Kalyan Dombivli Mahanagarpalika Election 2026: आगामी काळात विकास व राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ठरु शकणाऱ्या मुंबई महानगर अर्थात एमएमआरडीए क्षेत्रातील महानगरपालिकांमध्ये आपली सत्ता प्रस्थापित करण्याच्यादृष्टीने सध्या भाजप आणि शिंदे सेनेत प्रचंड रस्सीखेच सुरु आहे. ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC Election 2026) वगळता एमएमआरडीए क्षेत्रातील महानगरपालिकांमध्ये भाजपला (BJP)  शिंदे सेनेच्या तुलनेत मोठे यश मिळाले आहे. तरीही भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांना शह देण्यासाठी कल्याण डोंबिवली उल्हासनगरमध्ये शिवसेनेकडून वेगळी भूमिका घेतली जाण्याची दाट शक्यता आहे. (BJP and Shivsena clash over Mahanagarpalika mayor) 

Continues below advertisement

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 122 नगरसेवक आहेत. यापैकी शिंदे गटाचे 53 आणि भाजपचे 50 नगरसेवक निवडून आले आहेत. या महानगरपालिकेत भाजप-शिवसेनेने युतीत निवडणूक लढवली होती. दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांच्या संख्येत फारसा फरक नसल्याने भाजपकडून कल्याण डोंबिवलीत सत्तेत समसमान वाटा मागितला जाऊ शकतो. मात्र, याठिकाणी शिवसेना भाजपसाठी महापौर पद आणि अन्य महत्त्वाची पदे सोडायला तयार नसल्याचे समजते. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत पुन्हा स्वबळावर सत्ता आणून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना शह देण्याची श्रीकांत शिंदे यांची योजना आहे. त्यादृष्टीने श्रीकांत शिंदे यांच्याकडून अन्य पक्षाच्या नगरसेवकांशी संपर्क केला जात आहे. ठाकरे गटाच्या एका नगरसेवकाने श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. 

Ulhasnagar Mahanagarpalika Election 2026: उल्हासनगरमध्ये शिंदे गट वंचितसोबत युती करणार?

Continues below advertisement

उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीत भाजपचे 37 तर शिंदे गटाचे 36 नगरसेवक निवडून आले आहेत. अंबरनाथ नगरपालिकेप्रमाणे उल्हासनगरमध्येही शिंदे गटाकडून भाजपला झटका दिला जाऊ शकतो. अंबरनाथ नगरपालिकेत शिंदेंच्या शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन सत्ता स्थापन केली होती. त्याप्रमाणेच उल्हासनगर महानगरपालिकेत वंचितच्या नगरसेवकांची मदत घेऊन शिंदे गटाकडून सत्ता स्थापन होऊ शकते. वंचितच्या दोन नगरसेवकांनी शिंदे गटाला पाठिंब्याचे पत्र दिले आहे. त्यामुळे उल्हासनगरमध्ये शिंदे गटाचा महापौरपद बसू शकतो.

Thane Mahanagarpalika Election 2026: ठाण्यात भाजपकडून दोन वर्षांसाठी महापौरपदाची मागणी

ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 75 जागा जिंकून एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले. तर भाजपला ठाण्यात फक्त 28 प्रभागांमध्ये विजय मिळाला. ठाणे महानगरपालिकेत महापौर बसवण्यासाठी शिवसेनेकडे बहुमतासाठी लागणारे आवश्यक संख्याबळ आहे. त्यासाठी शिवसेनेला कोणाच्याही मदतीची गरज नाही. मात्र, याठिकाणी भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून दोन वर्षांच्या महापौरपदाची मागणी करण्यात आली आहे. स्थानिक नेत्यांनी ही इच्छा भाजपच्या पक्षश्रेष्ठींना बोलून दाखवली आहे. त्यामुळे मुंबईनंतर आता ठाणे महानगरपालिकेतही महापौरपदावरुन भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. 

आणखी वाचा

मुंबईच्या महापौरपदाबाबत अजिबात तडजोड करु नका, देवेंद्र फडणवीसांना दिल्लीतून आदेश आला, शिंदे सेनेच्या आकांक्षांना सुरुंग लागणार?