एक्स्प्लोर

Narendra Bhondekar: एकनाथ शिंदेचं पुन्हा मुख्यमंत्री होणार!, आमदार नरेंद्र भोंडेकरांच्या विधानानं महायुतीत पुन्हा मुख्यमंत्रीपदावरून राजकीय 'वॉर'! म्हणाले, 62 पैकी 30 जागांवर...

Bhandara News : महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महायुतीत मुख्यमंत्रीपदावरून जोरदार ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Bhandara News : महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महायुतीत मुख्यमंत्रीपदावरून जोरदार ठिणगी डण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण भंडाऱ्याचे शिंदे शिवसेना (Shivsena) आमदार नरेंद्र भोंडेकर (Narendra Bhondekar) यांनी थेट आणि अत्यंत आक्रमक विधान करत, "एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवणार," असा निर्धार व्यक्त केला आहे. भंडाऱ्यात (Bhandara News) शिवसेना, प्रहार कार्यकर्ता आणि पदाधिकारी मेळावा होता. यावेळी शिवसेना नेते आमदार बच्चू कडू त्यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आमदार भोंडेकरांनी हा निर्धार व्यक्त केला.

Shivsena : मिशन विदर्भ, 62 पैकी 30 जागांवर दावा, आमदार भोंडेकरांच्या विधानानं राजकीय वर्तुळात भूकंप!

दरम्यान, आमदार भोंडेकर एवढ्यावरचं थांबले नाहीत, तर त्यांनी महायुतीतील अंतर्गत धुसफूसही चव्हाट्यावर आणली आहे. "आम्ही आधी एकटे भांडत होतो, अनेक नेते मॅनेज झाले होते. पण आता दोन नाही तर, आम्ही 11 झालो आहोत," असं म्हणत त्यांनी विरोधकांवर आणि अंतर्गत राजकीय समीकरणांवर निशाणा साधला. पूर्व आणि पश्चिम विदर्भातील 62 विधानसभा जागांपैकी किमान 30 जागा जिंकून आणायच्या आहेत. आपल्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावा, हे प्रत्येक कार्यकर्त्याचं स्वप्न असतं आणि तो आमचा अधिकार आहे. आमचं एकच स्वप्न आणि एकच संकल्प आहे, एकनाथ शिंदे साहेबांना पुन्हा मुख्यमंत्री बनवणं!" असेही ते म्हणाले. भोंडेकरांच्या या थेट दाव्यामुळे आता महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवरून नवीन वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.

Pratap Sarnaik: आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना वाटतं की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजे

दुसरीकडे अमरावतीत देखील शिवसेनेची आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी मंत्री प्रताप सरनाईक हे देखील उपस्थित होते. यावेळी माध्यमांना बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले की, आमचा नेता मुख्यमंत्री व्हावं, यासाठी आम्ही कार्यकर्ते संपूर्ण महाराष्ट्रात फिरत असून त्यासाठी मोर्चे बांधणी सुरू केली. एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना भरपूर विकासाची कामे केली आहे. त्यामुळे आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना वाटतं की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजे असं, सरनाईक म्हणाले. अमरावतीत शिवसेना शिंदे गटाचा पदाधिकारी आढावा बैठक मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. अमरावती येथील हॉटेल ग्रॅण्ड महफील याठिकाणी ही आढावा बैठक झाली. यावेळी जिल्हाभरातील शिवसेनेचे नेते पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरुन नोटीस; सुनिल तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, संबंधित व्यक्तीसोबत माझा संवाद नाही
सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरुन नोटीस; सुनिल तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, संबंधित व्यक्तीसोबत माझा संवाद नाही
महिलांसाठी शासनाचा मोठा निर्णय, पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ; इतर जिल्ह्यांचाही समावेश
महिलांसाठी शासनाचा मोठा निर्णय, पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ; इतर जिल्ह्यांचाही समावेश
Shrikant Shinde :  खासदार श्रीकांत शिंदेंना कॅबिनेट मंत्रीपद मिळणार? राजकीय वर्तुळाच चर्चांना उधाण, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया समोर
खासदार श्रीकांत शिंदेंना कॅबिनेट मंत्रीपद मिळणार? राजकीय वर्तुळाच चर्चांना उधाण, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया समोर
एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावर कॅबिनेट मंत्र्यांची बैठक; मंत्रिमंडळ विस्तारात खांदेपालट होणार, नव्या चेहऱ्यांना संधी?
एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावर कॅबिनेट मंत्र्यांची बैठक; मंत्रिमंडळ विस्तारात खांदेपालट होणार, नव्या चेहऱ्यांना संधी?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE
Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जुलै 2026 | मंगळवार
MLWF : जून महिन्याच्या पगारात 25  रुपयांची कपात, जूनच्या पगारातून कपात झालेली रक्कम कुठे जमा होते? नेमके काय फायदे मिळतात?
जूनच्या पगारातून कपात झालेले 25 रुपये कुठे जमा होतात? नेमके काय फायदे मिळतात?
महिलांसाठी शासनाचा मोठा निर्णय, पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ; इतर जिल्ह्यांचाही समावेश
महिलांसाठी शासनाचा मोठा निर्णय, पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ; इतर जिल्ह्यांचाही समावेश
IND vs ENG : बुमराह- कृष्णा- गुरनूरचा इंग्लंडला दणका, इंग्लंडचा निम्मा संघ 80 धावांवर तंबूत परतला, पहिल्या वनडेत टीम इंडियाची दमदार कामगिरी
बुमराह- कृष्णा- गुरनूरचा इंग्लंडला दणका, इंग्लंडचा निम्मा संघ 80 धावांवर तंबूत परतला, टीम इंडियाची दमदार कामगिरी
Chhatrapati Sambhajinagar : बाबा इतरांसाठी डॉन असतील, पण...; 5.5 कोटींच्या जप्तीनंतर बाबा फर्जनच्या मुलाचा संपत्तीवर दावा; महिलेबाबत मोठा खुलासा
बाबा इतरांसाठी डॉन असतील, पण...; 5.5 कोटींच्या जप्तीनंतर बाबा फर्जनच्या मुलाचा संपत्तीवर दावा; महिलेबाबत मोठा खुलासा
SIR Mumbai Crime: घरी पती आजारी, एसआयआरच्या कामाचा ताण झेपेना, मुंबईत बीएलओ शिक्षिकेने शाळेतच झोपेच्या गोळ्या घेतल्या अन्...
घरी पती आजारी, एसआयआरच्या कामाचा ताण झेपेना, मुंबईत बीएलओ शिक्षिकेने शाळेतच झोपेच्या गोळ्या घेतल्या अन्...
तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धसका, बनावट FDA अधिकारी बनून 6 लाख लुटले; स्वीट मार्ट दुकानदाराच्या तक्रारीनंतर दोघांना अटक
तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धसका, बनावट FDA अधिकारी बनून 6 लाख लुटले; स्वीट मार्ट दुकानदाराच्या तक्रारीनंतर दोघांना अटक
Embed widget