मुंबई : राज्यात विनाअनुदानित शाळांची (School) संख्या मोठ्या प्रमाणावर होत असून इंग्रजी माध्यमांच्या शाळा वाढत आहेत. वाढते नागरिकीकरण आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता, शाळांच्या संख्येतही वाढ होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर स्वयंअर्थसहायित शाळांसाठीचे अधिकार आता मंत्री महोदयांच्या स्तरावर न ठेवता सचिवांकडे देण्यात आले आहेत. राज्य सरकारच्या प्रशासकीय कारभारात सुधारणा आणि गतिमानता आणण्याकरिता शालेय शिक्षण (Education) खात्याशी संबंधित मंत्र्यांच्या महत्त्वाच्या अधिकारांना कात्री लावण्यात आल्याची बातमी समोर येते आहे. मात्र, कामांची गर्दी होऊ नये, कामात सुटसुटीत पणा यावा म्हणून मी स्वतः हा निर्णय निर्णय घेतला असल्याची प्रतिक्रिया शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी दिली.

Continues below advertisement

शिक्षणमंत्र्यांच्या अधिकाराला कात्री लावण्यात आल्याची माहिती समोर आली असून महत्त्वाचे निर्णय आता अधिकारी स्तरावर देण्यात आले आहेत. मात्र, यासंदर्भात माहिती देताना हा निर्णय माझा स्वतःचा असल्याचे मंत्री दादा भुसेंनी म्हटले. कामांची गर्दी होऊ नये, कामामध्ये सुटसुटीतपणा यावा म्हणूनच हा निर्णय घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये अतिरिक्त तुकड्यांना, शाखांना मान्यता देण्याचे, सीबीएसई, आयसीएसई सारख्या विविध मंडळांच्या अभ्यासक्रमांना ना-हरकत प्रमाणपत्र देण्याचे तसेच नव्या तुकड्या व शाखांना मान्यता देण्यासारखे महत्त्वाचे अधिकार विभागाचे सचिव आणि शिक्षण आयुक्तांकडे सोपविण्यात आल्याचा निर्णय मी स्वतः घेतला आहे, असे मंत्री दादा भुसेंनी माध्यमांशी बोलताना सांगितले. 

कोल्हापुरात शिक्षकांचा मोर्चा

दरम्यान, आज देशभरात शिक्षक दिन साजरा होत असून शिक्षक दिनीच कोल्हापुरात हजारो शिक्षक रस्त्यावर उतरून एल्गार करत असल्याचं पाहायला मिळालं. जुनी पेन्शन योजना लागू करा या प्रमुख मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांनी मोर्चा काढलाय. 'दसरा चौका'तून मोर्चाला प्रारंभ झाला असून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकला. तोंडाला काळे मास्क घालून आणि हातात लक्षवेधी फलक घेऊन शिक्षकांचा कोल्हापुरात विराट मोर्चा निघाला आहे. मोर्चात शिक्षक संस्थाचालकही हजारोंच्या संख्येने सहभागी आहेत. 

Continues below advertisement

हेही वाचा

मनसेच्या दहीहंडीतून पेपरफुटीवर प्रहार, सेलिब्रिटींसह गोविंदांचा उत्साह; पोलिसांनी परवानगी नाकारल्याचा आरोप


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI