एक्स्प्लोर

Satara : साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सत्ता स्थापन करणार, एकनाथ शिंदेंचा ग्रीन सिग्नल, मकरंद पाटील-शंभूराज देसाईंच्या भेटीत निर्णय 

Satara ZP Election : सातारा जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला ग्रीन सिग्नल दिला आहे. 

सातारा : राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि  125 पंचायत समित्यांचा निकाल 9 जानेवारीला जाहीर झाला आहे. सातारा जिल्हा परिषदेचा निकाल त्रिशंकू लागल्यानं सत्ता कोण स्थापन करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. साताऱ्याचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतल्याची माहिती आहे. या भेटीत एकनाथ शिंदे यांनी साताऱ्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यास ग्रीन सिग्नल दिल्याची माहिती आहे.   

एकनाथ शिंदेंचा सत्ता स्थापनेला ग्रीन सिग्नल

सातारा जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेंसदर्भात रोज नवे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री मकरंद पाटील यांनी  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. खात्रीशीर सूत्रांच्या  माहितीनुसार मुंबईतील नंदनवन बंगल्यावर मंत्री मकरंद पाटील, मंत्री शंभूराज देसाई यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली आहे.

साताऱ्यात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून या निमित्तानं मकरंद पाटील आणि शंभूराज देसाई यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे 20 जिल्हा परिषद सदस्य आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक जिल्हा परिषद सदस्य यांना साताऱ्यातून बाहेर हलवण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य आऊट ऑफ कव्हरेज आहेत तर काहींचे स्विच ऑफ लागत आहेत. 

येणाऱ्या काही दिवसात राष्ट्रवादी शिवसेना सत्ता स्थापन करणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळाल्याची माहिती आहे. त्यामुळं साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सत्ता स्थापन करणार अशी खात्रीशीर सूत्रांची माहिती आहे. सत्ता स्थापनेत आकड्यांचा खेळ, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या दाराआडच्या बैठका आणि जिल्हा परिषद सदस्य आऊट ऑफ कव्हरेज असल्यामुळे सातारा जिल्हा परिषदेच्या सत्ता संघर्षाने राज्याचे लक्ष साताऱ्याकडे वेधलं आहे.

सातारा जिल्हा परिषद निवडणूक निकालानंतर भाजपचं स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचं स्वप्न अपूर्ण राहिल्याचं स्पष्ट झालंय. मात्र, भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांनी सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचा होणार अशा आशयाचं वक्तव्य केल्यानं साताऱ्याच्या राजकारणातील रंगत वाढली आहे. 

सातारा जिल्हा परिषद संख्याबळ : एकूण जागा 65

भाजप : 27
राष्ट्रवादी काँग्रेस :20
शिवसेना : 16
स्वाभिमानी शेतकरी संघटना : 01
काँग्रेस : 01
अपक्ष : 01

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Farmer Loan Waiver मोठी बातमी: फडणवीस, शिंदे, पवार शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जाहीर करणार; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती
मोठी बातमी: फडणवीस, शिंदे, पवार शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जाहीर करणार; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती
Rajya Sabha Election 2026 Shivsena Shinde Group Candidate: शेवाळे, निरुपम, अडसूळ, किर्तीकर...राज्यसभेची जागा 1, इच्छुक 8; एकनाथ शिंदे नेत्यांच्या गराड्यात अडकले!
शेवाळे, निरुपम, अडसूळ, किर्तीकर...राज्यसभेची जागा 1, इच्छुक 8; एकनाथ शिंदे नेत्यांच्या गराड्यात अडकले!
Rajya Sabha Election : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
मोठी बातमी! शरद पवारच राज्यसभेचे उमदेवार, सुप्रिया सुळेंकडून घोषणा; काँग्रेस अन् ठाकरेंच्या शिवसेनेचा पाठिंबा
मोठी बातमी! शरद पवारच राज्यसभेचे उमदेवार, सुप्रिया सुळेंकडून घोषणा; काँग्रेस अन् ठाकरेंच्या शिवसेनेचा पाठिंबा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा
Jalgaon Banana : केळीचे दर 2.500 रुपयांवरुन 1500 रुपयांवर, युद्धाचा उत्पादकांना फटका
Ajit Pawar plane crash spot Baramati : AIB च्या अहवालात विमान झाडाला धडकल्याचा उल्लेख, फॅक्ट काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना,वानखेडेवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून प्रेक्षकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी 
भारत- इंग्लंड सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून सूचना जारी
तामिळनाडूत द्रमुक आणि काँग्रेसचं जमलं, राज्यसभेची एक जागा काँग्रेसला मिळणार, विधानसभेसाठी द्रमुकनं किती जागा सोडल्या?
तामिळनाडूमध्ये काँग्रेस-द्रमुकमधील जागा वाटपाचा तिढा सुटला, काँग्रेसला विधानसभेच्या किती जागा?
Iran vs America : भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू, व्हिडीओ जारी  
भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू
Rajya Sabha Election : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
Iran Israel Conflict : पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
Embed widget