मुंबई : शिवसेनेच्या परिवारामध्ये सहा नवीन खासदार सामील झाले असून त्यांचा योग्य तो सन्मान केला जाईल, त्यांच्याकडे कधीही दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. या खासदारांच्या विश्वासाला तडा कधीही जाऊ देणार नाही, असंही ते म्हणाले. केंद्राशी निगडित प्रश्न असतील वा राज्यातील प्रश्न, कुठेही अडवणूक होणार नाही असा शब्द यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिला. 

Continues below advertisement

ही सगळी ताकद एकत्र आल्यानंतर आपली शिवसेना अधिक भक्कम होईल असंही ते म्हणाले. ऑपरेशन टायगर आता फुलप्रूफ सक्सेस झालं आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. यासंंबंधित सर्व कायदेशीर गोष्टी आम्ही केल्या आहेत, असंही शिंदे म्हणाले. ठाकरेंची साथ सोडलेल्या सहा खासदारांनी यावेळी शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. 

Eknath Shinde Speech : एकनाथ शिंदेंचे भाषण

उद्धव ठाकरेंची साथ सोडलेल्या सहा खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. हे सहा जण खऱ्या शिवसेना परिवारात सामील झाले, याबद्दल आपण त्यांचे अभिनंदन करतो असं एकनाथ शिंदे म्हणाले.चार वर्षांपूर्वी आपण शिवसेना वाचवण्यासाठी, धनुष्यबाण वाचवण्यासाठी उठाव केला. आता हा लढा दुसऱ्या टप्प्यात पोहोचला आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

Continues below advertisement

संजय पाटील हा जनतेशी जोडलेला, ग्राऊंड लेव्हलवर काम करणारा कार्यकर्ता आहे. संजय दिना पाटील हा करा दिनांचा कैवारी असून दोस्ती जपणारा आहे. ओमराजे हे त्यांच्या मनाचे राजे आहेत. पण त्यांनी मनात निश्चय केला आणि ते आपल्यासोबत आले. आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांनी विकासासाठी, न्यायासाठी आपली साथ दिली. काही लोकांनी त्यांना हिणवलं, त्यांना रील स्टार म्हणाले. पण ओमराजे हे रियल स्टार आहेत.

संजय देखमुख हे उत्तम असून त्यांना अधिक उत्तम काम करायचं असल्याने ते आपल्याकडे आहे. नागेश पाटील आष्टीकर हे अत्यंत चांगले आहेत. भाऊसाहेब वाकचौरे हे देखील असेच कार्यकर्ते आहे.

हे सर्व खासदार मतदारसंघातील विकासासाठी आपल्याकडे आले आहेत. 2022 साली बाळासाहेबांची विचारधारा सोडून दुसरा विचार आला त्यावेळी आम्ही उठाव केला. त्यावेळी आपल्यासोबत आलेले 40 आमदार परत निवडून येणार नाहीत असं म्हटलं जायचं. परंतु 40 चे 60 आमदार निवडून आले. चांदा ते बांदापर्यंत शिवसेना मोठी झाली. आमची नीती स्पष्ट होती, विचारधारेला घेऊन आम्ही पुढे गेलो. 

आता आपल्या या कामात सहा खासदार सामील झाले आहेत. या सहा लोकांची ताकद, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमुळे शिवसेना आणखी बळकट होतील. या खासदारांच्या मतदारसंघातील विकासकामं, त्याच्या अडचणी सोडवण्यात येतील. मी दिलेला शब्द पाळतो, त्यामुळे एकनाथ शिंदेंवर विश्वास ठेवतात.