाजन: बरोबर...

गिरीश महाजन: करतो करतो काही तरी इलाज करतो..

विजय चौधरी: जी भाऊ तुम्ही सांगा मी त्या भXXX विरोधात पत्र काढतो.

गिरीश महाजन: हम्म करतो मी, त्याचा कर्तव्य मी उठवतो, चला मला विमान पकडायचे आहे.

विजय चौधरी: जी भाऊ....

असे संभाषण दोन्ही नेत्यांमध्ये झाल्याची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपची पुष्टी एबीपी माझा करत नाही.

Girish Mahajan and Vijay Chaudhari: राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण

विशेष म्हणजे रक्षा खडसे या सध्या केंद्र सरकारमध्ये मंत्री म्हणून कार्यरत आहेत, तर दुसरीकडे एकनाथ खडसे सातत्याने भाजपच्या स्थानिक व राज्यस्तरीय नेत्यांवर टीका करत असतात. अशा परिस्थितीत उत्तर महाराष्ट्रातील भाजपच्या दोन मोठ्या नेत्यांमधील हे कथित संभाषण बाहेर आल्यामुळे राजकीय वर्तुळाचे या प्रकरणाकडे लक्ष लागले आहे. या ऑडिओ क्लिपवर आता संबंधित नेत्यांकडून काय स्पष्टीकरण येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.  

आणखी वाचा 

Girish Mahajan: 'वयाचा विचार करता आम्ही आता किती दिवस काम करणार...'; गिरीश महाजनांचे निवृत्तीचे संकेत? 'त्या' विधानाची जोरदार चर्चा