एक्स्प्लोर

Eknath Shinde and Milind Narvekar: विधानभवनातील मिलिंद नार्वेकर आणि एकनाथ शिंदेंच्या ओझरत्या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा, लिफ्टमध्ये नेमका काय संवाद झाला?

Maharashtra Assembly budget Session 2026: विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे. काल विधानभवनात एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर यांची भेट झाली होती.

Maharashtra Assembly budget Session 2026: विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानभवनाच्या लिफ्टमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांची भेट झाली होती. या भेटीची काल दिवसभर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. काहीवेळ हे दोघे लिफ्टमध्ये एकमेकांसोबत गप्पा मारत होते. यावेळी खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा सुरु होती. मात्र, या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याची उत्सुकता सर्वांना लागली होती. या चर्चेचा तपशील आता समोर आला आहे. (Maharashtra Politics)

काल मिलिंद नार्वेकर हे आधी विधान भवनाच्या लिफ्टमध्ये गेले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे सुद्धा त्याच लिफ्टमध्ये आले. या दोघांनी एकमेकांना पाहताच अभिवादन केले.  मिलिंद नार्वेकर आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये वरळी डोम येथे अजित पवारांच्या शोकसभे.संदर्भात अगदी दीड-दोन मिनिटे चर्चा झाली  मिलिंद नार्वेकर यांनी अजित पवार यांच्या वरळी डोम येथील शोकसभेचा आयोजन सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी नियोजनबद्ध केल्याचे म्हटले. या शोकसभेला अदानी,अंबानी आले, हे विशेष असेही मिलिंद नार्वेकर म्हणाले. यानंतर अजित पवार यांच्या शोक प्रस्तावपर चर्चेदरम्यान सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी केलेल्या भाषणाबाबतही उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली. 

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा बुधवारी तिसरा दिवस आहे. येत्या 6 मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सभागृहात महाराष्ट्राचा आगामी वर्षाचा अर्थसंकल्प मांडतील. यंदाच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी प्रथेप्रमाणे दोन्ही सभागृहातील दिवंगत सदस्यांना आदरांजली वाहण्यासाठी शोक प्रस्ताव मांडण्यात आला. या शोक प्रस्तावावरील चर्चेत बोलताना विधानसभा आणि विधानपरिषद दोन्ही सभागृहातील अनेक नेत्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला होता. 

Shambhuraj Desai VS Anil Parab : एकनाथ शिंदेंच्या खात्यावरुन अनिल परब- शंभूराज भिडले

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदा अधिवेशनापुरता त्यांच्याकडील काही खात्यांची जबाबदारी शिवसेनेतील अन्य मंत्र्यांवर सोपवली होती. यावरुन मंगळवारी विधानसभेत रणकंदन झाले. अनिल परब आणि मंत्री शंभूराज देसाई एकमेकांशी भिडल्याचे दिसून आले. सभागृहामध्ये अनिल परब यांनी आपलं म्हणण मांडताना म्हटलं की, या सभागृहाचे नियम या सभागृहाच्या परंपरा आणि सभागृह कसा चालवणं हे आपल्या अधिकार कक्षात येतं, ज्यावेळी विधानसभेचं अधिवेशन चालतं त्यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे बऱ्याच वेळेला बिझी असतात त्यांच्याकडे वेगवेगळी जबाबदारी असते आणि ते आपल्या खात्याचा कारभार दुसऱ्यांकडे देतात. आम्ही आपल्याकडे मागणी करतो, कुठल्या खात्याचे मंत्री आणि ज्यावेळेला राज्यमंत्री नव्हते त्यावेळेला आम्ही मान्य करत होतो, मुख्यमंत्र्यांचे अधिकार दुसऱ्या मंत्रांना दिले आहेत, ते उत्तर देत आहेत, परंतु आता त्या खात्याचा राज्यमंत्री आज आहे आणि राज्यमंत्री असताना देखील मंत्री जर येऊन मुख्यमंत्र्यांचे किंवा उपमुख्यमंत्र्यांचे विषय जर हाताळत असतील, तर योग्य आहे का?, असा सवाल अनिल परब यांनी विचारला होता. अखेर एकनाथ शिंदेंनी स्वत: सभागृहात येऊन या वादात हस्तक्षेप केला होता.  त्यांचा जो काही बॅकलॉग राहिलेला आहे, मी आत्ता शंभूराज देसाई यांना सांगितलेला आहे, जे तुमचे प्रश्न आहेत, जे तुमचे प्रश्न राहिलेले आहेत, ज्या बैठका घ्यायचा आहेत, त्या सर्व घ्या आणि एका महिन्यामध्ये त्याची सर्व पुरता करा, मी स्वतः यामध्ये लक्ष घालेन, आणि एकच आहे. यामध्ये गैरसमज कोणाचा नसावा, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते.

आणखी वाचा

सुधीर मुनगंटीवारांचा सभागृहात आक्रमक आवेश, प्रश्नांच्या सरबत्तीने योगेश कदमांची उडाली भंबेरी, लक्षवेधीवेळी नक्की काय घडलं?

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कागदपत्रे घेतली, तरीही ज्योती वाघमारेंना माहिती नव्हतं; एकनाथ शिंदेंनी उलगडलं खासदार करण्याचं गुपित
कागदपत्रे घेतली, तरीही ज्योती वाघमारेंना माहिती नव्हतं; एकनाथ शिंदेंनी उलगडलं खासदार करण्याचं गुपित
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
मराठा समाजावर अन्याय म्हणत मराठा क्रांती मोर्चाची काळी रंगपंचमी; सोलापुरात भाजप नेत्यांविरुद्ध आक्रोश
मराठा समाजावर अन्याय म्हणत मराठा क्रांती मोर्चाची काळी रंगपंचमी; सोलापुरात भाजप नेत्यांविरुद्ध आक्रोश
घरगुती गॅसचे दर 60 रुपयांनी वाढले, इंधन तुटवडा; मुख्यमंत्री देवाभाऊंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पॅनिक तयार करू नका
घरगुती गॅसचे दर 60 रुपयांनी वाढले, इंधन तुटवडा; मुख्यमंत्री देवाभाऊंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पॅनिक तयार करू नका
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mumbai Metro Womens Day : महिला दिनानिमित्त, CSMT मेट्रो स्थानकाची जबाबदारी महिलांकडे
Womens Day Special Talk With Mayor : महिला दिन विशेष 'माझा'च्या मंचावर महिला महापौरांची 'महा'पॉवर
Bhiklya Ladkya Dhinda : तारपा वाजवणारा पद्मश्री आयुष्याचे धडे देणारा तत्त्वज्ञानी Majha Katta वर
AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
Abhishek Manu Singhvi: कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
India vs New Zealand, Final T20 World Cup: 'अभिषेक शर्मा आणि वरुण चक्रवर्तीला बाहेर ठेवा' वर्ल्डकप फायनलला काही तास बाकी असतानाच गंभीर गुरुजी अन् कॅप्टन सूर्याला थेट सल्ला!
'अभिषेक शर्मा आणि वरुण चक्रवर्तीला बाहेर ठेवा' वर्ल्डकप फायनलला काही तास बाकी असतानाच गंभीर गुरुजी अन् कॅप्टन सूर्याला थेट सल्ला!
डोंबिवलीच्या महिलांचा वर्ल्ड रेकॉर्ड; सांगलीचा विश्वविक्रम मोडला, महिला दिनी 9,111 विद्यार्थीनींची एकत्र लेझीम
डोंबिवलीच्या महिलांचा वर्ल्ड रेकॉर्ड; सांगलीचा विश्वविक्रम मोडला, महिला दिनी 9,111 विद्यार्थीनींची एकत्र लेझीम
इराक लक्षात ठेवा! खोटारट्यावर आधारित युद्ध नकोत; थेट इराणवरील अमेरिका-इस्रायली हल्ल्यांविरोधात व्हाईट हाऊससमोर एल्गार
इराक लक्षात ठेवा! खोटारट्यावर आधारित युद्ध नकोत; थेट इराणवरील अमेरिका-इस्रायली हल्ल्यांविरोधात व्हाईट हाऊससमोर एल्गार
Embed widget