Eknath Khadse on Gulabrao Patil: मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीत (Muktainagar Nagarpanchayat Election) भाजप (BJP) आणि शिवसेना (Shiv Sena) यांच्यात लढत झाली असताना, “राष्ट्रवादीचा नेता भाजपसाठी काम करतो, हा कोणता पिक्चर आहे?” असा टोला मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना लगावला होता. तसेच खडसे जिल्ह्यातील अनेक नेत्यांना त्रास देत होते, आम्हाला जेलमध्ये टाकले, आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना त्रास दिला, त्यामुळेच आज त्यांना हे भोगावे लागत असल्याची टीका गुलाबराव पाटील यांनी केली होती. आता एकनाथ खडसे यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर पलटवार केलाय.  

Continues below advertisement

एकनाथ खडसे यांनी म्हटले की, “होय, मी अनेकांना त्रास दिला, ही बाब खरी आहे. मात्र तो त्रास गुंड आणि भ्रष्ट लोकांना दिला,” असे ते म्हणाले. “जिल्ह्यातच नाही तर जिल्ह्याबाहेरही जे भ्रष्टाचार करतात, गुंडगिरी करतात, त्यांना जेलमध्ये टाकण्याचं काम मी केलं आहे आणि पुढेही करीन,” असे ठाम विधान त्यांनी केले. गुलाबराव पाटील यांनी केलेल्या आरोपांवर पलटवार करताना खडसे म्हणाले, “गुलाबराव पाटील हे विसरले असतील, पण त्यांच्या आमदारकीच्या काळात प्रचारासाठी मी त्यांना मोठी मदत केली होती. आता गुलाबराव पाटील जे बोलत आहेत त्यांनी स्वतः आत्मचिंतन करावे, असा टोला देखील त्यांनी लगावला.

Eknath Khadse on Gulabrao Patil: होय, मी भाजपला मदत केली : एकनाथ खडसे

मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीबाबत बोलताना खडसेंनी मोठं वक्तव्य केलं. “खरं बोलायला काय आहे. मुक्ताईनगरच्या नगरपंचायत निवडणुकीत मी भाजपला मदत केली. होय, मी भाजपला मदत केली,” असे त्यांनी स्पष्टपणे मान्य केले. तर गुलाबराव पाटील यांच्यावर टीका करताना खडसे म्हणाले, “एवढी वर्षे मंत्री असूनही गुलाबराव पाटील त्यांच्या गावची नगरपरिषद करू शकले नाहीत. त्यांनी यावर आत्मचिंतन करायला हवं,” असे खडेबोलही त्यांनी सुनावले. दरम्यान, या आरोप-प्रत्यारोपामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले असून, मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीनंतर खडसे–पाटील संघर्ष कायम सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. आगामी काळात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

Continues below advertisement

आणखी वाचा 

Eknath Khadse On Irrigation Scam: अजित पवारांना 25 वर्षांनी 'त्या' फाईलची आठवण, म्हणजे तुम्हीदेखील भ्रष्टाचाराला संरक्षण दिलंय; सिंचन घोटाळ्यावरुन एकनाथ खडसेंचा हल्लाबोल