Eknath Shinde and BJP: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी रविवारी दिल्लीत जाऊन गुप्तपणे अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली. अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा महायुतीमधील (Mahayuti) चढाओढीबद्दल चर्चा रंगू लागली आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्या अलीकडच्या काळातील राजकारणावर नजर टाकल्यास काही गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. सत्तेत असूनही विरोधी पक्षांची स्पेस व्यापणे, भाजप विरोधकांना पायघड्या घालणे आणि शिवसेना पक्षाचा विस्तार ही एकनाथ शिंदे यांच्या नव्या राजकीय पॅटर्नची वैशिष्ट्ये आहेत. (Maharashtra Politics news)
Maharashtra Politics News: एकनाथ शिंदे यांच्या राजकारणाचा नवा पॅटर्न
* एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून सत्तेत सहभागी असतानाच विरोधी पक्षाची भूमिका पार पाडण्याचाही प्रयत्न होतोय. * एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते वेळ आल्यावर राज्य आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करायला मागे पुढे पहात नाहिएत. * त्याचाच एक भाग म्हणून मंत्री योगेश कदम यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसमोर कॉक्रोच पार्टीच समर्थन केले होते.* राज्यातील भाजप विरोधी राजकारणासाठी ओळखले जाणाऱ्या नेत्यांना शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेशासाठी पायघड्या घातल्या जात आहेत. माजी आमदार रविंद्र धंगेकर आणि बच्चू कडू ही त्याची ठळक उदाहरणं आहेत.* पक्ष विस्ताराच्या धोरणामुळे काँग्रेस , शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंचा शिवसेना या विरोधी पक्षातील अनेक नेते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत दाखल होत आहेत. * यामुळे विरोधी पक्ष अधिक कमकुवत होत असल्याच चित्रं आहे. परंतु शिंदेंचे हे धोरण आगामी काळात भाजप आणि त्यांच्यामधील संघर्ष आणखी तीव्र होण्यास कारण ठरु शकतं.* 2014ला सत्तेत सहभागी झालेल्या उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने अशीच विरोधी पक्षाची भूमिका पार पाडायचे ठरवले होते. मात्र, त्याची परिणिती 2019 ला दोन्ही पक्षांची युती तुटण्यामधे झाली होती. * सत्तेचा फायदा मिळवण्यासाठी भाजपचे अनेक विरोधक सध्या एकनाथ शिंदेंच्या पक्षात सहभागी होत असले तरी ऐन निवडणूकीवेळी हे नेते काय करतील हे सांगता येत नाही. हे नेते निवडणुकीवेळी त्यांच्या मुळ पक्षात परतल्यास ते भाजपसाठी आव्हान निर्माण करु शकतात.
आणखी वाचा
