Eknath Shinde on Uddhav Thackeray मुंबई :महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांचे उमेदवारी अर्ज भरले. यानंतर एकनाथ शिंदे यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. शिंदेंनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवर टीका केली. गोरगरीब, शोषित, दलित, पीडित दिव्यांग सगळ्यांसाठी शिवसेना नेहमी पुढे असते. म्हणून बच्चू भाऊ यांनी चागंला निर्णय घेतला. ते शिवसैनिकच आहेत, परंतु, 25 वर्ष सामाजिक संघटना चालवणं देखील मोठं काम असतं. त्यांच्यामुळं शिवसेनेची ताकद वाढेल आणि शिवसेनेमुळं बच्चू कडू यांची ताकद वाढेल, असं एकनाथ शिंदे म्हणाले. विधानपरिषदेसाठी प्रमुख पक्षांच्यावतीनं 10 जागांसाठी 10 अर्ज दाखल करण्यात आल्यानं ही निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
एकनाथ शिंदेंची ठाकरे आणि काँग्रेसवर टीका
एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उमदेवार न देण्याचं कारण अंतरआत्म्यातून आवाज आला उमदेवार देऊन म्हटल्यासंदर्भात प्रश्न विचारला. यावर एकनाथ शिंदे यांनी आत्मा हरवलेल्या लोकांच्यातून आवाज येतो का? मी पहिल्यांदा ऐकलं आहे, 2019 ला अंतरआत्मा कुठं होतं. आत्मा हरवलेल्या लोकांच्या अंतरआत्म्यातून आवाज येतो का असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला.
खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक होत आहे, बिनविरोध निवडणूक होत आहे आणि त्यामुळं सर्व पक्षांचं देखील स्वागत केलं पाहिजे. सर्व पक्षांना धन्यवाद दिले पाहिजेत. शिवसेना- भाजप आणि राष्ट्रवादी महायुतीनं अधिकचा उमेदवार दिला नाही, त्यामुळं ही निवडणूक बिनविरोध आणि खेळीमेळीच्या वातावरणात होत आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
उद्धव ठाकरेंसदर्भात विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना लढायची वेळ येते तेव्हा कुणाला तरी पुढं करतात. तुम लढो हम कपडा संभालते है, हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. मला यावर भाष्य करायचं नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले. सगळ्यांनी समंजसपणाची भूमिका घेतली, काँग्रेसनं देखील समंजस पणाची भूमिका घेतली त्याबद्दल धन्यवाद, असं शिंदेंनी म्हटलं.
शिवसेनेतील काही नेत्यांनी नीलम गोऱ्हे यांच्या नावाला विरोध केला असल्याचं समोर आलं होतं. मात्र, एकनाथ शिंदे यांनी नीलम गोऱ्हे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. तर, बच्चू कडू यांना उमेदवारी देत एकनाथ शिंदेंनी विदर्भात पक्षविस्ताराच्या दृष्टीनं महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे.
भाजपचे विधानपरिषदेचे उमेदवार
सुनील कर्जतकर माधवी नाईक संजय भेंडेविवेक कोल्हेप्रमोद जठारप्रज्ञा सातव (पोटनिवडणूक)
शिवसेना बच्चू कडूनीलम गोऱ्हे
राष्ट्रवादी काँग्रेसझिशान सिद्दिकी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अंबादास दानवे
