Rohit Pawar and Eknath Shinde: एकनाथ शिंदे हे 2023 साली दावोसला जात असताना इराण आणि इराकच्या लष्कराने त्यांचे विमान पाडण्याचा इशारा दिल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी अलीकडेच केला होता. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी हा दावा खरा असल्याचे सांगत या गोष्टीला दुजोरा दिल्याचा दावा रोहित पवार यांनी केला. मी एकनाथ शिंदे यांना भेटलो तेव्हा त्यांनी अशी घटना घडल्याचे मान्य केले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना दावोसला (Davos) जाताना इराक आणि इराणच्या (Iran) बॉर्डरवर विमानाने हवाई उड्डाणची परवानगी न घेतल्यामुळे विमान पाडण्याचा इशारा दोन्ही देशांनी दिला होता. (Maharashtra Politics News)

Continues below advertisement

Rohit Pawar: रोहित पवार नेमकं काय म्हणाले होते?

16 ते 20 जानेवारी 2023 दरम्यान एकनाथ शिंदे साहेब दावोसला गेले होते. आंतरराष्ट्रीय प्रवासात 'फ्लाईट प्लॅन' द्यावा लागतो आणि इतर देशांची परवानगी घ्यावी लागते. बिना परवानगी जर विमान त्या देशामध्ये गेलं तर ते विमान पाडलही जाऊ शकतं आणि तसेच काहीतरी हे एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत घडले. विमानात इंधन (Refueling) भरल्यानंतर ते झुरिकला जात असताना इराणच्या हद्दीतून गेले. इराणने सांगितलं होतं तुम्ही जर आत्ताच्या आता नाही वळला तर तुमचं विमान आम्ही पाडू. त्यावेळी या विमानात स्वतः एकनाथ शिंदे आणि इतर काही अधिकारी बसले होते. इराणने हटकल्यानंतर विमान इराकच्या बाजूला गेले, पण इराकने सुद्धा हेच केलं असे ते म्हणाले. शेवटी कोणतीही परवानगी नसल्याने ते विमान माघारी गेले आणि सगळ्या परमिशन तिथे घेतल्या आणि मग एकनाथ शिंदे झुरिकला गेले, असे रोहित पवार यांनी सांगितले होते. 

VSR aircraft company:  व्हीएसआर कंपनीच्या मालकाला सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी नाश्ता, जेवण दिलं, भारत-इंग्लंड मॅचही बघू दिली: रोहित पवार

Continues below advertisement

काल व्हीएसआर कंपनीचा मालक व्ही.के. सिंग हा सीआयडीला भेटण्यासाठी आला होता. पोलिसांना भेटायला आलेल्या या माणसासोबत बंदूकधारी सिक्युरिटी होती, अकरा ते आडे अकरा वाजता सिंग सीआयडी कार्यालयात आल्याचं आम्हाला समजलं, नाष्ट्यापासून जेवणापर्यंत आणि आम्हाला कळलं की, संध्याकाळी अर्धा एक तास क्रिकेटची मॅच सुद्धा त्यांना पोलीसस्टेशन मध्ये टिव्हीवरती दाखवली अशी माहिती आहे. येतानाच फुटेज आपल्याकडे आहे, पण जाताना ते कोणत्या गाडीत गेले, ते लोकांना कळलं नाही, मिडीयाशी आणि तिथे असलेल्या कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर इतकंच कळलं, काळाबाजार करणाऱ्या या व्ही, के, सिंगला पोलिसांच्याच काळ्या गाडीमध्ये, काचा काळ्या असलेल्या गाडीतून नेण्यात आलं. पोलिसांनी त्याला इतकी व्हीआयपी ट्रीटमेंट दिली आहे, एका तपासामध्ये असलेल्या प्रमुख क्रिमीनल असलेल्या या अंगाने तपास करणाऱ्याला अशी वागणूक मिळणार म्हणजे फारच दु:ख आहे. व्ही.के. सिंगला वाचवलं जात आहे, मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांना बहरीनला जाताना व्ही.के. सिंगचं विमान होतं, तेव्हा मोठा गोंधळ झाला होता. व्ही.के. सिंगला वाचवण्याचा मागे अनेक मोठे हात आहेत, त्याच्यामागे मोठे नेते आहेत, मात्र या चिरकूटला वाचविण्यासाठी अजित दादांना न्याय मिळत नाहीये, असं म्हणत रोहित पवारांनी संताप व्यक्त केला आहे.

आणखी वाचा

इराण-इस्रायल युद्धाचा भडका, राज्य सरकारचा मोठा निर्णय, इंडस्ट्रीसाठी गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद, दोन दिवसात व्यावसायिक गॅसही बंद होणार?

Iran Israel Conflict Affect In India: ज्याची भीती होती, तेच झालं...इराण आणि अमेरिका-इस्त्रायल युद्धाच्या झळा महाराष्ट्रापर्यंत पोहोचल्या, सरकारकडून महत्वाचे आदेश