Eknath Shinde Dharashiv Visit: खासदार ओमराजे निंबाळकरांचा सावध पवित्रा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत कार्यक्रमात एकत्र येणं टाळलं
Eknath Shinde Dharashiv Visit: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) हे आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. धाराशिव येथे आयोजित पत्रकार संघाच्या कार्यक्रमास ते उपस्थित राहणार आहेत.

Eknath Shinde Dharashiv Visit: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) हे आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. धाराशिव येथे आयोजित पत्रकार संघाच्या कार्यक्रमास ते उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला त्यांच्या सोबत पालकमंत्री प्रताप सरनाईक, मंत्री भरत गोगावले तसेच आमदार तानाजी सावंत आणि इतर प्रमुख लोकप्रतिनिधी सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे, महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या ऑपरेशन टायगर प्रकरणानंतर प्रथमच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर(Omraje Nimbalkar) हे एकाच मंचावर दिसणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे या कार्यक्रमाकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे.
तसेच नवीन जिल्हा परिषद सदस्यांचा भव्य सत्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. असे असताना ऑपरेशन टायगरच्या चर्चेमुळे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकत्र येणं टाळले असल्याची माहिती आहे.
Omraje Nimbalkar: मला लातूर येथील नियोजित कार्यक्रमासाठी जायाचे असल्याची प्रतिक्रिया
दरम्यान, कार्यक्रमस्थळी खासदार ओमराजे निंबाळकर यांची खुर्ची नाहीये. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित असलेले ओमराजेंनी कार्यक्रमाकडे फिरवली पाठ फिरवल्याचे चित्र आहे. दरम्यान, या विषयी बोलताना 'मला लातूर येथील नियोजित कार्यक्रमासाठी जायाचे असल्याची प्रतिक्रिया खासदार ओमराजे निंबाळकरांनी दिली आहे. परिणामी, प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित असलेले ओमराजे निंबाळकर हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कार्यक्रमात एकत्र येणार नाहीये.
Eknath Shinde Dharashiv Visit: शिवसेनेच्याच पदाधिकाऱ्यांवर नजर कैदेची कारवाई करण्याची वेळ
दुसरीकडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पदाधिकारी नजर कैदेत ठेवण्यात आले आहे. युवासेनेचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य अविनाश खापे आणि जिल्हा परिषदेचे पराभूत उमेदवार नितीन पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. शिरढोण पोलिसांनी ही कारवाई केली असून सकाळी दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. अविनाश खापे यांनी यापूर्वी व्हीआयपी दौरा असताना गोंधळ घातला होता. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी घेतल्याची पोलिसांची माहिती आहे. तर जिल्हा परिषदेला पराभूत असलेल्या नितीन पाटलांचाही एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे खबरदारी म्हणून त्यांनाही ताब्यात घेतलं आहे. मात्र शिवसेनेतला अंतर्गत गटबाजीमुळे गेल्या काही दिवसात वाद धुमसतोय. दोन गटातील वादामुळे यापूर्वी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या दौऱ्यावेळी प्रचंड राडा झाला होता. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धाराशिव दौऱ्यावर येत असताना त्यांच्याच पदाधिकाऱ्यांवर नजर कैदेची कारवाई करण्याची वेळ आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या





















