Eknath Shinde meets Amit Shah: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची गुप्त भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. एकनाथ शिंदे हे नेमके अमित शाहांना (Amit Shah) का भेटले आणि या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, यावरुन तर्कवितर्कांना उधाण आले होते. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना अमित शाह यांच्यासोबतच्या दिल्लीतील भेटीला दुजोरा दिला. किंबहुना दिल्लीत जाऊन एनडीएच्या (NDA) नेत्यांना भेटण्यात गैर काय आहे, असा प्रतिसवालही त्यांनी केला. भविष्यात आपण दिल्लीतील नेत्यांना भेटत राहू, असेही एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांसोबतच्या अनौपचारिक गप्पांवेळी सांगितले. (Maharashtra Politics)

Continues below advertisement

सध्या राज्यात विधानपरिषद निवडणुकीचे जागावाटप सुरु आहे. यावरुन महायुतीमधी तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विधान परिषदेच्या सात जागांची मागणी करण्यात आली होती. मात्र, भाजप शिवसेनेसाठी फक्त 5 जागा सोडण्यासाठी तयार होता. त्यानंतर हा आकडा सहापर्यंत आला होता. जळगाव, नाशिक आणि रायगड या विधान परिषदेच्या तीन जागांसाठी महायुतीमधील पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. या सगळ्यात महाराष्ट्रातील भाजप नेत्यांकडून अपेक्षित जागा पदरात पडत नसल्याने एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली का, याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत. 

प्राथमिक माहितीनुसार, चार दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे हे दिल्लीत गेले होते. एकनाथ शिंदे यांचा हा दिल्ली दौरा फक्त दोन दिवसांचा होता. या काळात एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांची भेट घेण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र, अमित शाह यांची वेळ मिळू न शकल्याने ही भेट होऊ शकली नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे पुन्हा महाराष्ट्रात परतले होते. मात्र, त्यानंतरही एकनाथ शिंदे हे अमित शाह यांची भेट घेण्यासाठी वारंवार प्रयत्न करत होते. त्यामुळे अमित शाह यांनी शनिवारी रात्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीत भेटीसाठी येण्याचा निरोप पाठवला. त्यानुसार रविवारी एकनाथ शिंदे कोणालाही सुगावा लागू न देता खासगी विमानाने दिल्लीत पोहोचले. एकनाथ शिंदे यांनी या भेटीबाबत एवढी गुप्तता बाळगली होती की, त्यांच्यासोबत एकही सहाय्यक नव्हता. अमित शाह यांच्याशी भेट झाल्यानंतर एकनाथ शिंदे रविवारी बंगळुरुला गेले आणि तिथून ते ठाण्यात परतल्याचे सांगितले जाते.

Continues below advertisement

आणखी वाचा

Eknath Shinde and Amit Shah meet: एकनाथ शिंदे कोणालाही सुगावा लागू न देता गुपचूप अमित शाहांना भेटले? शिक्षणसम्राट सोबत, दिल्लीत नेमकं काय घडलं?