Exam Reform Bill 2026 Narendra Modi NEET Paper Leak: परीक्षांमधील पेपरफुटी रोखण्यासाठी केंद्र सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. सार्वजनिक परीक्षा गैरप्रकारांना प्रतिबंध करणारे सुधारणा विधेयक (Exam Reform Bill 2026) आज (27 जुलै) लोकसभेत सादर करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह दुपारी 12 वाजता हे विधेयक सभागृहात मांडतील. विधेयकात पेपरफुटीसारख्या गैरप्रकारांसाठी 10 वर्षांच्या तुरुंगवासाची आणि 10 कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे. 24 जुलैला केंद्रीय मंत्रिमंडळाने या विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी दिली असून, चर्चा पूर्ण झाल्यानंतर ते मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे. या सुधारणा विधेयकाचा उद्देश सार्वजनिक परीक्षा कायदा, 2024 मध्ये सुधारणा करणे हा आहे.
नीट पेपरफुटीनंतर (NEET Paper Leak) देशात पेटलेलं विद्यार्थी आंदोलन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता हळूहळू शांत होत आहेत. तरुणाईमध्ये सरकारविरोधात किती रोष आहे, हे या महिन्याभरात देशानं पाहिलं. पण, देशभरातील विद्यार्थ्यांची नाराजी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या (Dharmendra Pradhan) राजीनाम्यासोबतच राष्ट्रीय परीक्षा आयोगातील जवळपास पन्नास अधिकाऱ्यांना घरी बसवलं. इतकंच नाही तर संसदेत पेपरफुटीवर कठोर कायदेशीर कारवाईसाठीचा कायदाही संसदेत आणण्याची तयार मोदी सरकारनं केली. पण, हे करत असतानाच काल पुन्हा एखदा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इन्स्टाग्रामवर रील शेअर केली. त्यात त्यांनी एक अत्यंत महत्वाची घोषणा केली आहे. इन्फोसिसचे संस्थापक नंदन नीलेकणी (Nandan Nilekani) यांच्या नेतृत्वाखाली केंद्रानं हाय पॉवर्ड टास्क फोर्सची (High Powered Task Force) स्थापना केली. त्यांच्या नेतृत्वात परीक्षांमध्ये अधिकाधिक पारदर्शकता कशी आणता येईल, यावर हा टास्क फोर्स काम करणार आहे.
कोण आहेत पेपरफुटी विरोधातील टास्क फोर्सचे अध्यक्ष नंदन निलेकणी? (Who Is Nandan Nilekani)
- प्रसिद्ध उद्योगपती, तंत्रज्ञान तज्ज्ञ आणि इन्फोसिसचे सहसंस्थापक
- भारताच्या डिजिटल क्रांतीसाठी निलेकणींचं मोठं योगदान
- 2002 ते 2007 काळात इन्फोसिसचे सीईओ
- 2006 साली पद्मभूषण पुरस्कारानं गौरव
- निलेकणी ‘आधार कार्ड’ योजनेचे जनक मानतात
- 'आधार'मुळे भारतीयांना डिजिटल ओळख मिळाली
- ‘भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण’ म्हणजेच UIDAI चे पहिले अध्यक्ष
हाय पॉवर्ड टास्क फोर्सच्या टीममध्ये कोणकोण? (High Powered Task Force)
- नंदन निलेकणी, टेक्नॉलॉजी एक्स्पर्ट
- एस. सोमनाथ, इस्रोचे माजी संचालक
- तपन डेका, आयबीचे माजी संचालक
- व्ही. कामाकोटी, आयआयटी चेन्नईचे संचालक
- अनिता करवाल, माजी शिक्षण सचिव
- अमृतलाल मीना, लॉजिस्टिक एक्स्पर्ट
नव्या टास्क फोर्सचा उद्देश काय? (How Work High Powered Task Force)
- परीक्षांमध्ये पारदर्शकता आणणं...
- परीक्षांच्या सुधारणेवर भर देणं...
- परीक्षांमध्ये तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर सुचवणं...
