Gondia News : राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. माजी वित्तमंत्री महादेवराव शिवनकर यांचे वृद्धापकाळाने निधन (Mahadevrao Shivankar Passes Away)  झाले आहे. जलसंपदा मंत्री आणि वित्तमंत्री म्हणून त्यांनी मनोहर जोशी (Manohar Joshi) मुख्यमंत्री असताना कारभार सांभाळला. सोबतच जनसंघापासून ते भाजपचे ज्येष्ठ नेते असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. त्यांच्या निधनाच्या घटनेने कुटुंबियांसह राजकीय वर्तुळात शोकळा पसरली आहे. त्यांच्या मागे मुलगा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय शिवणकर व संजय शिवणकर यांच्यासह बराच मोठा आप्त परिवार आहे.

Continues below advertisement

Mahadev Shivankar :  सिंचन मंत्री, 1 वेळा खासदार, आमगाव विधानसभेचे 5 वेळा आमदार

महाराष्ट्राचे माजी वित्तमंत्री माजी खासदार आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते महादेवरावजी शिवणकर यांचे आज (दिनांक 20 ऑक्टोबर 2025) सोमवारला सकाळी 8 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. महादेवराव शिवनकर हे आमगाव विधानसभेचे 5 वेळा आमदार आणि चिमूर लोकसभेचे 1 वेळा खासदार म्हणून त्यांनी कार्यकाळ सांभाळला आहे. यासह त्यांनी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या सरकारमध्ये सिंचन मंत्री म्हणून देखील काम पाहिले आहे. संघाच्या स्वयंसेवकापासून ते मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न देण्याची मागणी संसदेत पहिल्यांदा माजी खासदार प्रा.शिवणकर यांनी केली होती.त्यांनी गोंदिया जिल्ह्यात पाटबंधारे मंत्री असताना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात मोलाचे योगदान दिले. त्यांच्यामुळे कलपाथरी, बेवारटोला, ओवारा, पुजारीटोला, कालीसरार सारखे सिंचनाचे प्रकल्प जिल्ह्यात आज तयार होऊन शेतकरी विकासात हात लावलेला आहे. 

संघाच्या स्वयंसेवकापासून ते मंत्री असा राजकीय प्रवास

नाव : महादेवराव सुकाजी शिवणकर

Continues below advertisement

जन्म: 7 एप्रिल 1940

जन्मस्थळ : आमगाव, जिल्हा गोंदिया

शिक्षण : एम.ए.(अर्थशास्त्र), एम.ए.(इतिहास)व्यवसाय : शेतकरी (मूळ), माजी व्याख्याता (अर्थशास्त्र व इतिहास)भवभूती महाविद्यालय आमगाव (नागपूर विद्यापीठ संलग्र)26 जुर्ले 1975 रोजी आणिबाणीकाळात तुरुगांत गेले.राजकीय वाटचाल : 1978 ते 2008 पर्यंत निवडणुकीत अजिंक्यविधानसभा सदस्य : 1978 ते 1989 ( तीन वेळा आमगाव विधानसभा)1994 ते 2004 (दोन वेळा आमगाव विधानसभा)कॅबिनेट मंत्री पाटबंधारे, वित्त व नियोजन (1999-2004)संसद सदस्य : 1989 ते 1994 व 2004 ते 2008

-  2004 मध्ये चिमूर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेल्याबरोबर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न देण्याची मागणी संसदेत केली होती.

- माजी मंत्री महादेवराव शिवनकर हे आमदार विधानसभेचे पाच वेळा आमदार राहिले आहेत. 1978,1980,1985, 1995,1999

- 1995 ते 1997 मध्ये मनोहर जोशी मंत्रिमंडळ मध्ये जल संपदा मंत्री.

- 1997 ते 1999 मध्ये मनोहर जोशी मंत्रिमंडळामध्ये वित्तमंत्री.

इतर महत्त्वाच्या बातम्या