मुंबई: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात झाली असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या बैठकीला अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी १२ वाजता या बैठकीला सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे बैठकीला प्रत्यक्ष गैरहजर राहिल्याने ते ऑनलाईन पद्धतीने सहभागी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांच्या अनुपस्थितीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, काल ते भीमाशंकर दौऱ्यावर असल्याने त्यांना परतण्यास उशीर झाला की त्यामागे काही राजकीय नाराजी आहे, यावरून तर्क-वितर्क लावले जात आहेत. (Eknath Shinde Cabinet Meeting)

Continues below advertisement

Eknath Shinde: बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे आणि राजकीय वातावरण

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर निर्णय होण्याची शक्यता आहे. विशेषतः गेल्या काही दिवसांपासून 'मराठी भाषेच्या मुद्द्यावरून' दोन्ही सत्ताधारी पक्षांमध्ये विसंवाद पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीत या विषयावरून वाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. अशा वेळीच एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) गैरहजेरी समोर आल्याने राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.(Eknath Shinde)

Eknath Shinde:  संध्याकाळी दिल्ली दौऱ्याची शक्यता

दरम्यान, मंत्रिमंडळ बैठकीला अनुपस्थित राहिलेले एकनाथ शिंदे आज संध्याकाळी दिल्लीला रवाना होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे त्यांच्या या अचानक ठरलेल्या दिल्ली दौऱ्यामागे नेमके काय कारण आहे, याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे.

Continues below advertisement

Eknath Shinde: भारताचा GDP दर 7.8 टक्क्यांवर; शिंदेंनी केलं मोदींचं अभिनंदन

भारताचा GDP दर 7.8 टक्क्यांवर गेल्यानं एकनाथ शिंदेंनी मोदींचं अभिनंदन केलं, याबाबत पोस्ट करत म्हटलं की, जागतिक अनिश्चितता, युद्धाचे सावट आणि जागतिक मंदीचा दबाव असतानाही ७.८% चा जीडीपी (GDP) विकास दर भारताची अदम्य आर्थिक ताकद दर्शवतो! या ऐतिहासिक कामगिरीबद्दल यशस्वी पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांचे मनःपूर्वक अभिनंदन. तुमच्या दूरदृष्टीपूर्ण धोरणांच्या जोरावर भारत प्रत्येक आव्हानावर मात करत वेगाने $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था आणि जगातील ३ री सर्वात मोठी आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. सशक्त नेतृत्व, समृद्ध भारत!

Shivsena: ठाकरेंचे तब्बल 14 आमदार नवरात्रीपूर्वी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार

आगामी नवरात्रीच्या आधी शिवसेना ठाकरेंचे 14 आमदार शिंदेंच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार असल्याचा दावा शिवसेना शिंदे गटातील एका बड्या नेत्याने केला आहे. या 14 आमदारांना शिवसेनेत आणण्याची जबाबदारी तीन मंत्र्यांवर देण्यात आली आहे, अशी माहितीही शिंदेसेनेतील बड्या नेत्याने दिली आहे. सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे एकूण 20 आमदार आहेत. या 20 आमदारांपैकी 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंकडे असलेल्या 20 आमदारांपैकी कोणते 14 आमदार शिंदे गटात प्रवेश करणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील मंत्र्यांवर ऑपरेशन टायगरची (Opration Tiger) जबाबदारी देण्यात आल्याची माहिती शिवसेना शिंदे गटातील बड्या नेत्याने दिली आहे.  या 14 आमदारांपैकी 6 आमदारांना  सरकारमध्ये चांगली खाती आणि मंत्रिपदे देण्यात येणार आहेत. यापैकी काहींची महामंडळ अध्यक्ष आणि राज्यमंत्रीपदी वर्णी लागण्यावर पक्षांतर्गत चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहितीही समोर आली आहे. नवरात्रीपूर्वी या आमदारांचा पक्ष प्रवेश झाल्यास ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे.