Mahayuti Seat Sharing : राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर (Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025) साऱ्याचराजकीयपक्षानीआपलामोर्चाआताआगामीमहानगरपालिकांच्यानिवडणुकांकडे (Municipal Corporation Election 2026) वळवलाआहे. याच निवडणुकींच्याअनुषंगानेआताजोरदारमोर्चेबांधणीकेलीजातअसूनदिवसरात्रबैठकाआणिचर्चेसत्ररंगल्याचेचित्रबघायलामिळतआहे. अशातचआतामहायुतीच्या (Mahayuti) गोटातूनयासंदर्भातएकमोठीमाहितीसमोरआलीआहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  (Eknath Shinde) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्यात तब्बल 5 तास मॅरेथॉन चर्चा रंगल्याचीमाहितीआहे. महायुतीची एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी पहाटे 4 वाजेपर्यंत चर्चा रंगली. त्यामुळेमुंबईसहराज्यातीलजागावाटपासंदर्भातभाजपआणिशिवसेनेमध्येअंतिमनिर्णयझालाअसूनआजतरीअधिकृतघोषणाहोणारका, हेपाहणेमहत्वाचेठरणारआहे.

Continues below advertisement

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी पहाटे 4 वाजेपर्यंत राजकीय खलबतं

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी (Municipal Election) निवडणूक आयोगाने तारीख जाहीर केल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. मुंबई, ठाण्यासह राज्यातील 29 महापालिकांमध्ये 15 जानेवारी रोजी मतदान, तर 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. अशातच पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना आमदार आणि नगरसेवकांची सोमवारी विशेष बैठक घेण्यात आली होती. या बैठकित आमदारांना मतदारसंघ आणि नगरसेवकांना निवडणुकीपर्यंत वाॅर्ड न सोडण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहे. तसेच, शिवसेना भाजप यांच्यातील जागा वाटप हे अंतिम टप्यात असून लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थित युती आणि जागा वाटपाची घोषण़ा होईल, अशी देखील माहिती आहे.

Continues below advertisement

Mahayuti : पुढच्या काही तासात पहिली यादी जाहीर होणार?

तर दुसरीकडे, उद्योग मंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत (Uday Samantयांना सोमवारी तातडीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीहून मुंबईला (Ratnagiri to Mumbai) बोलवले होतं. उदय सामंत मुंबईत दाखल होताच तात्काळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि त्यानंतर वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांच्या सोबत महत्वाची बैठक झाली. त्यामुळे दिवस आणि रात्री उशिरापर्यंतमहायुतीत आता घडामोडींना वेग प्राप्त झाला असून पुढच्या काही तासात जागावाटपाचा तिढा सुटण्याची  चिन्ह आहे.

महानगपालिका 2026 साठी निवडणूक कार्यक्रम- (BMC Election Date 2026)

नामनिर्देशन- 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर

नामनिर्देशन पत्राची छाननी- 31 डिसेंबर

उमेदवार मागे घेणे- 2 जानेवारी 2026 पर्यंत

अंतिम यादी आणि चिन्ह- 3 जानेवारी 2026

मतदान- 15 जानेवारी 2026

मतमोजणी/निकाल-16 जानेवारी 2026