एक्स्प्लोर

Eknath Shinde and Uddhav Thackeray: मोठी बातमी: शिंदे अन् ठाकरेंची शिवसेना एकत्र येण्याची शक्यता; कोकणात गुप्त बैठक, राजकारणात एकच खळबळ

Eknath Shinde and Uddhav Thackeray: कोकणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायतीत शिंदे गट आणि ठाकरे गट एकत्र येण्याची शक्यता व्यक्त होत आहे

Eknath Shinde and Uddhav Thackeray: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या (Local Body Elections) पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्ष आगामी निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत आहेत. आता त्याच कोकणातून (Konkan) एक मोठी बातमी समोर येत आहे. सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायतीत शिवसेना शिंदे गट (Shiv Sena Shinde Faction) आणि ठाकरे गट (Shiv Sena UBT) एकत्र येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या एकत्रीकरणासाठी “शहर विकास आघाडी” या नावाने नवीन आघाडी निर्माण करून दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा रंगली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.  

कणकवली शहरात याबाबत गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीला माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, तसेच स्थानिक नेते सुशांत नाईक, संदेश पारकर, आणि सतीश सावंत हे उपस्थित होते. या बैठकीत नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही एकत्र येण्याची चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.  

Eknath Shinde and Uddhav Thackeray: ठाकरे गट आणि शिंदे गट एकत्र येण्याची शक्यता

बैठकीत दोन्ही गटातील नेत्यांनी स्थानिक स्तरावर मतभेद विसरून एकत्र येण्याची तयारी दाखवल्याचं सूत्रांकडून समजतं. शिवसेनेच्या फुटीनंतर पहिल्यांदाच ठाकरे गट आणि शिंदे गट हे एकत्र येण्याची शक्यता आहे.  शहर विकास आघाडी करून दोन्ही गट एकत्र येण्याची शक्यता आहे. संदेश पारकर हे कणकवली नगरपंचायतमध्ये शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील. येत्या दोन दिवसात यावर निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या नव्या आघाडीच्या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Rajan Teli: अंतिम निर्णय वरिष्ठच घेतील

याबाबत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी आमदार राजन तेली म्हणाले की, कणकवली शहरातून एक प्रस्ताव आलेला आहे की, सगळ्यांनी मिळून या ठिकाणी लढावं आणि शहर विकास आघाडी करावी. मात्र, अजून त्या प्रस्तावावर कुठलाही निर्णय झालेला नाही. वरिष्ठांपर्यंत तो प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे. गावातील प्रमुख मंडळींचा अशा प्रकारचा प्रस्ताव आलेला आहे. मात्र अजून त्यावर निर्णय झालेला नाही. अंतिम निर्णय वरिष्ठच घेतील. भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी स्वबळाचा नारा दिलेला आहे. त्या धर्तीवर इतर प्रमुख लोकांनी समोरासमोर बसून चर्चा केली आणि असा प्रस्ताव दिल्यानंतर वरिष्ठांना तो पाठवण्यात आला आहे. वरिष्ठ काय निर्णय घेतील? ते पाहू, असे त्यांनी म्हटले.  

Rajan Teli: हा केवळ एकट्या शिवसेनेचा प्रस्ताव नाही

उद्धव ठाकरे यांनी धाराशिवमध्ये बोलताना स्पष्टपणे सांगितले की, कोणाशीही युती करू. मात्र शिंदेंशी युती होणार नाही. तरीदेखील कणकवलीत अशा पद्धतीची युती होऊ शकते का? याबाबत विचारले असता राजन तेली म्हणाले की, यात नुसता उभाठा गट नाही तर कणकवलीतील इतर समाजसेवा करणारे मंडळे देखील आहेत. ते देखील यात सहभागी आहे. हा केवळ एकट्या शिवसेनेचा प्रस्ताव नाही. शहरासाठी काम करणाऱ्या मंडळींचा प्रस्ताव आलेला आहे. शहराच्या विकासासाठी एकत्र येणे आणि शहरातील मंडळींनी जे मुद्दे मांडले आहे त्यावर विचार करणे काही गैर नाही. यात आम्ही भाजपला विरोध करतोय, असे नाही. शहराच्या विकासासाठी एकत्र येऊया. यानिमित्ताने गावात एक चांगलं वातावरण तयार होईल, अशी सगळ्यांची भूमिका आहे. त्यानुसार सर्वांनी भूमिका घेतली आहे. ते मंजूर करायचे की नाही करायचे हा वरिष्ठांचा निर्णय आहे. त्यांचा जो निर्णय येईल त्यानुसार आम्ही काम करू, असे त्यांनी म्हटले.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Ajit Pawar: पार्थ पवारांनंतर अजितदादांचा दुसरा मुलगाही अडचणीत येणार? ‘टँगो’ दारू कंपनीवरून काँग्रेसचा सनसनाटी आरोप

महत्त्वाच्या बातम्या

Vijay Suryavanshi On Pune Moshi Building Collapse: मोशी इमारतीच्या फक्त तळमजल्याला पूर्णत्वाचा दाखला; एबीपीने खुलासा करताच आयुक्तांचं संतापलेल्या भाषेत उत्तर, काय म्हणाले?
मोशी इमारतीच्या फक्त तळमजल्याला पूर्णत्वाचा दाखला; एबीपीने खुलासा करताच आयुक्तांचं संतापलेल्या भाषेत उत्तर, काय म्हणाले?
Eknath Khadse Meets Uddhav Thackeray: आधी विनोद तावडेंशी गुप्त भेट, आता एकनाथ खडसे थेट मातोश्रीवर पोहोचले, उद्धव ठाकरेंसोबत खलबतं; नेमकं कारण काय?
आधी विनोद तावडेंशी गुप्त भेट, आता एकनाथ खडसे थेट मातोश्रीवर पोहोचले, उद्धव ठाकरेंसोबत खलबतं; नेमकं कारण काय?
Operation Tiger 3: 'ऑपरेशन टायगर 3' मुळे ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार? 10 आमदारांचे 'मतपरिवर्तन' केल्याचा मोठा दावा; एकनाथ शिंदेंचा गेम प्लॅन काय?
'ऑपरेशन टायगर 3' मुळे ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार? 10 आमदारांचे 'मतपरिवर्तन' केल्याचा मोठा दावा; एकनाथ शिंदेंचा गेम प्लॅन काय?
Pune Moshi Building Collapse: 64 तास उलटले, अजूनही 8 जण ढिगाऱ्याखाली; अत्याधुनिक कटरच्या मशनरीने इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा स्लॅब पाडला, आतापर्यंत काय काय घडलं?
64 तास उलटले, अजूनही 8 जण ढिगाऱ्याखाली; अत्याधुनिक कटरच्या मशनरीने इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा स्लॅब पाडला, आतापर्यंत काय काय घडलं?

व्हिडीओ

Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
30 हजार फूट उंचीवर विमानाची खिडकीची काच फुटली अन् प्रवाशाचं डोकं आणि खांदा बाहेर गेला, बायकोनं पाय धरून वाचवलं! भीषण दुर्घटना सुदैवाने टळली
30 हजार फूट उंचीवर विमानाची खिडकीची काच फुटली अन् प्रवाशाचं डोकं आणि खांदा बाहेर गेला, बायकोनं पाय धरून वाचवलं! भीषण दुर्घटना सुदैवाने टळली
Vijay Suryavanshi On Pune Moshi Building Collapse: मोशी इमारतीच्या फक्त तळमजल्याला पूर्णत्वाचा दाखला; एबीपीने खुलासा करताच आयुक्तांचं संतापलेल्या भाषेत उत्तर, काय म्हणाले?
मोशी इमारतीच्या फक्त तळमजल्याला पूर्णत्वाचा दाखला; एबीपीने खुलासा करताच आयुक्तांचं संतापलेल्या भाषेत उत्तर, काय म्हणाले?
Eknath Khadse Meets Uddhav Thackeray: आधी विनोद तावडेंशी गुप्त भेट, आता एकनाथ खडसे थेट मातोश्रीवर पोहोचले, उद्धव ठाकरेंसोबत खलबतं; नेमकं कारण काय?
आधी विनोद तावडेंशी गुप्त भेट, आता एकनाथ खडसे थेट मातोश्रीवर पोहोचले, उद्धव ठाकरेंसोबत खलबतं; नेमकं कारण काय?
Maharashtrachi Hasyajatra Fame Nimish Kulkarni: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'त कधीतरीच का दिसतो निमिष कुलकर्णी? अभिनेत्यानं सांगितलं कारण, खंत व्यक्त करत म्हणाला ..
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'त कधीतरीच का दिसतो निमिष कुलकर्णी? अभिनेत्यानं सांगितलं कारण, खंत व्यक्त करत म्हणाला ..
Moshi Building Collapse: आमदार, मंत्र्यांचे नुसतेच दौरे, जबाबदारी कोणी घेणार का? कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांच्या संतापाचा कडेलोट; अतिरिक्त आयुक्तानां घेराव
आमदार, मंत्र्यांचे नुसतेच दौरे, जबाबदारी कोणी घेणार का? मोशी दुर्घटनेतील कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांच्या संतापाचा कडेलोट; अतिरिक्त आयुक्तानां घेराव घालत प्रश्नांची सरबत्ती!
Operation Tiger 3: 'ऑपरेशन टायगर 3' मुळे ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार? 10 आमदारांचे 'मतपरिवर्तन' केल्याचा मोठा दावा; एकनाथ शिंदेंचा गेम प्लॅन काय?
'ऑपरेशन टायगर 3' मुळे ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार? 10 आमदारांचे 'मतपरिवर्तन' केल्याचा मोठा दावा; एकनाथ शिंदेंचा गेम प्लॅन काय?
मनोरंजनसृष्टीवर शोककळा! राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; वयाच्या 57 व्या वर्षी आर चेझीयान यांचे निधन
मनोरंजनसृष्टीवर शोककळा! राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; वयाच्या 57 व्या वर्षी आर चेझीयान यांचे निधन
Dombivli:'मला मारू नका.. मारू नका...' मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या मारहाणीचा पीडित महिला डॉक्टरच्या मानसिक स्थितीवर गंभीर परिणाम, झोपेतही भयकंप; वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संताप
'मला मारू नका.. मारू नका...' मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या मारहाणीचा पीडित महिला डॉक्टरच्या मानसिक स्थितीवर गंभीर परिणाम, झोपेतही भयकंप; वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संताप
Embed widget