Eknath Shinde On Vidhan Parishad Election 2026:महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी (Vidhan Parishad Election 2026) शिवसेना शिंदे गटाकडून नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) आणि बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेच्या उमेदवारांच्या नावांची आज घोषणा केली. यावेळी महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येतील, असं एकनाथ शिंदे म्हणाले. (Shivsena Candidate Vidhan Parishad Election 2026)
विधान परिषदेची उमेदवारी जाहीर होण्याआधीच प्रहार जनशक्ती संघटनेचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला. गेल्या दोन दिवसांपासून विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून बच्चू कडू आणि नीलम गोऱ्हे यांच्या नावाची चर्चा होती. तर राज्यसभेप्रमाणे नवीन चेहऱ्याला संधी द्यावी, असा अनेकांचा सूर होता. तसेच नीलम गोऱ्हे यांच्या नावाला काही मंत्री आणि शिवसेनेतील नेत्यांचाच विरोध होता, अशी माहितीही समोर आली होती. मात्र शिवसेनेतील मंत्र्यांचा आणि नेत्यांचा विरोध झुगारून एकनाथ शिंदेंनी नीलम गोऱ्हेंना उमेदवारी जाहीर केली. (Eknath Shinde On Vidhan Parishad Election 2026)
विधान परिषदेसाठी उमेदवार जाहीर केल्यानंतर एकनाथ शिंदे काय म्हणाले? (Eknath Shinde On Bacchu Kadu)
पद कमी असतात, इच्छा अनेक व्यक्त करतात. माझं प्रत्येकावर लक्ष असतं. जो काम करेल तो पुढे जाईल. हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, मालकांचा नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच गोरगरीबांचा आंदोलक नेता म्हणून बच्चू कडू यांची ओळख आहे. बच्चू कडू यांनी मुंबईतील सर्व पदाधिकाऱ्यांसोबत पक्षप्रवेश केला. दिव्यांगांसाठी लढणारा झटणारा नेता म्हणून बच्चूभाऊंची ओळख आहे. शिवसेनेत तुमचं स्वागत करतो, शिवसेना तुम्हाला नवीन नाही, तुम्ही मुळचे शिवसैनिकचं आहात, असं एकनाथ शिंदे बच्चू कडू यांना शिवसेनेत पक्षप्रवेश केल्यानंतर म्हणाले.
विधान परिषदेच्या या निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याकडून उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. कोणत्या पक्षाकडून कोणाला उमेदवारी जाहीर करण्यात आली. याची संपूर्ण यादी....(Maharashtra Vidhan Parishad Election 2026 All Candidate List)
भाजपकडून विधान परिषदेसाठी कुणाला संधी- (BJP Candidate Vidhan Parishad Election 2026)
- सुनील कर्जतकर
- माधवी नाईक
- संजय भेंडे
- विवेक कोल्हे
- प्रमोद जठार
- प्रज्ञा सातव
शिवसेना शिंदे गटाकडून विधान परिषदेसाठी कुणाला संधी- (Shivsena Candidate Vidhan Parishad Election 2026)
- नीलम गोऱ्हे
- बच्चू कडू
राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून विधान परिषदेसाठी कुणाला संधी- (NCP Ajit Pawar Candidate Vidhan Parishad Election 2026)
- झिशान सिद्दीकी
शिवसेना ठाकरे गटाकडून विधान परिषदेसाठी कुणाला संधी- (Shivsena UBT Candidate Vidhan Parishad Election 2026)
महाविकास आघाडी-
- अंबादास दानवे (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
विधान परिषदेच्या निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम- (Maharashtra Vidhan Parishad Election 2026)
- निवडणुकीची अधिसूचना जारी करणे : 23 एप्रिल, 2026
- उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस: 30 एप्रिल 2026
- उमेदवारी अर्जांची छाननी: 2 मे 2026
- उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: 4 मे 2026
- मतदानाची तारीख: 12 मे 2026
- मतदानाची वेळ: सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आहे.
- मतमोजणी: 12 मे 2026 संध्याकाळी 5 वाजता
- निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख: 13 मे 2026
