एक्स्प्लोर

Raigad Gurdian Minster: सकाळी एकनाथ शिंदे अमित शाहांना एकांतात भेटले अन् दुपारी भरत गोगावलेंना मुंबईला बोलावलं, चांगली की वाईट बातमी मिळणार?

Bharat Gogawale & Eknath Shinde: श्रीवर्धन मतदारसंघातून मंत्री अदिती तटकरे यांच्या विरोधात यंदाची विधानसभा निवडणूक लढवलेले उमेदवार अनिल नवगणे हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

मुंबई: रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी इच्छूक असणारे शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने मुंबईला बोलावून घेतले आहे. एकनाथ शिंदे यांनी रविवारी सकाळी अमित शाह यांची मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली होती. यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत अन्य कोणीही नव्हते. अमित शाह यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांनी तब्बल अर्धा तास वन टू वन चर्चा केली. त्यानंतर दुपारी एकनाथ शिंदेंकडून भरत गोगावले यांना महाडवरुन मुंबईला येण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे आता मुंबईत रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत निर्णायक चर्चा होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

अमित शाह यांनी शनिवारी रायगड किल्ल्यावरुन निघाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्या घरी जाऊन भोजन केले होते. सुनील तटकरे यांची कन्या अदिती तटकरे या रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या प्रबळ दावेदार आहेत. त्यामुळे सुनील तटकरे आणि अमित शाह यांच्यात काल रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत चर्चा झाली असावी, असा अंदाज आहे. त्यानंतर आज सकाळी एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्यात चर्चा झाली. त्यावेळी अमित शाह यांनी रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत एकनाथ शिंदे यांना कोणता मेसेज दिला असावा का, याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यामुळे आता भरत गोगावले मुंबईत आल्यानंतर काय घडणार, हे पाहणे औत्स्युकाचे ठरेल. भरत गोगावले यांना याविषयी विचारले असता त्यांनी आपण मुंबईला पक्षाच्या कामासाठी चाललो, असल्याचे सांगितले.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाव्होसला जाण्यापूर्वी पालकमंत्रीपदाची यादी जाहीर करण्यात आली होती. त्यामध्ये नाशिकचे पालकमंत्रीपद गिरीश महाजन आणि रायगडचे पालकमंत्रीपद अदिती तटकरे यांना देण्यात आले होते. मात्र, यामुळे एकनाथ शिंदे हे नाराज होऊन आपल्या गावी निघून आले होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्याचे आदेश जारी केले होते.

... म्हणून अमित शाह तटकरेंच्या घरी जेवायला गेले; गोगावलेंचा दावा

अमित शाह आणि सुनील तटकरे यांच्यात जेवणावेळी रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत चर्चा झाली आहे का, असा प्रश्न भरत गोगावले यांना विचारण्यात आला. यावर गोगावले यांनी म्हटले की, आम्ही त्या ठिकाणी उपस्थित नव्हतो. परंतु आम्ही काल त्यांच्या सोबत असलेल्या लोकांना यासंदर्भात चर्चा झाली का, याबाबत विचारले असता अशा प्रकारची कोणतीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. सुनील तटकरे यांच्या सुतार वाडीतील निवासस्थानी काल अमित शहा यांच्यासोबत फक्त फोटोसेशन आणि भोजनाव्यतिरिक काहीच झालं नाही. सुनील तटकरे यांनी अमित शहा यांना दिल्लीत माझं घर तुमच्या रायगड दौऱ्यावेळी रस्त्यात लागेल. त्यामुळे तुम्ही तिकडे या, अशा प्रकारचे निमंत्रण दिले होते. त्यामुळे त्यांच्या निमंत्रणाला मान देऊन अमित शहा काल सुतारवाडीत गेल्याचा दावा भरत गोगावले यांनी केला.

आणखी वाचा

शिंदे-फडणवीस कोणीही नाही, अमित शाहांना निरोप द्यायला भाजपचा 'हा' नेता सहकुटुंब एअरपोर्टवर गेला

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी
BMC Election 2026: मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांची मराठी मतदारांना भावनिक साद, म्हणाले, 'एक आहे तर सेफ आहे'
मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांची मराठी मतदारांना भावनिक साद, म्हणाले, 'एक आहे तर सेफ आहे'
'बार डान्सर तुम्ही स्टेजवर घेऊन येता ..' दिपाली सय्यदने वाक्य उच्चारताच राधा पाटील संतापली, बिग बॉसच्या घरात दुसऱ्याच दिवशी दोघींमध्ये जुंपली
'बार डान्सर तुम्ही स्टेजवर घेऊन येता ..' दिपाली सय्यदने वाक्य उच्चारताच राधा पाटील संतापली, बिग बॉसच्या घरात दुसऱ्याच दिवशी दोघींमध्ये जुंपली

व्हिडीओ

Solapur Mahapalika Election : भाजप उमेदवाराच्या मुलाकडून पैसे वाटप? धक्कादायक व्हिडीओ समोर
Ram Kadam BJP : ठाकरे बंधुंनी मराठी माणसाचा ठेका घेतलाय का? राम कदम यांची टीका
Ravindra Dhangekar Pune : पुणे शहराचा डान्सबार होऊ देणार नाही, धंगेकरांची भाजपवर टीका
Padu EVM : ईव्हीएमला बॅकअप म्हणून पाडू मशीन गरज लागली तर वापरणार, निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण
Mumbai Mahapalika Candidate : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकूण 1700 उमेदवार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी
BMC Election 2026: मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांची मराठी मतदारांना भावनिक साद, म्हणाले, 'एक आहे तर सेफ आहे'
मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांची मराठी मतदारांना भावनिक साद, म्हणाले, 'एक आहे तर सेफ आहे'
'बार डान्सर तुम्ही स्टेजवर घेऊन येता ..' दिपाली सय्यदने वाक्य उच्चारताच राधा पाटील संतापली, बिग बॉसच्या घरात दुसऱ्याच दिवशी दोघींमध्ये जुंपली
'बार डान्सर तुम्ही स्टेजवर घेऊन येता ..' दिपाली सय्यदने वाक्य उच्चारताच राधा पाटील संतापली, बिग बॉसच्या घरात दुसऱ्याच दिवशी दोघींमध्ये जुंपली
ड्रग्जमध्ये पिढी बर्बाद होतेय, 7 महिन्यात 93 मुली गायब, मुंबई रेल्वे अपघातात 26500+ मृत्यू, ते का दिसत नाही? हीच का आमच्या जीवाची किंमत? अमित ठाकरेंनी फडणवीसांचा 11 वर्षातील पाढाच वाचला
ड्रग्जमध्ये पिढी बर्बाद होतेय, 7 महिन्यात 93 मुली गायब, मुंबई रेल्वे अपघातात 26500+ मृत्यू, ते का दिसत नाही? हीच का आमच्या जीवाची किंमत? अमित ठाकरेंनी फडणवीसांचा 11 वर्षातील पाढाच वाचला
Nana Patole On Washim News: 'कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक...', वाशीममध्ये अधिकाऱ्याने शेतकऱ्याला बुटाने मारलं, घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पटोलेंना संताप
'कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक...', वाशीममध्ये अधिकाऱ्याने शेतकऱ्याला बुटाने मारलं, घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पटोलेंना संताप
Bigg Boss Marathi 6: गेमच फिरला! पॉवर कीसाठी करणसमोर गयावया, शेवटी पाया पडली पण..; रुचिताला गेम भारी पडला, नॉमिनेशनला जाणार सामोरी?
गेमच फिरला! पॉवर कीसाठी करणसमोर गयावया, शेवटी पाया पडली पण..; रुचिताला गेम भारी पडला, नॉमिनेशनला जाणार सामोरी?
सिंचन घोटाळ्यापेक्षाही दहापट मोठा घोटाळा महामार्गांच्या कामांमध्ये झालाय; अधिकारी, पुढारी आणि कॉन्ट्रॅक्टर या तिघांच्या संगनमताने महाराष्ट्राला प्रचंड लुटलंय; विजय पांढरेंचा गंभीर आरोप
सिंचन घोटाळ्यापेक्षाही दहापट मोठा घोटाळा महामार्गांच्या कामांमध्ये झालाय; अधिकारी, पुढारी आणि कॉन्ट्रॅक्टर या तिघांच्या संगनमताने महाराष्ट्राला प्रचंड लुटलंय; विजय पांढरेंचा गंभीर आरोप
Embed widget