Ravikant Tupkar : सामान्य महिलांना मायक्रो फायनान्सच्या बँक त्रास देत आहे. बँका बेकायदेशीर वागत असेल तर आम्ही एकही राज्यातील बँका त्यांचे ऑफिस सोडणार नाही. उद्योगपतींचे कर्ज माफ होतं, शेतकऱ्यांचं का होत नाही? यासाठी केंद्र आणि राज्य सरकारला माझा सवाल आहे. आम्ही नागपूरमध्ये आंदोलन केले. पुढच्या जून महिन्यामध्ये कर्जमाफी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. सरकार हात चलाखी करू शकतात. लाडक्या बहिणीचे नाव त्यामध्ये टाकतील, जाचक अटी टाकणार. आम्ही राज्यात बँका, फायनान्स, मायक्रो फायनान्स, खाजगी बँक यांच्या विरोधात मोठं आंदोलन उभारणार. याला सरकार जबाबदार असणारअसाइशारा इशाराशेतकरीनेते रविकांत तुपकर (Farmer Leader Ravikant Tupkar) यांनीदिलाआहे.

राज्यातील लाखो कुटुंब दबलेली आहे. एक लाख कर्ज घेतले तर दहा ते वीस लाख वसूल करतात. बँका फायनान्स, मायक्रो फायनान्स यांना कोणतेच लायसन्स नाही. या पीडित कुटुंबांसाठी आम्ही राज्यात मोठ आंदोलन उभे करणार. शेतकरी कर्जमाफीचा देखील आम्ही मुद्दा मांडणार. असेही रविकांत तुपकर म्हणाले.

Ravikant Tupkar ON Farmer Loan Waiver : उद्योगपतींचे कर्ज माफ केले जातात, शेतकऱ्यांचे का होत नाही?

शेतकऱ्याच्या जमिनी बँक, फायनान्स कंपनीकडून जप्त केल्या जात आहे. उद्योगपतींचे कर्ज माफ केले जातात, शेतकऱ्यांचे कर्ज माफ होत नाही, ही आमची मागणी आहे. सरकारच्या बदलत्या भूमिकेमुळे शेतकरी कर्जबाजार झाला आहे. शेतकऱ्यांच्या घरावर जप्ती येतात त्यावेळी कुटुंब उध्वस्त होते. दाम दुपटीपेक्षा वसुली करता येत नाही, बँका फायनान्स खाजगी कंपन्या 20 ते 25 टक्के वसुली करत आहे. बेकादेशीर वसुली सुरू आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी बँका आणि मायक्रो फायनान्सच्या बँक विरोधात आम्ही आंदोलन सुरू करणार. असाइशाराहीशेतकरीनेते रविकांत तुपकर यांनीदिलाआहे.

आणखी वाचा