Sujay Vikhe Patil on Nagar Manmad Road: नगर दक्षिणचे माजी खासदार, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील नेहमीच आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत राहिले आहेत. राहूरीत काल (16 ऑगस्ट) तिरंगा रॅली दरम्यान झालेल्या कार्यक्रमातही सुजय यांनी नगर-मनमाड महामार्गाच्या कामावरून थेट अमिरेकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धनीतीमुळे रस्ता रखडल्याचं भाष्यं केलं.

Continues below advertisement

आणि माझाच मेंदू खराब झाला

मी मेंदूचा डॉक्टर आहे; परंतु राजकारणात आलो आणि माझाच मेंदू खराब झाला,” अशी टिप्पणी सुजय विखे पाटील यांनी केली. नगरमध्ये तब्बल 40 हजार कोटी रुपयांची विकासकामे आपण केली आहेत. मात्र, नगर–मनमाड महामार्गाच्या कामात सध्या दिरंगाई होत असल्याच सांगताना युद्धजन्य परिस्थितीमुळे डांबराचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून, त्याचा थेट परिणाम विकासकामांवर झाला आहे, असे विखे यांनी म्हटलं आहे.

रस्त्यांसाठी लागणारे डांबर दिल्लीवरून आणावे लागते

सुजय विखे यांनी सांगितले की, महामार्गाच्या कामाबाबत केवळ आंदोलन करणे किंवा सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करणे हा उपाय नाही. रस्त्याच्या कामासंदर्भात नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी काही काळ संयम ठेवावा असे आवाहन सुजय विखे पाटील यांनी केले. डोनाल्ड ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही. त्यांनी केलेल्या युद्धामुळे रस्त्यांसाठी लागणारे डांबर थेट दिल्लीवरून आणावे लागते. त्यामुळे अनेक रस्त्यांची कामे खोळंबली आहेत,” असा दावा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे पाटील यांनी केला. नगर–मनमाड महामार्गाच्या कामालाही या परिस्थितीचा फटका बसला असून, “नगर–मनमाड रस्ता फक्त सुजय विखेच पूर्ण करू शकतो,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे रस्त्याच्या कामावरून सुरू असलेल्या विखे यांनी केलेल्या टिप्पणीची चर्चा रंगली आहे.

Continues below advertisement

इतर महत्वाच्या बातम्या