एक्स्प्लोर

Farmers Loan Waiver Maharashtra: शेतकरी कर्जमाफीसाठी कोण पात्र, कोण अपात्र, सरकारचे सर्व निकष सोप्या शब्दात!

Farmers Loan Waiver Maharashtra: राज्यातील शेतकरी बांधवांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळवून देणार्‍या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेस आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

Farmers Loan Waiver Maharashtra: राज्यातील शेतकरी बांधवांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी (Maharashtra Loan Waiver Scheme) मिळवून देणार्‍या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेस आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) होते. या योजनेत जमीन धारणेचा निकष नसेल. दोन लाख रुपयांपर्यंत ही कर्जमाफी असेल. (Farmers Loan Waiver Maharashtra)

महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना मोठा दिलासा देणारा आणि ऐतिहासिक असा निर्णय घेतल्याबद्दल मंत्रिमंडळ बैठकीत सर्व मंत्रीगण सदस्यांनी टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले व या निर्णयाचे स्वागत केले. या योजनेत कर्जमुक्ती, ‘वन टाईम सेटलमेंट’ व प्रोत्साहनपर लाभ असे तीन घटक केल्याने, राज्यातील बहुतांश शेतकरी बांधवांना याचा लाभ होणार आहे. ज्यांचे कर्ज दोन लाखांपेक्षा कमी आहे, त्यांना दोन लाख रुपयांपर्यंत माफी मिळाल्याने असे शेतकरी पूर्णपणे कर्जमुक्त होणार आहेत. ज्यांचे कर्ज दोन लाखांपेक्षा अधिक आहे, त्या शेतकर्‍यांना दोन लाखांवरील थकबाकी 31 मार्च 2027 पूर्वी भरल्यास मुदत देण्यात येईल. त्यांच्या खात्यातही दोन लाख रुपये शासन जमा करणार आहे. तर याशिवाय प्रोत्साहनपर लाभ योजनेत कर्जाची नियमित परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना अधिकाधिक पन्नास हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. या योजनेत राजकीय पदाधिकारी, सरकारी कर्मचारी व आयकर पात्र व्यक्ती, सहकारी संस्थांचे 25 हजार रुपयांहून अधिक वेतन असणारे अधिकारी, कर्मचारी पात्र नसतील. (Farmers Loan Waiver Maharashtra)

कर्जमुक्ती योजना- (Farmers Loan Waiver Maharashtra)

शेतकर्‍यांनी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची 30 सप्टेंबर 2025 अखेर थकीत असलेली व 31 मार्च 2026 अखेर परतफेड न झालेली एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्जखात्यावरील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह अधिकतम दोन लाखापर्यंत आहे, अशा शेतकर्‍यांना (जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता) दोन लाख रुपयांपर्यतची कर्जमाफी दिली जाईल.

एकवेळ समझोता योजना- (Farmers Loan Waiver Maharashtra)

  1. या योजनेमध्ये 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्ज खात्यांची एक किंवा अनेक बँकांकडील मुद्दल व व्याजासह 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेली व 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेली एकत्रित थकबाकीची रक्कम दोन लाखांपेक्षा जास्त असेल, अशा शेतकर्‍याने दोन लाखांपेक्षा जास्त असलेली थकीत रकमेची बँकेस/संस्थेस परतफेड करणे आवश्यक असेल. अशी रक्कम परतफेड केल्यानंतर पात्र शेतकर्‍याला ‘वन टाईम सेटलमेंट’ म्हणून दोन लाख रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात येईल.
  2. या योजनेत देखील 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 अखेर उचल केलेल्या पीक कर्जाचे पुनर्गठन/फेरपुनर्गठन केलेल्या कर्जखात्यांपैकी एक किंवा अनेक बँकांकडील 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या व 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेल्या थकीत हप्त्यांची मुद्दल व व्याजासह दोन लाखांपेक्षा जास्त असल्यास अशा शेतकर्‍याने प्रथम दोन लाखांपेक्षा जास्त असलेली थकीत हप्त्यांच्या रकमेची परतफेड करणे आवश्यक असेल.
  3. अशी रक्कम परतफेड केल्यानंतरच पात्र शेतकर्‍याला एकवेळ समझोता योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांची कर्जमाफी मिळेल. तसेच, या योजनेमध्ये शेतकर्‍यांना त्यांच्या हिश्श्याची दोन लाखांवरील रक्कम बँकेमध्ये जमा करण्यासाठी 31 मार्च 2027 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

प्रोत्साहनपर लाभ योजना- (Farmers Loan Waiver Maharashtra)

  1. ज्या शेतकर्‍यांची मुद्दल व व्याजासह थकबाकीची रक्कम 50 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे, अशा शेतकर्‍यांनी पन्नास हजार रुपयांवरील संपूर्ण थकबाकी बँकेत जमा केल्यानंतर त्यांना प्रतिशेतकरी पन्नास हजार रुपये देण्यात येणार आहेत, जेणेकरून ते कर्जमुक्त होतील. या योजनेमध्ये शेतकर्‍यांना त्यांच्या हिश्श्याची 50 हजारांवरील रक्कम बँकेमध्ये जमा करण्यासाठी देखील 31 मार्च 2027 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
  2. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, 2019 या योजनेमध्ये ज्या शेतकर्‍यांना लाभ मिळाला आहे. अशा शेतकर्‍यांनी नव्याने घेतलेल्या कर्जाची थकबाकी झाली असल्यास अशा शेतकर्‍यांनी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची 30 सप्टेंबर 2025 अखेर थकीत असलेल्या व 31 मार्च 2026 अखेर परतफेड न झालेली मुद्दल व व्याजासह रक्कम 50 हजार रुपये असल्यास अशा शेतकर्‍यांना 50 हजार रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे.
  3. नियमित परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन 2022-23, सन 2023-24, सन 2024-25 तीन आर्थिक वर्षांपैकी, कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करुन आर्थिक वर्ष संपल्यानंतर 30 जूनपूर्वी किंवा बँकेच्या नियमानुसार वेळेत कर्जाची परतफेड केलेल्या शेतकर्‍यांना प्रति शेतकरी 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत. तथापि, अशा पात्र शेतकर्‍यांनी चालू आर्थिक वर्षात अल्प मुदत पीक कर्ज घेतले असल्यास अशा कर्जाची देखील मुदतीत परतफेड करणे अनिवार्य असेल.

योजना अंमलबजावणीसाठी व बँकासोबत वाटाघाटीसाठी सचिवस्तरीय समिती- (Farmers Loan Waiver Maharashtra)

योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती काम करेल. तसेच राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका व ग्रामीण बँकांकडील शेतकर्‍यांच्या पीक कर्ज/पुनर्गठित अनुत्पादित कर्जांना कर्जमुक्तीचा लाभ देत असताना अनुत्पादित कर्जाच्या तारखेनुसार कर्ज खतावणी शिल्लकेला निश्चित केलेल्या टक्केवारीप्रमाणे सूट देण्याची रक्कम निश्चित केली जाईल. यासाठी बँकासोबत वाटाघाटी करुन सूट देण्याची रक्कमेचे प्रमाण निश्चित करण्यासाठी अपर मुख्य सचिव (वित्त) यांच्या अध्यक्षतेखाली, प्रधान सचिव (सहकार), व्यवस्थापकीय संचालक (महा-आयटी), प्रशासक महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, समन्वयक, राज्यस्तरीय बँकर्स समिती व सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था यांची समिती काम करेल. ही योजना राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून घेतलेल्या कर्जास तसेच प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांनी त्यांच्या स्वत:च्या निधीतून वितरित केलेल्या कर्जांना देखील लागू राहील. यासाठी शेतकर्‍यांचे आधार प्रमाणीकरण केले जाईल. तसेच, अ‍ॅग्रीस्टॅक आधार सामग्री मंचावर शेतकर्‍यांची नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. योजनेच्या कार्यान्वयनासाठी अद्ययावत पोर्टल विकसित करण्यात येईल.

शेतकरी कर्जमाफीसाठी कोण पात्र, कोण अपात्र, सरकारचे सर्व निकष सोप्या शब्दात- (Farmers Loan Waiver Maharashtra)

कर्जमाफी कोणाला मिळणार? (Farmers Loan Waiver Maharashtra)

या योजनेनुसार १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकबाकी असलेली आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेली कर्जे कर्जमाफीस पात्र राहणार आहेत. अशा शेतकऱ्यांच्या एक किंवा अधिक बँकांमधील कर्जखात्यांवरील मुद्दल व व्याजासह थकबाकीची एकत्रित रक्कम दोन लाख रुपयांपर्यंत असल्यास शासनाकडून ती रक्कम भरून दिली जाईल. पुनर्गठित किंवा फेरपुनर्गठित पीक कर्जांचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

२०१९ च्या कर्जमुक्तीचे लाभार्थी वगळले? (Farmers Loan Waiver Maharashtra)

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ चा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना मात्र कमाल ५० हजार रुपयांपर्यंतचा लाभ मिळणार आहे. अशा शेतकऱ्यांची थकबाकी ५० हजार रुपयांपर्यंत असल्यास तेवढी रक्कम शासनाकडून दिली जाणार असल्याचे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

वन टाईम सेटलमेंट योजना- (Farmers Loan Waiver Maharashtra)

दोन लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना एकवेळ समझोता (ओटीएस) योजनेचा लाभ दिला जाणार आहे. यासाठी दोन लाख रुपयांवरील थकीत रक्कम शेतकऱ्यांनी स्वतः भरल्यानंतर त्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळेल. ही रक्कम भरण्यासाठी ३१ मार्च २०२७ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

प्रोत्साहनपर लाभ- (Farmers Loan Waiver Maharashtra)

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही शासनाने प्रोत्साहनपर लाभाची तरतूद केली आहे. सन २०२२-२३, २०२३-२४ आणि २०२४-२५ या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन वर्षांत पीक कर्ज घेऊन त्याची नियमानुसार वेळेत परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत लाभ दिला जाईल. मात्र संबंधित शेतकऱ्यांनी २०२५-२६ आणि २०२६-२७ या वर्षांतील पीक कर्जाचीही वेळेत परतफेड करणे आवश्यक राहील.

ॲग्रीस्टॅक अनिवार्य- (Farmers Loan Waiver Maharashtra)

योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणीकरण आणि ॲग्रीस्टॅकवर नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. राष्ट्रीयीकृत बँका, खाजगी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तसेच काही सहकारी संस्थांकडून घेतलेल्या पीक कर्जांना ही योजना लागू राहणार आहे.

अपात्र कोण?- (Farmers Loan Waiver Maharashtra)

विद्यमान आणि माजी मंत्री, खासदार, आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य, २५ हजार रुपयांपेक्षा अधिक मासिक वेतन असलेले सरकारी कर्मचारी, आयकरदाते, २५ हजार रुपयांपेक्षा जास्त पेन्शनधारक तसेच काही सहकारी संस्थांचे पदाधिकारी आणि अधिकारी योजनेसाठी अपात्र राहतील.

योजनेसाठी पोर्टल- (Farmers Loan Waiver Maharashtra)

योजनेची संपूर्ण अंमलबजावणी ऑनलाइन पद्धतीने केली जाणार असून त्यासाठी स्वतंत्र पोर्टल आणि ‘सहकार स्टॅक’ प्रणाली विकसित करण्यात येणार आहे, असेही राज्य सरकारने शासन निर्णयात स्पष्ट केले आहे.

संबंधित बातमी:

Farmers Loan Waiver Maharashtra: शेतकरी कर्जमाफीसाठी कोणकोणते पदाधिकारी अपात्र, 25 हजारापेक्षा जास्त पगार असणाऱ्यांनाही लाभ नाही, वाचा निकषांची ए टू झेड माहिती

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Operation Tiger UBT Shivsena: ठाकरेंच्या सहा खासदारांपाठोपाठ एकनाथ शिंदेंनीही दिल्ली गाठली; अरविंद सावंतांनी ओम बिर्लांना तडकाफडकी पत्र धाडलं!
ठाकरेंच्या सहा खासदारांपाठोपाठ एकनाथ शिंदेंनीही दिल्ली गाठली; अरविंद सावंतांनी ओम बिर्लांना तडकाफडकी पत्र धाडलं!
Operation Tiger Live updates: दिल्लीत ऑपरेशन टायगर अंतिम टप्प्यात, ठाकरेंचे खासदार आणि एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल, ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार
Operation Tiger Live updates: दिल्लीत ऑपरेशन टायगर अंतिम टप्प्यात, ठाकरेंचे खासदार आणि एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल, ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार
Shivsena : शिंदेंना पाठिंबा देणारे ठाकरेंचे पाच खासदार फायनल, उशीरा दिल्लीत पोहोचणारा सहावा खासदार नेमका कोण? 
शिंदेंना पाठिंबा देणारे ठाकरेंचे पाच खासदार फायनल, उशीरा दिल्लीत पोहोचणारा सहावा खासदार नेमका कोण? 
खासदारांना विकत घेण्यासाठी 15 कोटींचा अॅडव्हान्स, संजय राऊतांच्या पोस्टमुळं ऑपरेशन टायगरला पुष्टी?
खासदारांना विकत घेण्यासाठी 15 कोटींचा अॅडव्हान्स, संजय राऊतांच्या पोस्टमुळं ऑपरेशन टायगरला पुष्टी?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Operation Tiger : ठाकरेंचे सहा खासदार शिंदेंच्या गळाला? कोण कुठे आहे? आत्ताची मोठी अपडेट
Raju Waghmare On Operation Tiger Zero Hour : २०२९ पर्यंत उद्धव ठाकरे यांचा पक्ष संपलेला असेल? | Zero Hour
Goras Bhandar FDA Action Wardha: तुकाराम मुंढेंच्या कारवाईला गोरस भंडारचे हायकोर्टात आव्हान
Sudhir Mungantiwar on Opration Tiger : ठाकरेंचे खासदार देशहितासाठी सोबत येत असतील तर स्वागतच - सुधीर मुनगंटीवार
Shahajibapu Patil Solapur: गणेश नाईकांनी शरद पवारांच्या मदतीने सरकार पाडायचा केला होता प्रयत्न
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Operation Tiger Live updates: दिल्लीत ऑपरेशन टायगर अंतिम टप्प्यात, ठाकरेंचे खासदार आणि एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल, ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार
Operation Tiger Live updates: दिल्लीत ऑपरेशन टायगर अंतिम टप्प्यात, ठाकरेंचे खासदार आणि एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल, ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार
Shivsena : ठाकरेंच्या सहा खासदारांपाठोपाठ एकनाथ शिंदेही दिल्लीच्या दिशेने, लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन पाठिंब्याचं पत्र देणार, सूत्रांची माहिती
ठाकरेंच्या सहा खासदारांपाठोपाठ एकनाथ शिंदेही दिल्लीच्या दिशेने, लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन पाठिंब्याचं पत्र देणार, सूत्रांची माहिती
अभिनेत्री संचिताचे उज्ज्वल शर्मासोबतचे चॅट समोर, 3000 रुपये घेतलेले; नातेवाईकांचे आरोप, तोच मुलीला त्रास द्यायचा
अभिनेत्री संचिताचे उज्ज्वल शर्मासोबतचे चॅट समोर, 3000 रुपये घेतलेले; नातेवाईकांचे आरोप, तोच मुलीला त्रास द्यायचा
मंडोळ्या बांधून नटली नवरीबाई; सुप्रिया सुळेंच्या घरी लगीनघाई, वडिलांची लाडाची लेक लवकरच मांडवात
मंडोळ्या बांधून नटली नवरीबाई; सुप्रिया सुळेंच्या घरी लगीनघाई, वडिलांची लाडाची लेक लवकरच मांडवात
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी  733.28 रुपयांचा निधी मंजूर, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी  733.28 रुपयांचा निधी मंजूर, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचं रक्त काढून राज्यातील इतर विभागप्रमुखांना द्या, म्हणजे...; माजी मंत्र्यांचं मुख्य सचिवांना पत्र
तुकाराम मुंढेंचं रक्त काढून राज्यातील इतर विभागप्रमुखांना द्या, म्हणजे...; माजी मंत्र्यांचं मुख्य सचिवांना पत्र
कंगना रणौतचा नवा सिनेमा, 26/11 दहशतवादी हल्ल्याची स्टोरी पुन्हा मोठ्या पडद्यावर; 'भारत भाग्य विधाता' का पाहावा?
कंगना रणौतचा नवा सिनेमा, 26/11 दहशतवादी हल्ल्याची स्टोरी पुन्हा मोठ्या पडद्यावर; 'भारत भाग्य विधाता' का पाहावा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2026 | मंगळवार
Embed widget