Dr. Babanrao Taywade on Chhagan Bhujbal : छगन भुजबळ  (Chhagan Bhujbal) रस्त्यावर उतरले तर राष्ट्रीय ओबीसी महासंघ (National OBC Federation) देखील तन-मन-धनाने त्यांच्या सोबत राहणार, अशीभूमिका राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनीघेतलीआहे. सरकारकडून मराठा समाजाला (Maratha Reservation) आणि ओबीसी (OBC Reservation) समाजाला दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधेत मोठी तफावत आहे. ज्या सोयी सवलती मराठा समाजाला मिळतात, त्या सर्व सोयी सुविधा ओबीसी समाजाला देण्याचा शासन निर्णय काढण्यात यावा, अशीमागणीहीडॉ. तायवाडे यांनीकेलीआहे. (Dr. Babanrao Taywade on Chhagan Bhujbal)

Continues below advertisement

Dr. Babanrao Taywade : मराठा आंदोलकासोबतची आणि ईतर समाजाच्या आंदोलनाबाबत सरकारच्या भूमिकेत दूजाभाव

दरम्यान, मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबतबोलताना डॉ. बबनराव तायवाडे म्हणालेकी, सरकारचे मंत्री थेट आंदोलनस्थळी जातात. मात्र इतर समाजातील आंदोलन झाल्यावर त्यांना मंत्रालयात बोलावतात आणि त्याची अंमलबजावणी देखील होत नाही. मराठा आंदोलकासोबत सरकारची भूमिका आणि ईतर समाजाच्या आंदोलनाबाबत सरकारच्या भूमिकेत दूजाभाव असल्याचाआरोपही डॉ. बबनराव तायवाडे यांनीयावेळीकेलाआहे.

Continues below advertisement

 Chhagan Bhujbal: नेमकं काय म्हणाले होते मंत्री छगन भुजबळ? 

 "जात पडताळणी समिती ही महत्त्वाची समिती आहे. त्याच्यावर कुणीही दबाव आणता कामा नये. काही प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने नाकारली आहेत. ती दुरुस्त करून देतो असं काही आमदार म्हणाले आहेत. आता माझा त्या आमदाराना सवाल आहे मुंबईत 4 नगरसेवकांचं जात पडळणीत प्रमाणपत्र रद्द ठरलं आहे, त्यामुळे त्यांच नगरसेवक पद गेलं आहे. आता ते देखील तुम्ही दुरुस्त करून देणार आहात का? असासवालविचारात राज्याचे मंत्री छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) सरकारलाचएकप्रकारेघराचाआहेरदिलाआहे. मराठा समाजाकडून कुणबी प्रमाणपत्र घेताना दाखल्यावर खडाखोडी करण्यात आल्या आहे. आता ते दाखले तर तुम्ही स्वीकारणर आहात का? जात पडताळणी समितीवर कुणीही दबाव आणू नये. असेही छगन भुजबळ म्हणालेत. दरम्यानमंत्री छगन भुजबळ यांनीमांडलेल्या भूमिकेचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून समर्थन करण्यातआलेआहे.

छगन भुजबळ म्हणाले की, "राज्यातील महायुतीच्या नेत्यांनी लक्षात घ्यावं, ओबीसींनी तुम्हाला मदत केली आहे. तुमचं सरकार आणण्यात ओबीसींचा महत्त्वाचा हातभार आहे. आता मराठा कुणबी मंत्रालय करायचं सुरू आहे? आता हे कसं काय होईल? करायचं असेल तर प्रत्येक जातीसाठी करा. आमचा दाखल्याला विरोध नाही, मात्र ओबीसी आरक्षण संपता कामा नये . मराठा समाजाकडून कधी ओबीसी आरक्षण घेतलं जात आहे, कधी एसईबीसी आरक्षण घेत आहेत, तर कधी EWS आरक्षण घेत आहेत. एकच विद्यार्थी तीन आरक्षणाचा कसा काय फायदा घेईल?  हे कसं चालेल सरकारने याबाबत स्पष्टता आणायला हवी."

इतर महत्वाच्या बातम्या