एक्स्प्लोर

Eknath Khadse : महाराष्ट्रात राहून चेकाळल्याचा अर्थ कळत नसल्यास यांच्या बुद्धीची किव केली पाहिजे; खडसेंचा खोचक टोला

Eknath Khadse on Rupali Chakankar : रुपाली चाकणकर या चेकाळल्या आहेत, असे वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केले होते.

Eknath Khadse on Rupali Chakankar : काही दिवसांपूर्वी पुण्यातील खराडी येथे सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकाला होता, या प्रकरणात माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे जावई प्रांजल खेवलकर (Pranjal Khewalkar) यांना अटक करण्यात आलं आहे, ते सध्या जेलमध्ये आहेत. या प्रकरणात आता महिला आयोगाची एन्ट्री झाली आहे, या प्रकरणावर बोलताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी पत्रकार परिषद घेत एकनाथ खडसे यांच्या जावयावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. खेवलकरांच्या मोबाईलमध्ये महिलांचे आक्षेपार्ह फोटो आहेत, असा आरोप चाकणकर यांनी केला. चाकणकर यांच्या आरोपानंतर एकनाथ खडसे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. रुपाली चाकणकर या चेकाळल्या आहेत, असे त्यांनी म्हटले. यानंतर महायुतीकडून एकनाथ खडसे यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. आता एकनाथ खडसे यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे.   

रूपाली चाकणकर या माझ्या मुलीसारख्या : एकनाथ खडसे 

चेकाळणे या शब्दाचा अर्थ गुगलवर जाऊन एकदा पाहा. या भाजपवाल्यांना महाराष्ट्रात राहून मराठीचा अर्थ समजत नसेल तर यांच्या बुद्धीची कीव येते.  रूपाली चाकणकर या माझ्या मुलीसारख्या आहेत. त्या माझ्या घरी जेवण करून गेलेल्या आहेत. चेकाळणे शब्दाचा अर्थ आवेशाने, खवळणे असे अनेक अर्थ होतात. एकदा गुगलवर जाऊन तपासा. ज्यांना मी दूध पाजलं मोठं केलं, तेच माझ्या विरोधात आंदोलन करताय याचे मला दुःख होत आहे. रूपाली चाकणकर यांचा आदराने मी तेरावेळा ताई म्हणून उल्लेख केला, एकदा माझी प्रतिक्रिया पाहा.  किरीट सोमय्या यांचे नागडे फोटो दाखवले तेव्हा तुम्ही आंदोलन केले नाही, असा हल्लाबोल त्यांनी टीका करणाऱ्यांवर केलाय. 

विषारी पिल्लांना मी मोठं केलंय, याचं दुःख : एकनाथ खडसे 

दरम्यान, एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. गिरीश महाजन यांच्या अनेक सिड्या ह्या प्रफुल लोढाकडे आहेत असेल त्यांनी म्हटले आहे. मला कशाला आंदोलन करून जोडे मारतात, त्या गिरीश महाजनांना जोडे मारा, प्रफुल लोढाला जोडे मारा. माझ्या विरोधात भाजपचे लोक आंदोलन करताय, मी एका पदाधिकाऱ्याला विचारले काय रे कशाला आंदोलन केले? तो म्हटला वरून आदेश आले म्हणून तुमच्या विरोधात आंदोलन केलं.  विषारी पिल्लांना मी मोठं केलंय, याचा मला दुःख वाटतंय. मी कधीही माझ्या जावयाचे समर्थन केलेले नाही. कुणाची एक तरी तक्रार आहे का? तरीदेखील रूपाली चाकणकर या कुणाच्या आधारावर बोलताय? तुमचा मुलगा घराबाहेर गेल्यावर तुम्हाला कळतं का की तो काय करतोय? दारू पितोय का ते? फक्त राजकारणात नाथाभाऊंना बदनाम करून हनी ट्रॅप  वरून लक्ष विचलित करण्यासाठी हे उद्योग सध्या सुरू आहेत, असे म्हणत एकनाथ खडसे यांनी रूपाली चाकणकर आणि गिरीश महाजनांवर निशाणा साधलाय. 

आणखी वाचा 

रुपाली चाकणकरांबद्दलचा प्रश्न विचारला, रक्षा खडसेंनी हात जोडले; जळगावातील वरिष्ठ नेत्यांनाही दिला सल्ला

महत्त्वाच्या बातम्या

Monsoon Session 2026 : काय आहे 'मिशन 360'? बजेट सत्रानंतर कसं बदललं संसदेचं गणित? मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पास होणार का?
काय आहे 'मिशन 360'? बजेट सत्रानंतर कसं बदललं संसदेचं गणित? मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पास होणार का?
सोनम वांगचुक आमच्यासाठी आणि देशासाठी महत्त्वाचे, सरकार अतिशय असंवेदनशील, सुप्रिया सुळेंची टीका
सोनम वांगचुक आमच्यासाठी आणि देशासाठी महत्त्वाचे, सरकार अतिशय असंवेदनशील, सुप्रिया सुळेंची टीका
Jayant Patil: जयंत पाटलांचे ऐन आषाढीत 'भेटी लागी जीवा लागलीसे आस'! आता सीएम फडणवीसानंतर एकनाथ शिंदेंची भेट का घेतली? सविस्तर सांगितलं
जयंत पाटलांचे ऐन आषाढीत 'भेटी लागी जीवा लागलीसे आस'! आता सीएम फडणवीसानंतर एकनाथ शिंदेंची भेट का घेतली? सविस्तर सांगितलं
Congress : मोदी वांगचुक यांच्या उपोषणाची दखल घेत नाहीत, धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा का दिला नाही? हा मूळ मुद्दा : हर्षवर्धन सपकाळ
मोदी वांगचुक यांच्या उपोषणाची दखल घेत नाहीत, धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा का दिला नाही? हा मूळ मुद्दा : हर्षवर्धन सपकाळ

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget